नाबार्ड दुग्ध व्यवसाय योजना 2025
आज आपण पाहणार आहोत नाबार्ड योजनेबद्दल सविस्तर माहिती
आपल्या देशात लोकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात या हेतूने केंद्र सरकारद्वारे नाबार्ड योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजने अंतर्गत दुग्ध व्यवसाय करण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांसाठी कमी व्याज दरामध्ये सरकार तर्फे कर्ज दिले जाणार आहे.
दुग्ध पालन योजना 2025 अंतर्गत ग्रामीण भागातील बेरोजगारांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
यावर पर्याय म्हणून आपले राज्य सरकार दूध डेरी साठी अनुदान देत आहे
25% ते 33% पर्यंतचे अनुदान दूध डेअरी साठी आपले सरकारने जाहीर केले आहे.
ही योजना नाबार्ड कडून चालवली जात आहे.एखादा व्यवसाय करायचं म्हटल्यानंतर आपल्याला त्यासाठी भांडवल उभा करावे लागते परंतु भांडवल नसल्या कारणामुळे अनेक तरुण उद्योग धंदा करत नाही त्यावर पर्याय म्हणून या योजनेची सुरुवात केली आहे.
दूध डेअरी सुरू करण्यासाठी आपल्याला अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू लागतात जसे की मिल्किंग मशीन मिल्क, स्टोरेज किंवा बल्क कूलिंग युनिट्स यासाठी आपले सरकार अनुदान देत आहे. तसेच दुधापासून जे विविध पदार्थ बनतात जसे की पनीर, मिठाई असा जोडधंदा देखील आपल्याला सुरू करायचा असेल तर त्या प्रकल्पासाठी देखील 25 % ते 33% पर्यंतचे अनुदान आपल्या सरकारने जाहीर केले आहे. डेअरी फार्मिंग योजनेचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे लोकांना व्याजा शिवाय कर्ज देणे जेणेकरून ते सहजपणे आपला व्यवसाय चालवू शकतील. तसेच दुधाच्या उत्पादनाम चालना द्यावी जेणेकरुन आपल्या देशातून बेरोजगारीच्या प्रमाणात घट होऊन ग्रामीण भागात नवीन रोजगाराच्या संध्या उपलब्ध होतील.
या योजने अंतर्गत दुधाचे उत्पादन करणे, तसेच गायी किंवा म्हशींची काळजी घेणे, तुपाची निर्मिती करणे या सर्व गोष्टी मशीनवर आधारित असणार आहेत. जर तुम्हाला या योजेचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करू शकता.
चला तर पाहूया या योजनेसाठी फॉर्म कसा भरायचा, कोणते कागदपत्रे लागतात आणि पात्रता काय आहे?
चला तर नाबार्ड योजनेबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू
चला तर पाहूया या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?
या योजनेचा मुख्य उद्देश जे लोक दुग्ध व्यवसाय सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत अशा लोकांना व्याजाशिवाय कर्ज उपलब्ध करून देणे हा आहे.
तसेच दुग्ध व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे.
ग्रामीण भागातील बेरोजगार व्यक्तींना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे.
या योजने अंतर्गत दुग्ध व्यवसाय सुरु करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे.
चला तर पाहूया नाबार्ड दुग्ध योजनेची पात्रता काय आहे ?
या योजनेसाठी एका व्यक्तीला फक्त एकदाच लाभ दिला जाईल.
या योजनेसाठी शेतकरी, स्वयंसेवी संस्था, वैयक्तिक उद्योजक, कंपन्या इ. पात्र आहेत.
या योजने अंतर्गत एका कुटुंबामधील एक पेक्षा जास्त लोकांना लाभ मिळू शकतो, त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र युनिट उभा करण्यासाठी मदत केली जाते. या २ प्रकल्पांमधले अंतर जवळपास ५०० मीटर इतके असणे आवश्यक आहे.
चला तर पाहूया नाबार्ड दुग्ध योजनेचे फायदे काय आहेत?
नाबार्ड योजना 2025 या योजने अंतर्गत दुग्ध व्यवसाय सुरु करण्यासाठी केंद्र सरकार तर्फे अनुदान देण्यात येते.
या योजनेचा लाभ घेऊन लाभार्थी शेतकरी दुधाच्या उत्पादनांवर प्रक्रिया करण्यासाठी विविध उपकरणे खरेदी करू शकणार आहेत.
