खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघ. हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. 288 मतदारसंघापैकी खानापूर आटपाटी विधानसभा मतदारसंघ 286 या नंबर वरती येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, खानापूर मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील खानापूर (विटा) आणि आटपाडी ही दोन तालुके आणि तासगांव तालुक्यातील विसापूर महसूल मंडळाचा समावेश होतो. खानापूर हा विधानसभा मतदारसंघ सांगली लोकसभा मतदारसंघात मोडतो. शिवसेनेचे अनिल कलजेराव बाबर हे खानापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. 2019 मध्ये शिवसेनेचे अनिलराव काळजेराव बाबर यांना एक लाख 16 हजार 974 मते मिळाली होते. ते 26,291 मतांनी आघाडीवर होते. सदाशिवराव हणमंतराव पाटील काँगेस पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना 2019 मध्ये 90,683 मते मिळाली होती.
खानापुर आटपाडी ची ओळख म्हणजे भौगोलिक दृष्ट्या सातारा, सोलापूर जिल्ह्यांना लागून असलेला आणि कायम दुष्काळी अशी ओळख असलेला खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघ आहे. खानापुर आटपाडी हा गेली अनेक वर्षे राजकारणाच्या पटावर तसा फारसा चर्चेत नव्हता. परंतू गेल्या काही वर्षांमध्ये खास करुन 2014 विधानसभा-लोकसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणूक 2019 मध्ये विशेषत्वाने हा मतदासंघ चर्चेत आला. अनिल बाबर यांच्या रुपाने या मतदारसंघातून पहिल्यांदाच हिदुत्ववादी विचारांच्या पक्षाचा उमेदवार या मतदारसंघातून निवडूण आला होता. गेली अनेक वर्षे हा मतदारसंघ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. स्वत: अनिल बाबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडूनही या मतदारसंघातून दोन ते तीन वेळा आमदार राहिले होते.
दरम्यान, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या गोपीचंद पडळकर यांनी बाबर यांना जोरदार टक्कर दिली होती. 2019 मध्ये शिवसेना गटाचे अनिल बाबर यांच्या विरोधात काँग्रेसचे सदाशिवराव हणमंतराव पाटील होते परंतु अनील बाबर यांनी बाजी मारली. परंतु कोरोना काळात अनिल बाबर यांचा मृत्यू झाला त्यामूळे ही जागा खाली आहे. मात्र 2024 मध्ये खानापुर आटपाडी मध्ये आता आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकर हेही आमदारकीसाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. परंतु त्यांना विटा परिसरातून अपेक्षित प्रतिसाद मिळेलच असे नाही. तर आमदार स्वर्गीय अनिल बाबर यांच्या मतदारसंघात सर्वच पक्षांनी लक्ष केंद्रित केले आहे अनिल बाबर यांच्या निधनानंतर या संघावर प्रभुत्व राखण्यासाठी बाबर गटाकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर ताकदीने मैदानात उतरले आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जिंकण्याच्या जिद्दीने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विटा चे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी मोर्चेबांधणी सुरू केले आहे .
2024 मधील लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष लढलेले खासदार विशाल पाटील हे काँग्रेसचे असून यांना भरघोस असे मतदान मिळाले आहेत त्यामुळे काँग्रेसचे नेते आमदार डॉक्टर विश्वजीत कदम यांनी जिल्ह्यात पाच आमदार निवडून आणण्याचा विडा उचलला आहे .या मतदार संघामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकर हेही आमदारकीसाठी इच्छुक आहेत ते प्रयत्न करत असले तरी विटा परिसरातून अपेक्षित प्रतिसाद मिळेलच असे नाही. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांची धनगाव पाणी योजनाही बदलत्या राजकीय परिस्थितीत पूर्ण होउ शकली नाही. त्यांचीही राजकीय भूमिका अद्याप अस्पष्ट असल्याने पडळकर गटाला फारसी संधी दिसत नाही. तसेच या मतदार संघात येउन विधानसभेत जाण्याच्या तयारीत असलेले डॉ. जितेश कदम यांनी एकेकाळी सांगली लोकसभेची तयारी चालविली होती. त्यानंतर कधी सांगली विधानसभेसाठी संधी मिळते काय याची चाचपणी केली. मात्र, पलूस-कडेगावमध्ये तर विश्वजित कदमामुळे संधी मिळणे कठिण आहे. म्हणून आता खानापूरचा रस्ता शोधला आहे. मात्र, बाहेरील लोकांना या मतदार संघात फारसे स्थान मिळेलच याची खात्री दिसत नाही.
विट्याचे माजी नगराध्यक्ष पाटील हे कोणत्याही स्थितीत विधानसभेत जायचेच या जिद्दीने तयारीत आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर राजकीय ताकदही वाढविण्याचा प्रयत्न आटपाडी तालुकयात सुरू आहे. यामुळे या मतदार संघात खरी लढत बाबर विरूध्द पाटील अशीच होण्याची चिन्हे दिसत आहेत. उबाठा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभुते आणि लोकसभा निवडणूक लढविलेले पैलवान चंद्रहार पाटील हे दोघेही याच मतदार संघातील आहेत.
महायुतीमध्ये शिंदे शिवसेनेला आणि महाविकास आघाडीतून उबाठाला ही जागा अग्रहक्काने पदरात पाडून घेण्याचे प्रयत्न होतील. यानंतर या मतदार संघातील चित्र स्पष्ट होणार असले तरी जागा वाटपापुर्वीच या मतदार संघातील बाबर- पाटील अशी लढत मतदारांनी गृहित धरली आहे. चला तर पाहुयात खानापूर आटपाडी या विधानसभा मतदारसंघांमध्ये राजकारण कसे रंगत आले आहे
टेंभू योजनेच्या पाण्यावर या मतदार संघाचे राजकारण १९९५ पासून होत आले. भाजप-शिवसेना यांचे सरकार १९९५ मध्ये राज्यात सत्तेवर आले, त्यावेळी जिल्ह्यातील खानापूर-आटपाडी, तत्कालिन वांगी-भिलवडी, कवठेमहांकाळ, शिराळा आणि जत या पाच मतदार संघातून पाच आमदार निवडून आले होते. त्यावेळी या पाच आमदारांनी म्हैसाळ, ताकारी आणि टेंभू या योजनेसाठी युती सरकारला पाठिंबा दिला आणि या सिंचन योजनांना गती मिळाली. गेल्या दोन दशकात या योजनांचे पाणी दुष्काळी टापूत फिरल्याने जसे अर्थकारण बदलले तसे राजकारणही बदलत गेले. बाबर यांनी टेंभू योजनेसाठी आग्रह धरत राजकीय तडजोडी करत सहाव्या टप्प्याचा आग्रह धरला. आता या योजनेला मंजुरीही मिळाली असून साडेपाच हजार कोटींच्या खर्चाच्या सहाव्या टप्प्याच्या पूर्तीनंतर मतदार संघातील एकही गाव कृष्णेच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही. या भरवस्यावर सध्या बाबर गट मतदारांना सामोरा जात आहे. गेल्या पाच वर्षात हजारो कोटी रूपये विकास कामावर खर्च केले असून बाबर यांच्या पश्चात हा गट पुन्हा ताकदीने उभे करणे आणि मतदार संधावर प्रभुत्व राखणे हेच बदलत्या राजकीय स्थितीत सुहास बाबर यांचे ध्येय आहे.