उदय सामंत एकनाथ शिंदेंना खरंच पर्याय ठरू शकतात? विरोधकांच्या दाव्यात कितपत तथ्य?
शिवसेनेत नविन उदय होईल अशा चर्चा राजकारणामध्ये  रंगताना दिसत आहे.
तर काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेत नवीन उदय होईल असा दावा केला.
तर त्यालाच अनुसरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरती स्वतःचे विचार व्यक्त केले.
संजय राऊत म्हणाले मंत्री उदय सामंत यांच्यासोबत वीस आमदार आहेत.
या सर्व चर्चा रंगल्या होत्या त्यावेळी उदय सामंत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे दावोस दौऱ्यावर होते.
तर हे सर्व आरोप उदय सामंत यांनी फेटाळले आहेत.
तर आता दुसरीकडे अशा चर्चा रंगू लागल्या आहेत की शिवसेनेत उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांना पर्याय असू शकतात का ?
उद्या सामंत यांच्याच नावाची चर्चा का होत आहे?
चला तर पाहूया उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांना खरंच पर्याय ठरू शकतात का?
विरोधकांच्या दाव्यात कितपत तथ्य आहे?
चला तर मुद्द्याचं बोलूया.
“मुद्दा नंबर  १) कोण आहेत उदय सामंत?
उदय सामंत हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
उदय सामंत हे शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांच्यानंतर ज्येष्ठ आणि पक्षातील जबाबदार नेते म्हणून ज्या नेत्यांची नावे घेतली जातात ,यापैकी एक उदय सामंत आहेत.
उदय सामंत हे आताच्या महायुती सरकारमध्ये उद्योग आणि मराठी भाषा मंत्री आहेत.
शिंदे सरकारच्या कार्यकाळातही ते उद्योगमंत्री होते.
तर ठाकरे सरकारच्या महाविकास आघाडीच्या कार्यकाळात त्यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण खातं होतं.
शिवसेनेत बंड झाल्यानंतर सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्यासोबत 16-17 आमदार होते.
नंतर या आमदारांची संख्या 40 पर्यंत पोहचली.
यावेळी उदय सामंत हे शिंदे गटात अगदी शेवटच्या टप्प्यात सामील झाले होते.
परंतु या बंडात सामंत यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते.
सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध असणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे.
आताच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही ते जवळचे मानले जातात.
मुद्दा नंबर 2) उदय सामंत यांचा राजकीय इतिहास कसा आहे?
 2004 ते 2024 गेली पाच टर्म ते आमदार म्हणून निवडून येत आहेत.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसमधून त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
2004 साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले.
त्यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते.
 भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून ते निवडून आले.
यानंतरच्या काळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला.
नगरविकास राज्यमंत्री, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, शिवसेनेचे संपर्क प्रमुख, उपनेते, म्हाडाचे अध्यक्ष, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि त्यानंतर उद्योग आणि मराठी भाषा विभाग मंत्री अशी खाती आणि पदं त्यांनी आतापर्यंत सांभाळली आहेत.
मुद्दा नंबर ३)  एकनाथ शिंदे केव्हा सावध झाले?
उदय सामंत हे उद्धव ठाकरे सरकारमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री होते.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेनेत बंद झालं.
शिवसेनेचे 40 आमदारांनी शिंदे यांना साथ दिली.
या 40 आमदारांमध्ये उदय सामंत यातीलच एक होते.
आत्ता नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं.
भाजप हा पक्ष क्रमांक एकचा ठरला.
तरीदेखील मुख्यमंत्रीपद आणि खातेवाटप यावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळालं.
याच दरम्यान एकनाथ शिंदे नाराज असल्याचेही बातम्या वारंवार समोर येत होत्या.
तसेच एकनाथ शिंदे नाराज होऊन दरेगावला गेल्याचेही चर्चा होत होत्या.
तर आता या सर्व गोष्टी व्यवस्थित होत नाही तोच आता पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये गोंधळ उडायल्याच चित्र दिसत आहे.
रायगड आणि नाशिक येथील पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे.
तर यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे मात्र दावोस दौऱ्यावर होते. त्यावेळी दोन जिल्ह्यांच्या नियुक्तांना स्थगिती देण्यावरून चर्चा रंगली होती, तर विरोधकांनी शिवसेनेत नवीन उदय होणार असल्याचा दावा केला.
तसेच या सर्व गोष्टींमध्ये एकनाथ शिंदे देखील नाराज असल्याचा दावा विरोधकांकडून होत आहे.
तसेच ही चर्चा राजकीय वर्तुळात देखील पाहायला मिळत आहे.
या सर्व गोष्टींवरूनच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, एकनाथ शिंदे यांची गरज संपली का?
आता कदाचित एकनाथ शिंदे यांना बाजूला व्हावे लागेल. उद्धव ठाकरे यांना संपवून एकनाथ शिंदे यांना आणलं.
आता शिंदे यांना संपवून नवीन उदय पुढे येत आहे.
हा उदय कुठला असेल? त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न होईल. शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत ही परिस्थिती महाराष्ट्रात येणार आहे.
हा सर्व दावा करताना विजय वडेट्टीवाऱ् यांनी उदय सामंत यांचा स्पष्ट उल्लेख केला नाही.