जर तुम्ही दुधावर प्रक्रिया करण्यासाठी एखादी मशीन खरेदी केली आणि त्या मशीनची किंमत १३ लाख रुपये झाली, तर तुम्हाला त्यावरती २५ टक्के (३.२५ लाख रुपये) भांडवलीसाठी सबसिडी मिळते.
जर तुम्ही ५ पेक्षा कमी गायीची डेअरी सूर करणार असाल तर, तुम्हाला त्यांच्या खर्चाचा हिशोब/ पुरावा द्यायला लागेल. त्यासाठी तुम्हाला केंद्र सरकारद्वारे ५० टक्के अनुदान मिळणार आहे.
नाबार्डच्या दुग्धव्यवसाय योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे लागतात:
रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, व्यवसाय करायचा ते योजनेची प्रत, बँक खाते पासबुक
मोबाईल नंबर, आधार कार्ड, अर्जदाराचा फोटो
चला तर पाहूया ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशी आहे?
सर्वप्रथम तुम्हाला नाबार्डच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल (National Bank for Agriculture and Rural Development)
येथे तुम्हाला मुख्यपृष्ठावरील “Information Centre” पर्यायावर क्लिक करावे लागेल.
क्लिक केल्यावर नाबार्ड योजना ऑनलाईन अर्ज चे पान तुमच्या समोर उघडेल, त्यामध्ये दुग्ध पालन योजना ऑनलाईन अर्ज
या पेजवर तुम्हाला दुग्ध पालन योजना ऑनलाईन अर्ज पीडीएफ पर्यायावर क्लिक करावे लागेल.
त्या लिंक क्लिक केल्यावर संबंधित योजना फॉर्म आपल्या समोर उघडेल. सर्व माहिती प्रविष्ट करा आणि आवश्यक कागदपत्रे संलग्न करा आणि फॉर्म संबंधित नाबार्ड विभागात सादर करा.
चला तर पाहूया ऑफलाईन अर्ज प्रक्रिया कशी आहे?
या योजने अंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सर्वात पहिला, तुम्हाला कोणत्या प्रकारचे डेअरी फार्म ओपन करायचे आहे ते ठरवायचे आहे.
त्यानंतर तुम्हाला नाबार्डयोजनेच्या माध्यमातून डेअरी फार्म सुरु करायचे असल्यास, त्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामधील नाबार्ड कार्यालयास भेट द्यायची आहे.
समजा तुम्हाला लहान डेअरी फार्म उघडायचे असल्यास तुम्ही तुमच्या जवळील बँकेमध्ये जाऊन त्या संबंधित माहिती घेऊ शकता.
संबंधित बँकेमध्ये गेल्यानतंर तुम्हाला तिथून अर्ज घ्यायचा आहे, तो अर्ज काळजीपूर्वक भरून अर्ज बँकेत जमा करायचा आहे.
समजा तुमच्या कराची रक्कम जास्त असेल तर तुम्हाला तुमचा प्रकल्पाचा अहवाल नाबार्ड कार्यालयामध्ये सादर करणे आवश्यक आहे.
अशा प्रकारे तुम्ही ऑफलाईन पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करू शकता.
नाबार्ड डेअरी अनुदान योजनेच्या अटी कोणत्या?
1. या योजनेंतर्गत एखाद्या व्यक्तीस सर्व घटकांसाठी मदत मिळू शकते, परंतु तो अर्जदार प्रत्येक घटकासाठी फक्त एकदाच पात्र असेल.
2. या योजनेंतर्गत एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना मदत केली जाऊ शकते आणि यासाठी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पायाभूत सुविधांसह स्वतंत्र युनिट स्थापित करण्यास मदत दिली जाते. परंतु अशा दोन प्रकल्पांमधील कमीत कमी ५०० मीटर अंतर असले पाहिजे.
3. योजनेंतर्गत व्यक्ती फक्त एकदाच त्याचा लाभ घेऊ शकेल.
चला तर पाहूया नाबार्ड डेअरी फार्मिंग योजनेंतर्गत कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था कोणत्या आहेत?
1. राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बैंक
2. राज्य सहकारी बैंक
3. प्रादेशिक बैंक
4. व्यावसायिक बैंक
5. अन्य संस्था
तर मंडळी तुम्हाला दुग्ध व्यवसायसोबत जोड धंदा करायचा असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.