कृषी ड्रोन अनुदान योजना 2025
नमस्कार आज आपण पाहणार आहोत कृषी ड्रोन अनुदान योजनेची माहिती.
आजच्या काळात आपण पाहतो की शेती करायची म्हटली की पिकांवरती औषध फवारणी ही करावीच लागते.
पिकांवरती औषध फवारणी केली नाही तर पिक व्यवस्थित येत नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांची नुकसान होते.
तर दुसरीकडे पिकाला फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतः फवारणी करावी लागते किंवा कोणाकडून तरी करून घ्यावे लागते परंतु अशावेळी एका पंपमागे ठराविक रक्कम ठरवून द्यावे लागते.
दुसरी गोष्ट म्हणजे औषध फवारणी करताना शेतकऱ्याला योग्य ती काळजी घ्यावी लागते जर ती काळजी घेतली गेली नाही तर शेतकऱ्याला विविध आजारांना सामोरे जावे लागते.
तर मंडळी या सर्व गोष्टींचा विचार करूनच सरकारने ड्रोन योजना जाहीर केली आहे.
कृषी ड्रोन अनुदान या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक फवारणीसाठी ड्रोन उपलब्ध करून दिली जातात.
यामुळे पीक फवारणी जलद गतीने होईल.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला ड्रोन खरेदीसाठी पाच लाखांचे अनुदान देण्यात येणार आहे.
सध्याच्या काळात ड्रोन ची किंमत महाग असल्यामुळे सरकारने ड्रोन खरेदीसाठी अनुदान देण्याचे ठरविले आहे.
चला तर पाहूया कृषी ड्रोन अनुदान मिळण्यासाठी अर्ज नक्की कसा करावा त्याच्या अटी काय आहेत आणि पात्रता काय आहेत कागदपत्रे कोणती लागतात याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
चला तर पाहूया कृषी ड्रोन अनुदान योजना 2025 उद्धीष्टे काय आहेत?
Drone Anudan Yojna अंतर्गत शेतकऱ्यांना शेतीमध्ये फवारणी करण्यासाठी ड्रोन उपलब्ध करून देण्यात येत आहे. शेतीमध्ये आधुनिक तंत्रद्यानाचा वापर होऊन शेतकरी समृद्ध होईल हा या मागील खरा उद्देश आहे.
या नवीन ड्रोन फवारणीमुळे शेतकऱ्यांना पारंपारिक पद्धतीने होणार्या फवारणीपासून मुक्तता मिळेल ,आरोग्य चांगले राहील.
शेतकऱ्याला शेतातील कामे त्वरित उरकता यावीत , त्याला काही गोष्टीमधून आराम मिळावा हा यामागील उद्देश आहे
चला तर पाहूया कृषी ड्रोन योजना 2025 वैशिष्ट्ये नक्की काय आहेत?
कृषी ड्रोन योजना 2025 हि योजना कृषी विभाग यांनी सुरु केलेली आहे.
या ड्रोन योजनामधुन अनुदानित रक्कम आहे ,हि रक्कम सरळ सरळ शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
या योजनेमधून बऱ्याच मोठ्या प्रमाणावर अनुदान मिळणार असून त्यामुळे शेतकऱ्याला ड्रोन खरेदी करणे सहज परवडणार आहे.
हि ड्रोन योजना संपूर्ण देशात सुरु करण्यात आलेली आहे ,यामुळे संपूर्ण देशातील शेतकरी आता हे ड्रोन खरेदी करू शकणार आहे.
या योजनेची अर्ज प्रक्रिया अतिशय सुलभ पद्धतीने करण्यात आलेली आहे ,त्यामुळे शेतकऱ्यांना आता अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही.
चला तर पाहूया कृषी ड्रोन प्रात्यक्षिक चाचणी संस्था किती आहेत?