परंतु संजय राऊत यांनी मात्र बोलताना उदय सामंत यांचे नावाचा स्पष्ट उल्लेख केला.
संजय राऊत म्हणाले भाजपची ही कुटनीति आहे. याला संपव,  त्याला संपव, हा पक्ष फोडा.
एकनाथ शिंदे यांच्या भविष्यात सुद्धा तेच होणार आहे. जे त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत केलं.
संजय राऊत पुढे म्हणाले उदय सामंत यांचे नावच घ्या ना, त्यांना देवेंद्र फडवणीस दावोसला घेऊन गेले आहेत.
उदय सामान यांच्यासोबत माझ्या माहितीप्रमाणे २० आमदार आहेत.
जेव्हा मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे रुसले होते तेव्हाच उदय होणार होता.
तेव्हाच हा उदय करण्याचे निश्चित झाले होते.
परंतु एकनाथ शिंदे हे सावध झाले आणि झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवली.
मुद्दा नंबर ४) या सर्व गोष्टींवर उदय सामंत यांचे स्पष्टीकरण काय आहे?
सर्वप्रथम उदय सामंत यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
उदय सामंत यांनी सांगितले की मी दावोसला पोहोचल्यानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया पाहिली.
संजय राऊत यांनी केलेले विधान पूर्णपणे खोटे आहे.
एकनाथ शिंदे यांनी जो राजकीय उठाव केला त्यावेळी मी त्यांच्यासोबत होतो.
त्यामुळे मला दोनदा राज्याचे उद्योग मंत्री पद मिळालं याची मला जाणीव आहे.
त्यामुळे एकनाथ शिंदे सारख्या मोठ्या नेत्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला राजकारणात घडवण्यासाठी जे प्रयत्न केले आहेत ते मी कधीही विसरू शकणार नाही.
माझ्या आणि एकनाथ शिंदे यांच्या संबंध राजकारणा पलीकडचे आहेत
त्यामुळे कोणी आमच्या दोघांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणार नाही.
मुद्दा नंबर ५)  खरंच उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांना पर्याय ठरू शकतात का?
उदय सामंत यांनी विरोधकांच्या दाव्यावर स्पष्टीकरण दिले असले तरी,  यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये नवीन उदय होणार का ? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
कारण उदय सामंत यांची  देवेंद्र फडवणीस यांच्याशी असलेली जवळीक ही सर्वांनीच पाहिलेली आहे.
तसेच उदय सामंत यांची राजकीय कारकीर्द ही अशीच आहे.
कारण एकनाथ शिंदे बंड करतील आणि मुख्यमंत्री होतील असं कोणालाही वाटलं नव्हतं पण त्यांच्या मागे महाशक्ती होती.
कोणाच्याही  मागे महाशक्ती उभी राहिली तर महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही शक्य आहे .
उदय सामंत यांना ताकद दिली जाऊ शकते ही शक्यता नाकारता येत नाही.
तर आता हे सर्व भाजपचे नेतृत्वाने काय ठरवलं आहे आणि सावंत यांची राजकीय इच्छाशक्ती काय आहे यावरती अवलंबून आहे..
मुद्दा क्रमांक ६) विरोधकांच्या दाव्यात कितपत तथ्य आहे?
उदय सामंत यांच्या बद्दल अशा चर्चा करण्यामागे राजकीय रणनीतीचा भाग असू शकतो.
सत्ता स्थापनेवेळी एकनाथ शिंदे यांनी काही टोकाची भूमिका घेतली नव्हती.
जरी शिवसेनेने टोकाची भूमिका घेतली असती तरीदेखील अजित पवार हे भाजपसोबत होते.
यामुळे भाजपला सत्ता स्थापन करण्यात कोणती अडचण नव्हती.
शिवाय वीस आमदार असून काय करणार कारण पक्ष फोडायचं म्हटलं तर दोन तृतीयांश आमदार आवश्यक आहेत.
त्यामुळे या गोष्टींमध्ये तथ्य वाटत नाही.
तर महायुतीच्या सत्ता स्थापनेच्या वेळी शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद मिळणार हे स्पष्ट झाले होते.
परंतु स्वतः एकनाथ शिंदे यामध्ये सामील होणार की नाही याबाबत काही काळ अपष्टता होती.
त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदास नकार दिल्यास उदय सामंत यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती.
परंतु एकनाथ शिंदे यांनी माझ्या ऐवजी दुसरे कोणालातरी उपमुख्यमंत्री पद द्या, असे देखील सांगितले नव्हते.
तर एकनाथ शिंदे यांची इच्छा होती मी अजून एक वर्ष मुख्यमंत्री राहावा.
त्यामुळे एकनाथ शिंदे यांना सरकारमध्ये राहायचेच होते हे दिसत आहे.
त्यामुळे एकनाथ शिंदे हे सरकार मधून बाहेर पडणार नव्हते. त्यामुळे उदय सामंत यांना नवीन शिवसेना स्थापन करण्याची गरज नव्हती. त्यामुळे या सर्व गोष्टींमध्ये विरोधकांच्या दाव्यात कोणतेही तथ्य वाटत नाही. असा दावा देखील ज्येष्ठ  पत्रकार यांनी केला आहे.
तर मंडळी शिवसेना एकनाथ शिंदे गटात फूट पडणार यामध्ये कितपत तथ्य आहे हे आम्हाला कमेंट्स करून कळवा

By satta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *