सोलापूर जिल्हा म्हटलं की सर्वांचे लक्ष लागतं ते म्हणजे करमाळा या विधानसभा मतदारसंघ निवडणुकीकडे. करमाळा तालुक्यामध्ये नेहमीच गटातटाचे राजकारण पाहायला भेटल आहे. तसेच येथील पारंपारिक घराणे पाटील, बागल, जगताप यांच्यामध्ये निवडणूक होताना दिसली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये माढा या लोकसभा मतदारसंघांमधून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला चांगले लीड भेटले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात गेलेले संजय शिंदे यांची आमदारकी धोक्यात आली आहे का? तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून येथून कोणत्या चेहऱ्याला उमेदवारी भेटणार? पुन्हा एकदा पारंपरिक घराण्यातील निवडणूक पाहायला भेटणार का? चला तर पाहुयात करमाळा या विधानसभा मतदारसंघ येथे नक्की काटो की टक्कर कोणामध्ये होणार आहे ,?
आज आपण जाणून घेणार आहोत करमाळा या विधानसभा मतदारसंघाबद्दल. करमाळा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचा बालेकिल्ला मानला जातो. करमळा हा विधानसभा मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यामध्ये येतो. करमाळा विधानसभा मतदारसंघ क्रमांक २४४ आहे. हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. करमाळा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका आणि माढा तालुक्यातील रोपाळे, कुर्डुवाडी ही महसूल मंडळे आणि कुर्डुवाडी नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. करमाळा हा विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघात मोडतो. अपक्ष उमेदवार संजयमामा विठ्ठलराव शिंदे हे करमाळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. संजय मामा शिंदे सध्या हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे उमेदवार आहेत .
२०१९ मध्ये संजय मामा शिंदे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती परंतु ते मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्यामुळे निवडून आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस फुटी नंतर संजय मामा शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गट यांना साथ दिली त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांसाठी संजय मामा शिंदे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे कोणाला उमेदवारी देणार असा प्रश्न होता. सध्या तालुक्यात पारंपारिक घराणे पाटील-बागल- जगताप-शिंदे गटात लढत पहायला मिळत आहे.
तर १९९९ नंतर प्रत्येक विधानसभेलां नवा चेहरा निवडून येत आहे. १९९९ ला कै. दिगंबरराव बागल अपक्ष निवडून आले होते, २००४ मध्ये शिवसेनेकडून जयवंतराव जगताप आमदार झाले होते. २००९ मध्ये राष्ट्रवादी कडून माजी आमदार श्यामल बागल निवडून आल्या होत्या, २०१४ मध्ये शिवसेनेकडून माजी आमदार नारायण आबा पाटील निवडून आले होते तर २०१९ ला विद्यमान आमदार संजयमामा शिंदे अपक्ष निवडून आले आहेत. करमाळ्याचा मागील इतिहास पाहिला तर राज्यात ज्या पक्षाचे सरकार येते त्यावेळी करमाळ्यातील जनतेने विरूद्ध कौल दिल्याचा इतिहास आहे. १९७८ साली राज्यात जनता दलाची लाट होती. त्यावेळी पाच उमेदवार होते. काँग्रेसचे नामदेवराव जगताप यांनी जनता दलाचे गिरधरदास देवी यांचा पराभव केला होता. १९८० साली राज्यात व देशात काँग्रेसची विरुद्ध लाट होती . परंतु राज्यातील लाटेच्या विरूद्ध काँग्रेसचे नामदेवराव जगताप यांना निवडून दिले.
तर पुढे १९८५ साली काँग्रेसने एकत्र लढून त्यांचे सरकार राज्यात आले पण याच मतदारांनी काँग्रेसचे नामदेवराव जगताप यांना पराभूत केले. त्यावेळी अपक्ष उमेदवार रावसाहेब पाटील यांना निवडून दिले. तर जगताप यांना २३९५६ मत मिळाली होती. तसेच १९९० साली देशात जनता दलाची सत्ता होती. त्यावेळी जनता दलाकडून रावसाहेब पाटील उभे होते. त्यावेळचे पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंग यांची करमाळा येथे सभा होऊनही अपक्ष उमेदवार जयवंत जगताप यांनी जनता दलाचे उमेदवार रावसाहेब पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर १९९५ साली राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले त्यावेळी अपक्ष उमेदवार कै. दिगंबरराव यांनी काँग्रेसच्या जयवंतराव जगताप मते) यांचा पराभव केला होता. तर युतीचे उमेदवार तिसऱ्या स्थानी होते.