कृषी विद्यापीठ
भारतीय कृषी संशोधन केंद्र
भारतीय परिषद संस्था
कृषी विद्यान केंद्र
शेतकरी उत्पादन संस्था
कृषि यंत्र व अवजारे तपासणी संस्था
या सर्व कृषी ड्रोन प्रात्यक्षिक चाचणी संस्था आहेत.
चला तर पाहूया कृषी ड्रोन योजना पात्रता काय आहे?
Drone Anudan Yojna साठी अर्जदार शेतकरी हा मुळ महाराष्ट्रीय नागरिक असावा.
या योजनेसाठी कृषी विज्ञान केंद्र ,भारतीय कृषी संशोधन परिषद ,शेतकरी उत्पादन संस्था ,कृषी विद्यापीठ हे सर्व पात्र असतील.
चला तर पाहूया कृषी ड्रोन योजनेचा फायदा काय आहे?
कृषी ड्रोन योजनेचा महत्वाचा लाभ म्हणजे शेतीची काम लवकरात लवकर होतील
कृषी ड्रोन अनुदानमुळे शेती विषयक विविध काम जलद गतीने होतील
ड्रोन योजनेच्या माध्यमातून आता शेतकऱ्याला रुपये ५ लाखांचे अनुदान देण्यात येणार आहे
ग्रामीण भागात तरुअनने दहावी शिक्षा करून या संबंधीचे तंत्र शिक्षण घेतल्यास सरकारकडून रुपये ४ लाखांपर्यंत अनुदान दिले जाते
ड्रोन विकत घेवून ते जर भाडे तत्वावर दिल्यास नवीन व्यासाय चलू होईल आर्थिक बाबी सुधारतील ,या निमित्ताने रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर होईल
राज्यातील शेतकरी बांधवाना ड्रोन खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या पैश्यासाठी कोणावरही अवलंबवुन राहावे लागणार नाही
Drone Anudan Yojna अंतर्गत मिळणारे अनुदान किती आहे?
शेतकरी उत्पादक संस्थांनी हे ड्रोन भाड्याने घेतल्यास प्रती हेक्टर रुपये ६ हजार रुपये अनुदान मिळणार आहे.
कृषी विद्यापीठ व सरकारी संस्था १००% अनुदान म्हणजेच १० लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
अवजारे सेवा सुविधा केंद्र यांना द्रोने खरेदी करताना रुपये ५ लाखांपर्यंत अनुदान मिळणार म्हणजेच ५०% अनुदान आहे.
कृषी पदवीधारकांनी अवजारे सेवा केंद्र टाकल्यास त्यांना 5 लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
शेतकरी उत्पादक संस्था ७५% अनुदान मिळणार म्हणजेच ७ लाख ५० हजार रुपये अनुदान मिळणार आहे.
संस्थांनी कृषी ड्रोन राबविल्यास रुपये ३ हजार अनुदान मिळणार
चला तर पाहूया कृषी ड्रोन योजना नियम व अटी काय आहेत?
कृषी ड्रोन योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आलेली आहे
महाराष्ट्र राज्याबाहेरील शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता येणार नाही
एका कुटुंबातील फक्त एकाच सदस्यालाच या कृषी ड्रोन अनुदान योजनेचा लाभ मिळेल
अर्जदार जर कृषी पदवीधर असेल तर त्यांच्याकडे कृषी पदवी असावी
अर्जदार शेतकऱ्यांचे आधार कार्ड हे बँकेशी संलग्न असायलाच हवे.
अर्जदार शेतकरी सरकारी सेवेत नोकरी करणारा नसावा.
अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे
जर शेतकऱ्याने यापुर्वी केंद्र अथवा राज्य सरकारच्या दुसऱ्या योजनेतून ड्रोन अनुदानाचा लाभ घेतल्यास ते या कृषी ड्रोन अनुदान योजनेमध्ये सहभागी होऊ शकत नाही
चला तर पाहूया कृषी ड्रोन अनुदान योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात?
आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक खाते पासबुक, रहिवासी प्रमाणपत्र, मोबाईल क्रमांक, इमेल आयडी
पासपोर्ट फोटो, ड्रोन कोटेशन बिल, संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, कृषी पदवी प्रमाणपत्र
स्वयं घोषणापत्र, संमती पत्र
Drone Anudan Yojna 2025 अर्ज प्रक्रिया कशी आहे पाहूया
या कृषी ड्रोन अनुदान योजना अर्ज हा ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे.
चला तर पाहूया ऑफलाइन पद्धतीने अर्ज कसा करायचा?
या प्रक्रियेसाठी अर्जदाराला सर्वप्रथम आपल्या जवळील जिल्हा कार्यालयात जावे लागणार आहे
त्यानंतर अर्जदाराला जवळील कृषी कार्यालयात जावे लागेल
कृषी विभागातून अर्जदाराला ड्रोन अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल
अर्जदाराने संपूर्ण अर्ज अचूकपणे भरणे महत्वाचे आहे
अर्ज भरल्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागणर आहेत
शेवटी सदरील अर्ज हा कार्यालयात जमा करावी लागेल
अश्या पद्धतीने तुम्ही रीतसर अर्ज करून या ड्रोन योजनेचा लाभ घेवू शकाल.
चला तर पाहूया ऑनलाईन अर्जप्रक्रिया कशी आहे?
महाडीबीटी पोर्टल वर अर्जदार आता अर्ज करू शकतील
कृषी यांत्रिकीकरण या विभागात आता ड्रोन हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे ,सन २०२४ -२०२५ यामध्ये ड्रोन योजनेची प्रक्रिया हि ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे.
शेतकरी , शेतकरी उत्पादक ,शेतकरी सहकरी संस्था यासार्वनी आता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत .
https://mahadbt.maharashtra. gov.in/Farmer/Login या अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉगिन करावे.
त्यानंतर पुढील प्रक्रिया करावी.
नंतर फॉर्म सबमिट करावा.
ड्रोनसाठी शासनाकडून ट्रेनिंग देण्यात येणार आहे का?
शेतकऱ्यांना ड्रोनबद्दल संपूर्ण माहिती तसेच ड्रोन कसे चालवावे त्याचे नियंत्रण कसे करावे हे सर्वच शासन माहितीद्वारे शेतकऱ्याला देणार आहे .ड्रोन द्वारे औषध फवारणी कश्याप्रकारे करावी त्याचेही प्रशिक्षण यावेळी देण्यात येणार आहे.
ड्रोन अनुदान योजना प्रमुख महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत?
ड्रोन उडण्यासाठी उंची किती असावी –हे ड्रोन ५० ते १०० मीटर या दरम्यानच चालतात ,शेतीमध्ये पहावारणी वेळी आपण ते ड्रोन पिकांच्या वर २ ते ३ मीटर या उंचीवर ठेवावेत ,५० मीटर च्या पुढे आपल्याला परवानगीची आवश्यकता असेल .
परवाना आवश्यक आहे का ?-नियम नियमांनुसार गैर वापरासाठी तसेच मायक्रो ड्रोन साठी कुठ्ल्याही पायलट परवानगीची आवश्यकता नाही
हवामान परिस्थिती –हे ड्रोन कुठल्याही वातावरणात चालू शकतात ,फक्त पावसाळ्यात अधिक पावसामुळे थोडीशी अडचण येवू शकते.
ड्रोनची किंमत – सार्वजनिक वापर करण्यासाठी ड्रोनची किंमत हि ३.५ लाख रुपये आहे तर कृषी ड्रोनची मॉडेलनुसार किंमत हि ७.५ लाख ते १२ लाख रुपये या दरम्यान आहे . उच्च तंत्रद्यान असलेल्या ड्रोन साठी रुपये १५ लाख रुपये पासून पुढे किंमत असू शकते.
तर मंडळी तुम्ही देखील शेतकरी असाल आणि तुम्हाला जर आपल्या शेतीतील पिकाला औषध फवारणी करायची असेल तर तुम्ही ड्रोन अनुदान योजनेसाठी अर्ज करू शकता.