काटोल विधानसभा मतदारसंघ म्हटलं की आठवतात ते अनिल देशमुख. 2019 नंतर सतत चर्चेत असलेल्या व्यक्ती म्हणजे अनिल देशमुख. काटोल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अनिल देशमुख आणि देवेंद्र फडवणीस यांच्यातील वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहितीच आहे. आता येणाऱ्या आगामी विधानसभा वडणुकीसाठी अनिल देशमुख यांची पुत्र सलिल देशमुख यांना उमेदवारी चे तिकीट भेटणार का? महायुती मधून भाजप पक्षाचा कोणता नवीन चेहऱ्याला कार्टून या विधानसभा मतदारसंघांमधून संधी भेटणार? काटोल विधानसभा मतदारसंघातील मतदार अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा आमदार होण्याची संधी देणार का? चला तर मग पाहूया सर्वात चर्चेत असलेल्या काटोल विधानसभा मतदारसंघांमध्ये राजकीय वारे कसे वाहत आहे.
काटोल विधानसभा मतदारसंघ क्रमांक ४८ आहे. काटोल मतदारसंघात नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुका, काटोल तालुका आणि नागपूर (ग्रामीण) तालुक्यातील वाडी महसूल मंडळ (भाग- अ) गावे – बंधारा, कवडीमेट, सिरपूर, भूयारी, खैरी, आमगांव, ढगा, बाजारगांव, खापरी, शिवा, सावंगा, वंजारा, पाचनवरी, सातनवरी, मालेगांव (खुर्द), मालेगांव (बुद्रुक), पाद्रीखापा, मोहगांव (बुद्रुक), मोहगांव (खुर्द), धामना, लिंगा, पेठकाळडोंगरी, चंद्रपूर आणि व्याहाड यांचा समावेश होतो. काटोल हा विधानसभा मतदारसंघ रामटेक लोकसभा मतदारसंघात मोडतो .राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिल वसंतराव देशमुख हे काटोल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अनिल देशमुख 96,842 मते मिळवून विजयी झाले. भाजपा पक्षाचे चरणसिंग बाबूलालजी ठाकुर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयाचे अंतर: 17,057 मते. एवढी होती.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे डॉ. आशिष देशमुख 70,344 मते मिळवून विजयी झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अनिल देशमुख यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. १९९९ पासून सलग तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख निवडून आले. २००५ साली अनिल देशमुख अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यामुळे अनिल देशमुख आणि काटोल मतदारसंघ हे जणू काही समीकरणच बनले होते. मात्र, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत हे समीकरण तुटले. भाजपचे उमेदवार आणि अनिल देशमुख यांचे पुतणे डॉ. आशिष देशमुख यांनी ५,५५७ मतांनी अनिल देशमुख यांचा पराभव केला आणि या मतदारसंघात भाजपची पहिल्यांदा सत्ता आली. मात्र, भाजपची ही सत्ता चार वर्षच राहिली. आशिष देशमुख यांनी २ ऑक्टोबर २०१८ रोजी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर 2019 मध्ये पुन्हा अनिल देशमुख यांनी बाजी मारली.
परंतु अनिल देशमुख हे मागील पाच वर्षांमध्ये फारच चर्चेत राहिलेले आहेत. त्याचे कारण म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार असूनही त्यांच्यावरती विविध आरोप झाले होते. त्यामुळे ते गृहमंत्री असून देखील त्यांना जेलमध्ये जावा लागले होते. परंतु त्यांनी मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याविरुद्ध आक्रमक होताना दिसत आहेत. त्यामुळे आता महायुतीकडून काटोल येथे कोण उमेदवार द्यावा असा प्रश्न सध्यातरी महायुतीला पडलेला आहे. तसेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काटोल येथे चांगले लीड मिळाले आहे. तर महाविकास आघाडी कडून येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांच्या नावाचे देखील चर्चा चालू आहे. कारण अनिल देशमुख हे तुरुंगत असताना त्यांच्या पाठीमागे सलिल देशमुख यांनी चांगला जनसंपर्क ठेवण्याचं काम केलं आहे.
तसेच काटोल या मतदारसंघातील विकास कामांचा पाठपुरवठा देखील सलिल देशमुख हे करत होते. त्यामुळे आता महाविकास आघाडी कडून नक्की सलील देशमुख यांना तिकीट भेटणार की अनिल देशमुख पुन्हा एकदा उभे राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच अनिल देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस फुटी नंतर ही शरद पवार यांच्यासोबत राहिले आहेत. तसेच महायुतीकडून पुन्हा एकदा चरण सिंग ठाकूर यांना तिकीट देणार की आणखी कोणी नवीन चेहरा उभा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर मंडळी काटोल येथून कोण आमदार व्हावा असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून कळवा.