एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार?
विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार स्थापन झाले आहे.

परंतु प्रचंड बहुमत भेटून देखील महायुतीत खातेवाटप,मंत्रिपदं,पालकमंत्रिपदं यावरुन नाराजीनाट्य रंगल्याचं दिसून आलं होतं.
सत्ता येऊन आता जवळपास तीन महिने उलटले असले तरी नाराजी,कुरघोडीचं राजकारण सुरू आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबाबत खळबळजनक दावा करण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही भाजपमध्ये विलीन होणार आहे असा दावा संजय राऊत यांनी केला आहे
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे शिवसेना यांच्या आमदारांची सुरक्षा देखील कपात केली आहे.
त्यामुळे एकनाथ शिंदे यांना सगळीकडून घेरण्यात आले आहे.
जे उद्धव ठाकरे यांच्या सोबत घडले तेच एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत होणार का?
एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरंच भाजपमध्ये विलीन होणार का?
देवेंद्र फडवणीस यांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या आमदारांची सुरक्षेत कपात का केली?
तर या सर्व गोष्टींबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया.
चला तर मुद्द्याचं बोलूया
मुद्दा क्रमांक एक एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार का आणि ती कधी होणार?
सध्या महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन टायगरची जोरदार चर्च सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरे शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी एक दावा केला आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही भाजपमध्ये विलीन होणार आहे.
तसेच कोकणातील एका नेत्याच्या नेतृत्वाखाली एक मोठा आमदारांचा मोठा गट भाजपमध्ये दाखल होणार असल्याचं खळबळजनक विधान केलं आहे.
आधीच एकनाथ शिंदे हे महायुतीत नाराज असल्याच्या चर्चांना जोर आलेला असतानाच आता राऊतांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकारण पेटण्याची शक्यता आहे.
संजय राऊत म्हणाले, भाजप व एकनाथ शिंदे हे भविष्यात एकत्र राहणार नाही.
शिंदेंचं काम झालेलं आहे.
आता त्यांचं काम तमाम होणार आहे, हे आता सर्वांना दिसत आहे.
हे त्यांनाही माहिती आहे. त्यांच्या लोकांनाही माहिती आहे,असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
तसेच एक गोष्ट तुम्ही स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या की, विधानसभेच्या 2029 च्या निवडणुकीत चित्र पूर्ण बदललेले असेल. एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा एकही आमदार निवडून येणार नाही असाही दिवस असेल. त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन होईल किंवा त्या पक्षातील एक मोठा गट हा कोकणातील नेत्याच्या नेतृत्वाखाली भाजपबरोबर जाईल, असा दावा राऊतांनी करत राजकारण तापवलं आहे.
पुढे राऊत म्हणाले,सत्ता,पैसा यांचा दबाव आहे. पण आम्ही खचणारे लोक नाहीत.
जे जात आहेत, त्यांना जाऊ द्या. काहीतरी अडचणी आहेत.
जुन्या केसेस काढल्या जात असून काही लोकांची मनं कमकुवत झाली आहेत. लढण्याची इच्छाशक्ती नसलेले लोकच जात आहेत.मुर्दाड लोकांना ठेवून तर काय करायचं असा हल्लाबोलही राऊतांनी यावेळी केला आहे.
याचदरम्यान, त्यांनी जे कोणी पक्ष सोडतायत ते पदाधिकारी आहेत,असंही दावा केला आहे. याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पुढच्या दोन दिवसांत एक महत्त्वाची बैठक होणार असल्याचं सांगितलं आहे. त्यात आम्ही काही जणांना नव्यानं जबाबदाऱ्या देणार असल्याची भूमिकाही राऊतांनी यावेळी स्पष्ट केली आहे.
तर आता या सर्व गोष्टींमुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरंच भाजपमध्ये विलीन होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुद्दा क्रमांक दोन ) देवेंद्र फडवणीस यांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या आमदारांची सुरक्षेत कपात का केली?
महायुतीत गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरु असल्याचं लपून राहिलेलं नाही.
महायुतीतील प्रमुख नेत्यांनी मात्र हे कोल्ड वॉर असल्याचं सातत्यानं फेटाळून लावलं आहे. यातच आता महायुती सरकारमधून मोठी माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्रिपदासह गृहखातं ताब्यात असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला धक्का दिल्याची चर्चा आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या काही आमदारांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
 या निर्णयामुळे आधीच पालकमंत्रिपद,परिवहन खात्यासंबंधी निर्णय घेतल्यानंतर आता आता शिंदेंच्या नेत्यांच्या सुरक्षेमध्ये कपात केल्यामुळे सरकारमध्ये नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांना सध्या राज्य सरकारकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात येत आहे.
पण आता ज्या नेत्यांना सुरक्षेची आवश्यकता नाही अशा नेत्यांबाबत फडणवीसांच्या गृहखात्यानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आधीपासूनच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिंदेंच्या नेत्यांना पुरवण्यात येत असलेल्या सुरक्षेवरुन सरकारवर टीकेची झोड उठवली जात होती. तसेच त्यांना देण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्याची मागणी केली जात होती.
पण आता या निर्णयामुळे मात्र महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेकडून संताप व्यक्त केला जात आहे.
 पण आता या निर्णयामुळे शिवसेना नेत्यांसोबतच भाजप आणि राष्ट्रवादीतील काही नेत्यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे. ज्या नेत्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही, अशा शिवसेनेच्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आल्याची माहिती मिळतेय.
भाजप नेते रवींद्र चव्हाण,प्रताप चिखलीकर यांच्यासह अनेक नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील व्हीआयपी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला असून ज्या नेत्यांच्या जीवाला धोका नाही. त्यांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आधी शिंदेसेनेच्या आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्यात येत होती. त्यामुळे या आमदारांच्या पाठीमागं-पुढं आणि घराबाहेरही सतत पोलिसांची सुरक्षा व्यवस्था तैनात असायची. ही सर्व सुरक्षा आता हटवण्यात आली आहे. नव्या नियमानुसार,शिंदेंच्या आमदारांसोबत आता एकच सुरक्षा रक्षक असणार आहे.
तर मंडळी देवेंद्र फडवणीस यांचा हा निर्णय योग्य आहे का हे आम्हाला कमेंट्स करून कळवा

By satta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *