तुकडा बंदी कायद्यात बदल, गुंडावर जमीन सुद्धा नावावर करता येणार
आता एक गुंठा जमिनीची खरेदी विक्री शक्य होणार आहे, नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात यासंबधीचे विधेयक मंजूर करण्यात आले .
शेतकरी संबधित अनेक विधेयके अधिवेशनात मंजूर करण्यात आलेली आपण पाहिली . त्यातीलच एक असणारा हा तुकडा बंदी कायदा .अनेक वर्ष जमिनीचा व्यवहार करताना १ गुठ्यांची खरेदी विक्री करता येत नव्हती .पण या तुकडे बंदी निर्णयामुळे आता १ गुंठ्याची खरेदी विक्री लवकरच चालू होणार आहे.काही वर्षापासून राज्य सरकारने यावर बंदी घातली होती .विधानसभा विधानपरिषद मध्ये विधेयक मंजूर होऊन आता त्याचे रुपांतर अधिनियमात झालेले आहे . मंत्रिमंडळाच्या एकमंजुरीने राज्यपालांच्या संमतीने १५ ऑक्टोबर २०२४ ला अध्यादेश काढला होता.राज्याचे मंत्री महोदय श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत दोन्ही सभागृहात विधेयक मांडले .दोन्ही सभागृहाने याला मंजुरी दिलेली असल्याने यात सुधारणा करण्याचा मोठा अडसर दूर झालेला आहे .राज्याचे माजी अधिकारी श्री उमाकांत दांगट यांनी यात सुचविलेल्या सुधारणा सुद्धा घेतल्या गेलेल्या आहेत .सर्व सामान्य लोकांनी घेतलेल्या १,२ गुंठा क्षेत्राचे तुकडे नियमित होण्यास मोठ्या प्रमाणवर मदत होणार आहे.
तुकडा बंदी कायदा (Tukda Bandi kayda) हा सन १९४७ साली अस्तित्वात आला होता .या कायद्या नंतर प्रत्येक राज्यातील जिल्ह्याचे प्रमाणभूत क्षेत्र ठरवले गेले होते .या मुळे कमी क्षेत्राची खरेदी विक्री करणे कठीण होते .आता झालेल्या नागपुर अधिवेशनातील निर्णयामुळे १ गुंठा किंवा कमी क्षेत्राची खरेदी विक्री करता येणार आहे.
चला तर पाहूया तुकडा बंदी कायदा काय आहे?
तुकडा बंदी कायद्यात प्रमाणभूत केलेल्या जमिनीपेक्षा कमी क्षेत्राची खरेदी विक्री करता येत नाही .जुलै २०२१ मध्ये काढलेल्या परिपत्रकानुसार १,२ गुंठ्याचा व्यवहार करता येणार नाही ,यालाच तुकडा बंदी कायदा म्हणतात.
तुकडा बंदी कायदा 2025 नवीन निर्णय किंवा कायद्यामध्ये कोणत्या सुधारणा केल्या आहेत ते पाहू
तुकडा बंदी कायदा याबद्दल नुकत्याच केलेल्या सुधारणा अतिशय महत्वाच्या आहेत.
आता सामान्य ,साधारण लोकांना या जमिनीवर घर बांधणे अथवा छोट्या जमिनीची खरेदी विक्री सुद्धा करता येईल . १ गुंठा ,२ गुंठा ,३ गुंठा छोट्या क्षेत्रांचे सुद्धा आता खरेदी विक्री करणे सहज शक्य होणार आहे .
१५ ऑक्टोबर २०२४ याबाबत सरकारने अध्यादेश जारी केला होता.
त्यानुसार १५ नोव्हेंबर १९६५ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत निवासी ,औद्योगिक ,वाणिज्य भागातील जमिनीच्या तुकड्यांचे व्यवहार झाले आहेत त्या जमिनीच्या ५% शुल्क भरून त्या जमिनी नियमित करता येणार आहेत
तुकडा बंदी कायदा ८ ऑगस्ट २०२३ शासनाने कोणता निर्णय घेतला होता ते पाहू
महाराष्ट्र राज्यात तुकडा बंदी कायदा महसुल अधिनियमाच्या तरतुदीने लागू केलेलं आहे.
या कायद्यामुळे कमीत कमी जमिनीचे क्षेत्र विकत घेणे शक्य नसायचे
जुलै २०२१ ला शासनाने एक परिपत्रक जरी केले होते त्यात गुंठ्यामधील क्षेत्र घेण्यास मोठे निर्बंध घालण्यात आले होते .
या तुकडा बंदी कायद्यात सुधारणा व्हावी यासाठी १४ जुलै २०२३ रोजी या कायद्यात थोडी शिथिलता करण्यात आली होती.
१,२ गुंठा खरेदी -विक्री बंद का होती ?
शेतीचे लहान -लहान तुकडे होऊन ती शेती लागवडीसाठी योग्यपणे राहत नव्हती.म्हणुन राज्य प्रशासनाने हे तुकडे करण्यास प्रतिबंध कायदा अस्तित्वात आणला .या कायद्यामुळे राज्यामध्ये कोणत्या भागात किती जमीन असावी हे ठरविण्यात आले आहे .त्याच नुसार लहान जमिनीचे व्यवहार करणे हे बेकायदेशीर ठरविण्यात आले होते.हा कायदा पूर्वीचाच होता पण त्याची अंमलबजावणी होत नव्हती .यात जर योग्य पद्धतीने गुंठेवारी करून व्यवहार केला असेल कायदायचे पालन केले असेल तर ते नियमित करण्यात येत होते . या जीमिनीवर अनेक बांधकाम झाली संबधित ग्रामपंचायतीने परवानग्या दिल्या,हे सर्व या कायद्याचे उल्लंघन ठरते . या सर्व जमिनीवरील बांधकामांना कायदेशीर कुठलेही संरक्षण प्राप्त होत नव्हते.
आता या कायद्यात झालेल्या सुधारणा मुळे जर जमीन खरेदी विक्री करायचं असेल तर बाजार मूल्य प्रमाणे शासनाला ५% शुल्क भरून व्यवहार करता येईल .पूर्वी २५% असल्यामुळे नागरिकांत नाराजी होती ,आता ती कमी झाल्यामुळे नागरिकांना अधिकाधिक व्यवहार करणे सोप्पे झालेले आहे .
एक गुंठा खरेदी विक्रीचां कोणता फायदा होणार ते पाहू
घरकुल योजनेतून घर बांधता येईल –एखाद्या गरिबाला घरकुल योजनेतून घर बांधायचे असल्यास तो घरासाठी १ गुंठा जमीन घेवू शकतो ,नवीन तरतुदीनुसार घर बांधायचे असल्यास थोडक्या जमिनीचे व्यवहार करणे शक्य आहे
विहीर घेता येईल –नागपूर अधिवेशनातील नवीन सुधारणा कायद्यामुळे शेतकऱ्याला विहिरीसाठी १/२ गुंठे जमीन खरेदी करता येईल .
शेततळे बांधण्सायाठी –नवीन सुधारणा कायद्या आधारे आता शेतकऱ्याला शेततळे बांधण्यासाठी १ गुंठा जमीन सुधा घेता येणे शक्य आहे .
शेतातील रस्ता –शेतकऱ्याला शेतातील रस्त्यासाठी १ गुंठा जमिन सुद्धा तो आता खरेदी करून घेवू शकतो .
तुकडा बंदी कायदा कोणाला होणार फायदा
या नवीन निर्णयामुळे राज्यातील जवळपास अडीच कोटी लोकांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे .आतापर्यंत ज्यांनी जमिनीबद्दल जे व्यवहार केले असतील ,जो तुकडा बंदी कायदा आहे त्याचे उल्लंघन करून जमिनीचे व्यवहार केले असतील त्या सर्वाना आता यापासून दिलासा मिळणार आहे .आता आहे सर्व व्यवहार कायदेशीर होणार आहेत.