अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Ahmednagar city Assembly Election


अहमदनगर जिल्हा म्हटलं की सहकारांची आणि संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. अहमदनगर जिल्ह्याचा तसा इतिहास खूप मोठा आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने तर सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्ह्याला ओळखले जाते. अहमदनगर जिल्हा हा सहकारी चळवळीसाठी ओळखला जातो. अहमदनगर जिल्ह्यामध्ये तीर्थक्षेत्र ही मोठ्या प्रमाणात आढळून येतात. यामुळेच अहमदनगर जिल्हा सर्व बाजूने पुढे असताना हा राजकारणाच्या बाबतीत मागे कसा राहील.चला तर मग पाहूयात अहमदनगर शहर येथे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नक्की कोणती उलथापालथ होणार आहे. आमदार संग्राम जगताप यांना यावेळेस हॅट्रिक करता येणार का ?

अहमदनगर मतदार संघ हा विधानसभेच्या 288 मतदार संघापैकी 225 वा मतदार संघ आहे. अहमदनगर मतदारसंघांमध्ये अहमदनगर महापालिकेतील हद्द आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड भिंगार परिसराचा समावेश आहे. अहमदनगर शहर हे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जायचे. परंतु 2014 मध्ये शिवसेनेचा फडकता झेंडा खाली घेत संग्राम जगताप यांनी घड्याळाची टिकटिक येथे चालू केली. कारण आता काळ बदलत आहे त्यानुसार वेळही बदलत आहे. त्यामुळेच आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकारणही बदलताना दिसत आहे. चला तर मग थोडक्यात पाहुयात अहमदनगर शहराचा राजकीय इतिहास कसा आहे?

अहमदनगर शहरात पूर्वीपासून फिरोदिया, देशपांडे, पटवर्धन, कळमकर, नवनीत भाई बार्शीकर, आठरे पाटील, या घराण्यांचा 1990 पर्यंत प्रभाव होता. 1985 नंतर जगताप, कोतकर, कर्डिले, गांधी या घराण्यांचा राजकारणात शिरकाव होण्यास सुरुवात झाली होती. 1993 साली स्थानिक स्वराज्य संस्था कायदा लागू झाला. त्या नंतर नगर शहराच्या राजकीय आखाड्यात जगताप, कोतकर, कर्डिले यांच्या सोबत वाकळे, कदम, बोरुडे, फुलसौंदर, आगरकर, जाधव, कळमकर या घराण्यांची एंट्री झाली. यातील बऱ्याच व्यक्तींनी महत्त्वाच्या पदावरून चांगल्या रीतीने जबाबदारी पार पाडलेली आहे. शिवसेनेचे अनिल भैया राठोड यांनी 1990 पासून नेतृत्व याच मतदारसंघाचे नेतृत्व 2014 पर्यंत केले. 2014 मध्ये मोदी लाटेत अनिल भैय्या राठोड यांचा पराभव झाला आणि नगर मतदार संघाची सूत्रे राष्ट्रवादीचे माजी महापौर संग्राम जगताप यांनी घेतली. संग्राम जगताप हे 2019 साली सुद्धा दुसऱ्यांदा आमदार झाले. संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटी नंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना साथ दिली. त्यामुळे संग्राम जगताप सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट म्हणजेच महायुतीमध्ये आहे.

संग्राम जगताप हे अहमदनगर येथे सलग दोन टर्म आमदार म्हणून राहिले आहेत.त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये संग्राम जगताप यांना हॅट्रिक करायचे आहे. त्यामुळे त्यांनी तसे प्रयत्नही चालू केले आहे. परंतु संग्राम जगताप यांची येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक वाटते तेवढी सोपी जाणार नाहीये. जरी आता शिवसेनेकडून अनिल भैया राठोड हे निवडणूक लढवण्यासाठी नसले तरीही त्यांची जागा घेण्यासाठी अहमदनगर शहरातून भरपूर उमेदवार इच्छुक आहेत. इथे विक्रम राठोड, भगवान फुलसुंदर , अभय आगरकर, महेंद्र गांधी, हे इच्छुक आहेत.तसेच येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनेक जण नव्याने विकासासाठी ड्रीम प्रोजेक्ट घेऊन येणार आहेत. तसेच अलीकडील काळात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामध्ये फूट पडली. नगर शहराच्या राजकारणात शिवसेनेच्या सोबतीला भाजपने नेहमीच साथ दिली. मात्र 2018 मध्ये अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि शहरातील राजकारणात बदलून गेले. महापालिका निवडणूक 2018 मध्ये शिवसेनेच्या 24 जागा होत्य. भाजपच्या 14 जागा होत्या. राष्ट्रवादीच्या 18 होत्या. काँग्रेस 5 आणि इतर 7 .

