तुझे विखे विरुद्ध निलेश लंके नवीन वाद पेटला
सध्या अहिल्यानगर हा जिल्हा चांगलाच चर्चेत आहे त्याला कारणही तसेच आहे.
अहिल्यानगर येथील शिर्डी येथे मागील काही महिन्यापूर्वीच सुजय विखे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
शिर्डी येथे भिक्षुक जास्त झाल्याचं बोललं होतं तसेच शिर्डी येथील मोफत भेटणार जेवण हे बंद करण्यात यावे असं देखील सुजय विखे यांनी म्हटलं होतं
परंतु शिर्डी येथील हे जेवण का बंद करावं यामागे कारण काय होतं तर ते म्हणजे शिर्डी येथे फुकट जेवण भेटत असल्यामुळे भिक्षुकांची संख्या वाढत चालली आहे.
परंतु ते प्रकरण मागे पडत नाही तोच आता काही दिवसांपूर्वी शिर्डी येथील काही भिक्षुकाना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
यामध्ये एक भिक्षुक इस्रोचे माजी अधिकारी असल्याचे देखील समजले होते.
त्यातील चार भिक्षेकरांचा मृत्यू हा जिल्हा रुग्णालयात झाल्याच्या बातम्या समोर आल्या.
चला तर पाहूया चार भिक्षुकांचा मृत्यू नेमका कसा झाला ?
याला कारणीभूत नक्की कोण आहे?
चार भिक्षेकऱ्यांचा जिल्हा रुग्णालयातील मृत्यूच्या घटनेनंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारण तापू लागलं आहे. भाजप मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधण्यास सुरुवात करत, थेट राजीनाम्याची मागणी केली आहे.
खासदार नीलेश लंके यांनी माजी खासदार सुजय विखे यांचा नाव टाळून जोरदार टीका केली. एका युवा नेत्यामुळे कधी नव्हे भिक्षेकऱ्यांवर कारवाई झाली आणि त्यांना कारागृहात डांबून ठेवले. आता प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा बळी गेला, अशी टीका केली.
खासदार नीलेश लंके यांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या भिक्षेकऱ्यांची भेट घेतली. जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डाॅ. नागेश चव्हाण देखील यावेळी उपस्थित होते. चार भिक्षेकऱ्यांच्या मृत्यूची माहिती घेतल्यानंतर, खासदार लंकेंचा पारा चढला. प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढताना, प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे बळी आहे, असा घणाघात केला.
तसेच या बळींची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न केला. उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या भिक्षेकऱ्यांपैकी तीन जण पळून गेले आहे, त्यांची जबाबदारी कोणाची? असा सवाल देखील खासदार लंकेंनी केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी हा मुद्दा गंभीर आहे. भिक्षेकऱ्यांचा जीव गेला अन् समिती नेमणूक करून काय होणार आहे. कोणत्या समितीचा अहवाल येत नाही. कोणती गंभीर कारवाई होत नाही. हे आजपर्यंत पाहण्यात नाही. परंतु ही घटना गंभीर आहे. मंत्री राधाकृष्ण विखे यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. जबाबदारी न स्वीकारल्यास शिवसेना आंदोलन उभारणार असल्याचा इशारा देखील गिरीश जाधव यांनी दिला.
साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या हत्येनंतर शिर्डीतील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी जिल्हा पोलिस दल, नगर परिषदेने अवैध व्यवसायिकांविरोधात मोहीम सुरू केली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी खासदार सुजय विखे यांनी या हत्येनंतर शिर्डीतील अवैध व्यवसायिकांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली होती.
यातून शिर्डीतील भिक्षेकऱ्यांविरोधात देखील कारवाई झाली. भाविकांना अडवून, त्यांच्याकडून पैसे घेऊन नशा करणाऱ्या 60 पुरूष आणि 12 महिला, अशा एकूण 72 भिक्षेकऱ्यांना प्रशासनाने ताब्यात घेतले होते. या भिक्षेकर्यांची आरोग्य तपासणी करत, त्यांना न्यायालयाच्या आदेशाने विसापूर (ता. श्रीगोंदा) इथल्या बेगर होममध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यातील दहा भिक्षेकऱ्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातीलच चौघांचा मृत्यू झाल्याने राजकारण चांगलेच तापले आहे.
तर मंडळी तुम्हाला काय वाटते चार भिक्षुकांचा मृत्यू होण्यामागे कोण कारणीभूत आहे हे आम्हाला कमेंट्स करून कळवा.