एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात नवा वाद पेटला!
महाराष्ट्रामध्ये नेत्यांचं सध्या चाललंय तरी काय असा प्रश्न आता पडत आहे कारण की शेतकऱ्यांची कर्जमाफी, निवडणूकीत दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी काय करता येईल का? हे पाहायचे सोडून आता राजकारणामध्ये वेगळ्याच गोष्टी जास्त रंगताना पाहायला दिसत आहे.
त्या गोष्टी म्हणजे नुकतेच धनंजय मुंडे यांच्या वरती करुणा शर्मा यांनी काही आरोप केले होते तसेच जयकुमार गोरे यांच्या वरती देखील एका महिलेने आरोप केले होते. त्यातच असेच आरोप एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या वरती केले होते.
आता त्याच केलेल्या आरोपामुळे या दोघांमधील वाद हा उफळला असून आता हा वाद एकनाथ खडसे यांना कोर्टापर्यंत खेचणार आहे. पण तो कसा?
चला तर पाहूया माजी मंत्री एकनाथ खडसे आणि भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये नक्की काय वाद झालेला आहे?
असा कोणता वाद आहे ज्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावरती अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे.
मुद्दा क्रमांक १) एकनाथ खडसेंनी गिरीश महाजन यांच्यावर नेमके कोणते आरोप केले होते?
एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन आणि एक महिला आयएएस अधिकारी यांच्यात संबंध आहेत. याची कल्पना केंद्रीय मंत्री अमित शाह यांनादेखील आहे. एका पत्रकाराच्या हवाल्याने त्यांनी हा दावा केला आहे. विशेष म्हणजे अमित शाहा आणि माझी कधी भेट झालीच तर मी महाजन यांच्यावरील या आरोपांबाबत विचारणार आहे, असंही त्यांनी सांगितलंय. खडसे यांच्या आरोपांनंतर आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
मुद्दा क्रमांक २) गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना काय उत्तर दिले होते?
गिरीश महाजनांनी यावेळी एकनाथ खडसेंना खडेबोल सुनावले होते.खोटं बोलताना लाज वाटत नाही. माझं अजूनही त्यांना आव्हान आहे की, त्यांनी एक पुरावा दाखवावा. माझा आता त्यांनी अंत पाहू नये. मी एका गोष्टीचा खुलासा केला, तर तोंड काळं करूनच बाहेर पडावं लागेल. घरातलीच गोष्ट आहे. पण मी ती बोलणार नाही, अशा थेट इशाहारी महाजन यांनी खडसे यांना दिलाय. मला बोलयला लावू नका. खडसे यांनी एका भोंदू पत्रकाराला सांगून हा विषय उचलायला लावला. त्यातूनच हे सगळं समोर आलं आहे, असंही त्यांनी म्हटलंय.
मुद्दा क्रमांक ३) गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे का ?
माजी मंत्री एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील राजकीय शत्रुत्व सर्वांनाच माहित आहे.
हे दोघे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही.
परंतु काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्या चरित्रावर प्रश्नचिन्ह निर्माण होतील असे गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.
त्यामुळे गिरीश महाजन यांनी कठोर पाऊल उचलून थेट आमदार एकनाथ खडसे आणि पत्रकार अनिल थत्ते यांना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे.
यावरती गिरीश महाजन यांनी सांगितले की कोणीही यावं आपल्यावर काहीही आरोप करावेत हे आपण आता सहन करणार नाही.
यामुळे समाजातील आपली प्रतिमा मलिन होते.
त्यामुळे आता आपण मुंबईतील वकिलांमार्फत एकनाथ खडसे आणि पत्रकार अनिल थत्ते यांना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे.
तसेच अशा लोकांनी विरोधात आता मी कोर्टातच लढणार असल्याचं भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली आहे.
आता एकंदरीतच असे प्रकरण आपण राजकारणात पाहत असतोच आणि हे राजकारणी नेते महागाई विरोधात, शेतकऱ्यांची कर्जमाफी या गोष्टींवर जास्त भर देण्यापेक्षा हे एकमेकांच्या खाजगी आयुष्यभर जास्त बोलताना दिसत आहे.
यामधून यांना काय साध्य करायचं असतं असं देखील प्रश्न पडतो शेवटी हे राजकारण आहे परंतु असल्या खाजगी आयुष्यावर राजकारण्यांनी चर्चा करण्यापेक्षा जनतेसाठी काय करता येईल यावरती जर चर्चा केल्या तर ते फायद्याचे ठरेल.
स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्याच खाजगी आयुष्यच्या चर्चा करून यामध्ये जनतेचा काही फायदा होत नाही.
तर मंडळी अशा नेत्यांबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट्स करून कळवा.