कृष्णा आणि कोयना या नद्यांच्या संगमावर हे गाव वसले आहे. त्या संगमाला ’प्रीतिसंगम’ असे म्हणतात. महाराष्ट्रातील काही लक्षवेधी लढतींपैकी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे पाहिले जाते. सातारा जिल्ह्यातील ‘कराड दक्षिण’ हा असा मतदारसंघ की ज्यामध्ये काँग्रेसचा कधी पराभवच झाला नाही. कराड दक्षिण हा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. असं असलं तरी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला इथून मताधिक्य मिळालं होतं.  पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसचा बालेकिल्ला राखण्यात यश मिळणार का?  लोकसभा निवडणुकीचा परिणाम दक्षिण कराड येथे विधानसभा निवडणुकीवर दिसणार का?  चला तर पाहूया दक्षिण कराड येथे नक्की चाललय तरी काय ?
आज आपण पाहत आहोत कराड दक्षिण या विधानसभा मतदारसंघांमध्ये येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी येथे राजकारणामध्ये काय उलथापालथ झालेली आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ क्रमांक २६० आहे. कराड दक्षिण मतदारसंघात सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील कोळे, उंडाळे, काळे, शेणोली, कराड ही महसूल मंडळे आणि कराड नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. कराड दक्षिण हा विधानसभा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघात मोडतो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण हे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे चव्हाण पृथ्वीराज दाजीसाहेब 92,296 मते मिळवून विजयी झाले. भाजपा पक्षाचे डॉ. अतुलबाबा सुरेश भोसले यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयाचे अंतर: 9,130 मते एवढे होते.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे चव्हाण पृथ्वीराज दाजीसाहेब 76,831 मते मिळवून विजयी झाले. गेल्या पाच वर्षात भाजपा नेते अतुल भोसले यांनीही जोरदार तयारी केली आहे.  अतुल भोसले हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे समजले जातात. सातारा लोकसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांना विजयी करण्यात अतुल भोसले यांचा सिंहाचा वाटा होता. पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांच्या मतदारसंघातच हरवण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले आहे. अतुल भोसले यांना ताकद दिली आहे. कोट्यवधींची विकास कामे अतुल भोसलेंनी कराड दक्षिणमध्ये आणली आहेत. त्यामुळे या मतदारसंघात भाजपची ताकद वाढत आहे. अशा मतदारसंघात गेल्या दोन निवडणुकांपासून भाजपसोबत वाढलेल्या चुरशीचा यंदाही काँग्रेसला सामना करावा लागणार आहे.  नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूक निवडणूक म्हणजे विधानसभेसाठी असणारे सेमी फायनल निवडणूक होती त्यामुळे या निवडणुकीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघ प्रतिष्ठानला लावून काम करत होते.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हे त्याला अपवाद नाही पण काँग्रेस विचारांचा मतदारसंघ म्हणून ओळख असलेला या मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपने एवढे मताधिक्य भेटल्याने डॉक्टर अतुल भोसले हे विधानसभेची निवडणूक जिंकतील अशी चर्चा सुरू झाल्या आहेत . कारण दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस विचारांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. आजपर्यंत या जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि भाजपची लाट आली तरी या मतदार संघाने काँग्रेसचाच आमदार निवडून दिला आहे.  कराड दक्षिण मतदार संघामध्ये दिवंगत यशवंतराव मोहिते विलासराव पाटील उंडाळकर यांनी नेतृत्व केले आहेत तर सध्या काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण नेतृत्व करत आहेत. भाजपचे नेते अतुल भोसले यांनी यापूर्वी दोन वेळा करा दक्षिणमधून कडवी झुंज दिली होती. परंतु त्यावेळी त्यांना यश आले नाही मात्र त्यांनी आपली चिकाटी सोडलेली नाही.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूक मध्ये भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना 616 मतांचे मताधिक्य यांना मिळाले आहे. या मतांनी उदयनराजे भोसले यांच्या विजयाला हातभार लावला आहेच पण आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी डॉक्टर अतुल भोसले यांनाही विधानसभेसाठी फायदा होणार आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहे. कारण उंडाळकर गट माघार घेईल अशा अपेक्षा फेल झाल्याने कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील लढत तिरंगी मात्र चुरशीची लढत निश्चित झाले आहे. कारण आता इथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यासमोर मोठे टार्गेट पेलण्याचे आव्हान आहे. ते आव्हान पेलताना त्यांना अनेक समस्यांशी सामना करावा लागणार आहे.  एकीकडे भाजप ताकद उभी करत असताना उंडाळकर गटाने बंडखोरीचा झेंडा फडकविल्याने राजकीय गुंतागुंत वाढले आहे अतुल भोसलेंची ताकद वाढवत आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून अनेक गट विभक्त होत आहेत.
 आमदार आनंदराव पाटील यांच्यासह मच्छिंद्र सकटे पालिकेतील राजेंद्र यादव यांचा गट विभक्त झाला आहे  अशा स्थितीत रयत संघटनेतर्फे अँड उदयसिंह पाटील उंडाळकर यांची रिंगणातील उमेदवारी कोणाला अडचणीची ठरणार आहे हे महत्त्वाचे आहे. तसेच पृथ्वीराज चव्हाण गटाचे आमदार आनंदराव पाटील भाजपकडे झुकले आहेत पालिकेतील यादव गटाने भाजपशी हात मिळवणे केले आहे. बहुतांशी नगरसेवक वेगवेगळ्या पातळीवर भाजपच्या गोटात आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये कमी मते मिळाल्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी कसे प्रयत्न करता येईल याकडे आता महाविकास आघाडी जास्त लक्ष देत आहे. भाजपकडून कृष्णा उद्याोग समूहाचे नेते डॉ. अतुल भोसले यांची उमेदवारी निश्चित आहे. तर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण की रयत संघटनेचे प्रबळ नेते अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यापैकी कोणाला काँग्रेसची उमेदवारी मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे. या दोघांतील स्पर्धेमुळे कराड दक्षिणमध्ये पक्षाच्या वर्चस्वाला यंदा झळ बसू शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. तर मंडळी अशी आहेत कराड दक्षिण येथील बदललेले राजकीय समीकरणे तर तुम्हाला काय वाटते इथे आमदार कोण होईल हे आम्हाला कमेंट करून सांगा.

By satta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *