छोट्याशा खेड्यातील तरुण असा झाला 16 हजार कोटींचा मालक, गोष्ट देशातील सर्वात यशस्वी स्टार्टअपची

नमस्कार मंडळी, सध्या OYO हे नाव खूपच चर्चेत आले आहे, त्याचे कारण आहे OYO कंपनीने त्यांची काही धोरणे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे अविवाहित जोडप्यांना Oyo हॉटेल्समध्ये एन्ट्री दिली जाणार नाही. आतापर्यंत अनेक अविवाहित जोडप्यांना पटकन रुम बुक करता येत होती. मात्र आता नव्या नियमांमुळे या गोष्टीवर बंदी घालण्यात आली आहे.
त्यामुळे ओयो हे नाव चांगले चर्चेत आले आहे. परंतु मंडळी आपल्याला ओयो ही कंपनी कशी सुरू झाली याचा इतिहास माहिती आहे का? चला तर थोडक्यात पाहूयात Oyo ही कंपनी कशी सुरू झाली आणि त्याचा इतिहास नक्की काय आहे?
OYO नावाचा बोर्ड तुम्ही अनेक लहान-मोठ्या शहरांमध्ये पाहिला असेल. मोठ्या अक्षरांत लिहिलेलं ओयो आणि त्याचा लोगो यावरून त्याची ओळख लोकांच्या लक्षात राहते. ओयो हे प्रेमी युगुलांसाठी असलेलं हॉटेल आहे, असंही समजलं जातं, पण तसं नाही. खरं तर ओयो ही भारतातील सर्वात मोठ्या स्टार्ट-अप बिझनेसपैकी एक असून त्यांचं नेटवर्क संपूर्ण देशभर पसरलं आहे. रितेश अग्रवाल हे ओयो रूम्सचे मालक व संस्थापक आहेत. ओयो रूम्सचा मुख्य उद्देश कमी किमतीमध्ये देशातील मोठ्या हॉटेल्समध्ये रूम उपलब्ध करून देणे हा आहे. २०१३ मध्ये वयाचा २० व्या वर्षी त्यांनी ओयो रूम्स ॲपची सुरुवात केली.
रितेश अग्रवाल यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९९३ मध्ये ओरिसा राज्यातील कटक या ठिकाणी झाला. रितेश अग्रवाल ओडिशाच्या दक्षिणेस असलेल्या बिस्समकटक या छोट्याशा गावाचा रहिवासी आहे, ज्यावर नक्षलवादी लोकसंख्येचे वर्चस्व मानले जाते. शालेय शिक्षणानंतर रितेशने उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला, परंतु तरुण उद्योजक बनण्याचे स्वप्न घेऊन १९ व्या वर्षी त्याने महाविद्यालयीन शिक्षण मध्येच सोडले. कॉलेजमधून बाहेर पडल्यावर रितेश पीटर थील फेलोशिपसाठी पात्र ठरला, ज्यामुळे त्याला १००,००० अमेरिकी डॉलरचे अनुदान मिळाले, जे सुमारे ८० लाख रुपये होते.
रितेश यांना नवनवीन ठिकाणी फिरण्याचा छंद होता. त्यामुळे ते खूप ठिकाणी फिरले. जेव्हा ते प्रवासासाठी जात असत तेव्हा त्यांना राहण्यासाठी रूम मिळत नसत, किंवा जास्त पैसे देऊन सुद्धा चांगली रूम मिळत नव्हती. तर कधी कधी कमी पैसे देऊन चांगली रूम मिळत असे. ह्या सगळ्या अनुभवांमधून प्रेरणा घेऊन त्यांनी ठरवले की ऑनलाईन रूम बुक करण्याची एक वेबसाईट सुरू करायची, की ज्यामुळे प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा मिळतील.
तर मंडळी जाणून घेऊया ओयो रूम्सची सुरुवात कशी आणि कधी झाली?
२०१२ मध्ये रितेश अग्रवाल यांनी ओरॅव्हल स्टेज़ (Oravel Stays) नावाच्या कंपनीची सुरुवात केली. नवीन चालू झालेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्हेंचर नर्सरी या कंपनीकडून त्यांना ३० लाखांचा फंड मिळाला. खूप कमी वेळामध्ये त्यांच्याvकंपनीला जे यश मिळाले त्यामुळे ते खूप उत्साहित झाले व ते अजून उत्साहाने व बारकाईने काम करू लागले. पण त्यांचा ह्या कंपनीचे मॉडेल अयशस्वी ठरले व त्यांची कंपनी तोट्यात गेली. त्यांनी कंपनीची परिस्थिती सुधरवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती सुधारू शकली नाही व त्यांनी ओरॅव्हल स्टेज़ कंपनी तात्पुरती बंद केली
रितेश अग्रवाल यांची कंपनी जरी बंद केली तरी त्यांनी हार मानली नव्हती, त्यांची पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचे ठरवले. त्यांना प्रवास करताना ज्या अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यावर त्यांनी विचार केला. २०१३ साली त्यांनी नवीन कंपनीची सुरुवात केली. तीचे नाव त्यांनी ओयो रूम्स असे ठेवले. ओयो रूम्सचा अर्थ असा होतो कि, तुमची स्वतःची रूम. ओयो रूम्सचा उद्धेश फक्त लोकांना रूम उपलब्ध करून देणे इतकाच नव्हता, तर लोकांना कमी किमतीमध्ये चांगल्या रूम्स उपलब्ध करून देणे हा होता. त्यांची कंपनी हॉटेल्स मध्ये जाऊन रूमची पडताळणी करते. रूमची पडताळणी करून मग जर ते हॉटेल पसंद पडले तरच ते ओयो शी जोडले जात असे.
आता १५००० पेक्षा जास्त हॉटेल्स ओयो रूम्स मध्ये समाविष्ट आहेत. २०१६ मध्ये जपानच्या एका कंपनीने रितेश अग्रवाल यांचा कंपनी मध्ये अब्जावधी रुपयांची गुंतवणूक केली. २०१६ मधेच एका प्रतिष्ठित मॅगाझीन ने रितेश अग्रवाल यांना भारतीय प्रभावशाली युवकांचा यादीमध्ये पहिल्या ५० लोकांचा यादी मध्ये स्थान दिले होते.
२०१९ मध्ये, ओयोचे जागतिक स्तरावर १७,००० पेक्षा जास्त कर्मचारी होते, त्यापैकी अंदाजे ८,००० भारत आणि दक्षिण आशियामध्ये आहेत. ओयो हॉटेल्स अँड होम्स ही एक पूर्ण हॉटेल साखळी होती जी मालमत्ता भाड्याने देते आणि फ्रेंचायझी देते. कंपनी कॅपेक्समध्ये गुंतवणूक करते.तसेच ऑपरेशन्स आणि ग्राहकांच्या अनुभवावर देखरेख करण्यासाठी सरव्यवस्थापकांना नियुक्त करते. अशा प्रकारे एकट्या भारत आणि दक्षिण आशियामध्ये सुमारे दहा लाख रोजगार संधी ओयो द्वारे निर्माण झाली. ओयो ने २०१९ मध्ये भारतभर आदरातिथ्य व्यवस्थापन करिता उत्सुक असलेल्या लोकांसाठी २६ प्रशिक्षण संस्था स्थापन केल्या आहेत. एप्रिल २०१९ मध्ये, कंपनीने जाहीर कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली. ज्याद्वारे त्यांच्या भागीदार हॉटेल्सना आपली व्यवसायातील उद्दिष्टे गाठण्यात फायदा होईल. सर्व व्यवसायिक आणि ग्राहक मेट्रिक्सवर पुरेपूर दृश्यमानता प्रदान करण्यासाठी ओयोने हॉटेल भागीदारांसाठी अपग्रेड केलेले Co-OYO अॅप सादर केले.
जानेवारी २०२० पर्यंत ओयो च्या, भारत, मलेशिया,नेपाळ,चीन, ब्राझील, यूके, फिलीपिन्स, जपान, सौदी अरेबिया, श्रीलंका, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि युनायटेड स्टेट्स.मेक्सिको यासह ८० देशांतील ८०० शहरांमध्ये ४३,००० हून अधिक मालमत्ता आणि १० लाख रूम्स आहेत. कंपनीच्या गुंतवणूकदारांमध्ये सॉफ्टबँक ग्रुप, दीदी चुक्सिंग, ग्रीनोक्स कॅपिटल, सेक्वोया इंडिया, लाइटस्पीड इंडिया, हीरो एंटरप्राइझ, एअरबीएनबी आणि चायना लॉजिंग ग्रुप यांचा समावेश आहे.
वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी रितेशचा भारतातील अब्जाधीशांच्या यादीत त्याचा समावेश आहे. २०२० मध्ये रितेश अग्रवालचा समावेश हुरुच श्रीमंतांच्या यादीत करण्यात आला.
जून २०२१ मध्ये, ओयो रूम्स ने यात्रा, Airbnb आणि Ease MyTrip सोबत सहकार्य करून कॉन्फेडरेशन ऑफ हॉस्पिटॅलिटी, टेक्नॉलॉजी अँड टुरिझम इंडस्ट्री (CHATT) ची स्थापना केली, जो भारतातील पर्यटन क्षेत्रासाठी एक उद्योग संस्था आहे.
२०२३ च्या सुरुवातीला ओयो हॉटेल्सचा आयपीओ आणण्याची तयारी सुरू केली.
तर 2025 च्या सुरुवातीलाच ओयो या कंपनीने काही नियम बदलले आहेत चला तर पाहूया ते नियम नक्की काय आहे?
यापुढे अविवाहित जोडप्यांना Oyo हॉटेल्समध्ये एन्ट्री दिली जाणार नाही. आतापर्यंत अनेक अविवाहित जोडप्यांना पटकन रुम बुक करता येत होती. मात्र आता नव्या नियमांमुळे या गोष्टीवर बंदी घालण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशमधील मेरठ शहरामधून हा नवा नियम लागू करण्यात आला आहे. यानंतर हा नियम संपूर्ण देशात लागू केला जाणार आहे. परंतु, Oyo कंपनीने हे पाऊल नेमकं कोणत्या करणांमुळे उचलले, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. Oyo च्या या निर्णयामुळे सोशल मीडियावर देखील अनेक मिम्स व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. नियमांमध्ये केलेल्या बदलामुळे Oyo स्वत:ची ओळख बदलण्याचा प्रयत्न करतोय का? असा प्रश्न उपस्थित होतो.
चला तर पाहूया कंपनी नेमकं काय म्हणाली?
Oyo कंपनीचे उत्तर भारत क्षेत्राचे प्रमुख पावस शर्मा म्हणाले की, लोकांना जबाबदार आणि सुरक्षित आदरतिथ्याची सेवा देण्यास Oyo कटिबद्ध आहे. आम्ही लोकांच्या वयैक्तिक स्वातंत्राचा आदर करतो. परंतु, ज्या प्रदेशामध्ये आमचा व्यावसाय सुरु आहे, त्या प्रदेशातील कायद्याचे पालन करणे आणि नगरी संघटनांना सहकार्य करणे ही देखील आमची जबाबदारी आहे. या बदलानंतर देखील आमची कंपनी वेळोवेळी या धोरणांचा आणि त्यांच्या परिणामांचा आढावा घेणार आहेत.
तर आता इथून पुढे ओयो हॉटेलमध्ये बुकिंग करायचे असेल तर तुम्हाला तुमच्या लग्नाचा पुरावा द्यावा लागेल. हा नियम सध्या ऑनलाईन बुकिंग साठी लागू करण्यात आला आहे. तर हा बदल ओयो कंपनीने स्वतःची ओळख बदलण्याचा प्रयत्न करण्यासाठी केला आहे असे बोलले जात आहे. तसेच इथून पुढे ओयो हॉटेल्स मध्ये कुटुंब, व्यावसायिक प्रवासी, विद्यार्थी आणि एकटे प्रवास करणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
तर मंडळी असा आहे ओयो या कंपनीचा इतिहास .
तर मंडळी OYO बद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट्स करून सांगा.