१९९९ साली युती विरूद्ध कौल जाऊन राज्यात पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार आले. त्यावेळी सर्वजण वेगवेगळे लढले अपक्ष उमेदवार कै दिगंबरराव बागल यांनी काँग्रेसचे उमेदवार जयवंत जगताप आणि प्रथमच निवडणूक लढविणारे राष्ट्रवादीचे उमेदवार नारायण पाटील यांचा पराभव केला. २००४ मध्ये राज्यात पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी ची सत्ता आली परंतु तालुक्यातील राजकारणात मात्र ट्विस्ट आला, काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढल्यामुळे करमाळ्याची जागा राष्ट्रवादीला गेली आणि राष्ट्रवादी कडून त्यावेळचे अपक्ष आमदार दिगंबरराव बागल यांना राष्ट्रवादीचे तिकीट मिळाले. काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्यामुळे माजी आमदार जयवंत जगताप यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि उमेदवारी मिळविली या निवडणूकीत १९९९ निवडणूक लढविलेले राष्ट्रवादीचे नारायण पाटील यांनी माघार घेतली आणि शिवसेनेचे उमेदवार जयवंत जगताप यांना पाठिंबा दिला. राज्यात पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी ची सत्ता आली आणि नेहमी प्रमाणे तालुक्यातील जनतेने सत्ता विरूद्ध कौल दिला शिवसेनेचे जयवंत जगताप यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार कै दिगंबरराव बागल यांचा पराभव केला.
२००९ विधानसभा निवडणूकीत मतदारसंघ पुनर्रचना झाली आणि करमाळा मतदारसंघाला माढा तालुक्यातील ३६ गावांचा समावेश करण्यात आला. माजी आमदार दिगंबरराव बागल यांचे २००६ साली आकस्मिक निधन झाले आणि त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी श्यामल बागल यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात आली. तर २००४ निवडणूकीत माघार घेतलेले राष्ट्रवादीचे नारायण पाटील यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून जनसुराज्य शक्ती पार्टी कडून निवडणूक लढवली. त्यावेळचे शिवसेनेचे विद्यमान आमदार जयवंत जगत शिवसेनेशी बंडखोरी करून समाजवादी पार्टी कडून निवडणूक लढविली. या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारने निवडणूक लढविली. या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार श्यामल बागल यांनी जनसुराज्य चे नारायण पाटील आणि समाजवादीचे जयवंतराव जगताप यांचा पराभव केला तर शिवसेनेचे उमेदवार सुर्यकांत पाटील मोजकेच मध्ये मिळाली.
२०१४ विधानसभा निवडणूक वेळी राज्यात मोदी लाट म्हणजेच काँग्रेस- राष्ट्रवादी विरोधी लाट होती. विधानसभा निवडणूकीच्या १ वर्षे अगोदर माजी आमदार नारायण पाटील यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आणि शिवसेनेत प्रवेश केला आणि उमेदवारी मिळविली. राज्यात शिवसेना-भाजप यांची युती तुटली तर काँग्रेस-राष्ट्रवादी ने आपली आघाडी तोडून स्वतंत्र लढण्याचा निर्णय झाला. करमाळा तालुक्याचा इतिहास पाहिला तर तालुक्यात नेहामीच गटातटाचे राजकारण होत आले आहे. पारंपारिक पाटील-बागल-जगताप गटात निवडणूका होत होत्या. परंतु २०१४ विधानसभा निवडणूकीत तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सध्याचा आमदार संजय शिंदे यांनी करमाळा विधानसभा लढविण्याचा निर्णय घेतला.