शिवसेनेच्या जागा जास्त असताना सुद्धा भाजपने त्या वेळेस शिवसेनेची साथ सोडत राष्ट्रवादीशी मैत्री केली आणि अहमदनगर महापालिकेत सत्ता स्थापन केली. अहमदनगर महापालिकेत भाजपचा महापौर झाला तोही राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने या घडामोडीत भाजप आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला सत्ते बाहेर ठेवले होते. पुढे 2019 मध्ये राज्यात विधान सभेच्या निवडणुका झाल्या त्यात स्पष्ट बहुमत कोणालाच मिळाले नाही. शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले आणि त्यांनी महाविकास सरकार स्थापन केले. अहमदनगर महानगरपालिकेचे महापौर बाबासाहेब वाकळे यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपला. त्याच वेळेस राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने पुन्हा राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येत त्यांनी सत्ता स्थापन केली. यामध्ये शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर झाल्या. जून 2022 मध्ये शिवसेना फुटली आणि शिवसेना आणि भाजपने महायूती सरकार स्थापन केले. शिवसेना पक्षाचे महानगपलिकेचे नगरसेवक हे शिवसेना उद्धव ठाकरे गटात राहिले. पुढे राष्ट्रवादी फुटली त्यावेळेस नगर शहराचे आमदार संग्राम जगताप अजित पवार गटात गेले. म्हणजे महापालिका विरोधी पक्ष्यात तर आमदार सत्ताधारी पक्षात. असे राजकारण अहमदनगर शहरात सध्या आहे. तसेच आमदार संग्राम जगताप यांनी महायुतीची वाट धरल्यामुळे महाविकास आघाडी कडून अहमदनगर शहराची जागा खाली झाली आहे. त्यामुळे आता शरद पवार अहमदनगर शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार हवा असा तगादा लावत आहेत.

तर अहमदनगर शहर हा असतानाच शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे येथे महाविकास आघाडी मधून शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना ही जागा मिळावी यासाठी उद्धव ठाकरे हट्ट धरून बसलेले आहेत. त्यामुळे आता अहमदनगर शहरातून महाविकास आघाडी मधून ही जागा नक्की कोणाला भेटणार आणि त्यानुसार इथे कोणता उमेदवार उभे राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाविकास आघाडी कडून अभिषेक कळमकर भगवान फुलसुंदर किरण काळे , विक्रम राठोड, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. तसेच अहमदनगर शहरामध्ये दोन विद्यापीठांचे माजी कुलगुरू सर्जेराव निमसे सर यांच्या नावाची चर्चा जोरात चालू आहे. तेही तिकीट मिळवण्यासाठी तयारी करत असल्याचे दिसत आहे. तर महाविकास आघाडी कडून अभिषेक कळमकर यांच्या नावाची देखील चर्चा चालू आहे.

अभिषेक कळमकर हे मूळ राष्ट्रवादीचेच परंतु 2019 च्या निवडणुकीमध्ये त्यांना तिकीट न दिल्यामुळे त्यांनी शिवसेना मध्ये प्रवेश केला होता. तसेच अभिषेक कळमकर आणि संग्राम जगताप यांचे 2019 चे निवडणुकीमध्ये तिकिटावरून खटके उडालेली पहिला भेटलेले आहेत. त्यानंतर आमदार संग्राम जगताप हे अजितदादा गटात गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून ही जागा खाली झाल्यामुळे अभिषेक कळमकर यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यामध्ये प्रवेश केला. तसेच अभिषेक कळमकर यांचे काका माजी आमदार कळमकर हे शरद पवार यांचे खूप एकनिष्ठ मानले जातात. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस कडून नक्की कोणाला तिकीट भेटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जरीही अहमदनगर येथून महाविकास आघाडी यांची उमेदवारी जिंकून आले असले तरीही मूळ असलेला अहमदनगर शहर येथे मात्र भाजपचे उमेदवार सुजय विखे यांना जास्त लीड भेटले आहे.

तसेच लोकसभेला आमदार संग्राम जगताप यांनी सुजय विखे यांचं काम चोखपणे केलेले आहे. त्यामुळे संग्राम जगताप हे निवडून येण्यासाठी इथे नक्कीच विखे मोठी ताकद लावताना दिसणार आहेत. त्यामुळे येणारे आगामी विधानसभा निवडणूक ही देखील नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेनुसार अत्यंत चुरशीची असणार आहे. अहमदनगर हा जातींचा समिश्र मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. जरी इथे जातीय समीकरण हा फॅक्टर महत्त्वाचा असला तरी येथे लोकसभेला मुस्लिम आणि दलित समाजाकडून मतदानाची वाढलेली टक्केवारी ही जगताप यांना मागे खेचू शकते. तसेच महाविकास आघाडी कडून येथे सहानुभूतीचे वारे आहे.

 आता प्रश्न राहतो तो विकास कामांचा. अहमदनगर शहरांमध्ये तसं पाहायला गेलं तर खूप दिवसांपासून उड्डाणपूल याच्याबद्दल चर्चा चालू होती परंतु मागील पाच वर्षांमध्ये हा उड्डाणपूल देखील झालेला आहे. त्यामुळे उड्डाणपूल हा कुणी आणला याच्यापेक्षा उड्डाणपूल हा कोणाच्या काळात झाला हेच महत्त्वाचं ठरत आहे. कारण सामान्य जनतेला उड्डाणपुल हा कोणाच्या काळामध्ये झाला फक्त हेच दिसत आहे. याच्यामागे किती लोकांनी मेहनत घेतली आहे हे मात्र बॅक फुटला जात आहे. तसेच मागील पाच वर्षांमध्ये रस्त्यांची काम उड्डाणपूल सौर ऊर्जा प्रकल्प असे भरपूर काम आहे झाले आहेत. तसेच अहमदनगर शहरी आता हळूहळू बदलत आहे. त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये घड्याळ विरुद्ध तुतारी की मशाल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर मंडळी असा आहे अहमदनगर शहराचा लेखाजोखा. तर मंडळी अहमदनगर शहर येथून कोण आमदार हवा असं तुम्हाला वाटतं.हे आम्हाला कमेंट्स करून कळवा.


Leave a Comment