शिवसेना कडून नारायण पाटील, राष्ट्रवादी कडून त्यावेळचे आमदार श्यामल बागल यांची कन्या रश्मी बागल तर काँग्रेस कडून जयवंत जगताप आणि भाजप महायुती पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे संजयमामा शिंदे यांनी निवडणूक लढविली या निवडणूकीत शिवसेनेचे उमेदवार नारायण पाटील घेऊन राष्ट्रवादीच्या उमेदवार रश्मी बागल आणि काँग्रेसचे जयवंतराव जगताप यांचा पराभव केला. २००९ विधानसभा प्रमाणेच तालुक्यातील जनतेने राज्यात ज्या पक्षांचे सरकार त्याच्या बाजूने कौल दिला. तर आता येणाऱ्या 2024 मधील विधानसभा निवडणुकीसाठी करमाळा येथील राजकारण बरेच गुंतागुंतीचे झालेले दिसत आहे. महायुतीकडून विद्यमान आमदार संजयमामा शिंदे राष्ट्रवादी अजित पवार गट , भाजप नेत्या रश्मी बागल (भाजप), शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश चिवटे (शिवसेना शिंदे गट) या तिघांची नावे चर्चेत आहेत. तिघांपैकी कुणा एकाला उमेदवारी मिळाणार असून महायुतीत बंडखोरी होणार जवळजवळ निश्चित आहे. त्यामुळे महायुतीमध्ये पेच निर्माण झाला आहे.
बंडखोरी मुळे मतविभागणीचा फटका आहे तर मविआ कडून नारायण आबा पाटील पक्षातून उमेदवारी जाहीर झालेली असल्यामुळे मविआ चा मार्ग सध्या मोकळा झालेला आहे. मविआ मध्ये बंडखोरी होणार नाही याचा फायदा नारायण आबा पाटलांना होणार आहे. करमाळा विधानसभा मतदारसंघ येथून महा युतीकडून संजय मामा शिंदे यांच्याविरुद्ध महविकास आघाडीचे नारायण पाटील हे उमेदवार असतील. महाविकास आघाडीकडून माजी आमदार नारायण पाटील यांना उमेदवारी देण्याचं निश्चित झाल्याचे समजते कारण सोलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होता या मेळाव्यामध्ये जयंत पाटील यांनी नारायण पाटील यांना करमाळा मधून उमेदवारी जाहीर केले आहे. तसेच २०२४ मध्ये करमाळा या विधानसभेची जागा कोणाला सुटणार यावर सर्व गणिते अवलंबून राहणार आहेत रश्मी बागल संजय शिंदे हे दोघेही उमेदवारीसाठी स्पर्धेत आहेत. तर महाविकास आघाडी कडून नारायण पाटील यांची जागा फिक्स समजली जाते कारण त्यांना मोहिते पाटील यांचा सपोर्ट मिळेल अशा चर्चा रंगल्या आहेत. तर करमाळा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे हे करमाळा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहे असं बोलले होते परंतु त्यांनी हे पण बोललं होतं की पक्षाने माजी आमदार नारायण पाटील यांना उमेदवारी दिली तर आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्याचवेळी जयंत पाटील यांनी नारायण पाटील यांच्याच पाठीशी आपल्या सर्वांना उभे राहायचे आहे असे सांगितले.
यावरून समजते की करमाळा येथून महाविकास आघाडीकडून माजी आमदार नारायण पाटील यांना उमेदवारी भेटेल. माजी आमदार नारायण पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तर त्यावेळी भाजपकडूनही नारायण पाटील यांना आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न झाला होता परंतु नारायण पाटील यांनी राष्ट्रवादीत जाणे पसंत केले. तर नारायण पाटील हे अगोदर एकनाथ शिंदे यांचा पक्ष शिवसेना शिंदे गट यांना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पडत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात प्रवेश केला. त्यामुळे त्यांच्या निष्ठेची कदर करून विधानसभेची उमेदवारी जाहीर केल्याचे मानले जात आहे तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांना करमाळा विधानसभा मतदारसंघातून तब्बल 41 हजार चे मताधिक्य मिळाले होते त्यामुळे याच्यामध्ये माजी आमदार नारायण पाटील यांचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते.
या सर्व गोष्टी पाहता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूक मध्ये करमाळा येथून महायुतीकडून संजय मामा शिंदे यांच्याविरुद्ध महाविकास आघाडी कडून माजी आमदार नारायण पाटील अशी लढत होईल. ही लढाई तशी आपल्याला अटीतटीची पाहायला मिळेल तसेच करमाळा मतदार नारायण पाटील यांना साथ देणार की पुन्हा एकदा संजय मामा शिंदे यांना पसंती देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुक निकालावरून असेच वाटत आहे की करमाळा येथे महाविकास आघाडी यांचे पारडे जड राहणार आहे. तर मित्रांनो करमाळा या विधानसभा निवडणुकीमध्ये कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटते हे आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगा.