पर्वती विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Parvati Vidhansabha election


आज आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील पर्वती या विधानसभा मतदारसंघाबद्दल. पर्वती विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे मोहोळ हे खासदार झाले आहेत. मोहोळ यांना पर्वतीयेतून चांगले लीड भेटले आहे. त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांमध्येही येथे भाजपला आपला बालेकिल्ला राखण्यात यश येणार का? चला तर पाहूया मग पर्वतीय विधानसभा मतदारसंघांमध्ये  नक्कीच चाललय काय?
हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघ क्रमांक २१२ आहे. हा पुणे जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. पर्वती मतदारसंघात पुणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र.२७ ते ३०, ३२ ते ४०, ४२, ८६ ते ९०, १५० यांचा समावेश होतो. पर्वती हा विधानसभा मतदारसंघ पुणे लोकसभा मतदारसंघात मोडतो. भारतीय जनता पक्षाच्या माधुरी सतीश मिसाळ ह्या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत. माधुरी मिसाळ या पर्वती या विधानसभा मतदारसंघांमध्ये सलाम तीन टर्म येथे आमदार म्हणून राहिलेले आहेत. पर्वती हा विधानसभा मतदारसंघ मिळवण्यासाठी येथे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना यांनी भरपूर प्रयत्न केले परंतु पर्वती हा विधानसभा मतदारसंघ कायम भाजपच्या ताब्यात राहिला आहे. परंतु येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी यावेळेस माधुरी मिसाळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस किंवा शिवसेना यांच्याकडून नाही तर यांच्याच पक्षातून आव्हान वाढू लागले आहेत. त्यामुळे आता त्यांची चांगलेच धाकधूक होत आहे कारण त्यांच्या रेसमध्ये आता श्रीनाथ भिमाले यांनी उडी घेतली आहे. चला तर पाहूया श्रीनाथ भिमाले नक्की कोण आहेत?
पुणे लोकसभा निवडणूक याचा निकाल लागला आणि मोहोळ खासदार झाले त्यावेळेस लगेचच पर्वती येथे काही पोस्टर्स सोशल मीडिया पोस्ट सोशल मीडिया वरती फिरू लागल्या ते म्हणजे आता आमदारकीला लढायचं पण आणि जिंकायचं पण. श्रीनाथ भिमाले यांनी खासदारकीला मोहनांचा काम अगदी जीव लावून केलं त्याचाच इम्पॅक्ट म्हणून पर्वती विधानसभेतून भाजपला निर्णय मिळालं. त्यामुळे आता आपण केलेलं काम त्या बदल्यात आपल्याला आमदारकीचे तिकीट मिळावं असं श्रीनाथ भिमाले यांनी बोलून दाखवले.  त्यामुळे आता पक्ष पुढे पेच पडला आहे की नक्की तिकीट द्यायचं कोणाला कारण माधुरी मिसाळ ह्या इथे सलग तीन टर्म आमदार राहिले आहेत तर आता श्रीनाथ भिमाले हे देखील येथे भाजप पक्षाचे काम करत आहे. पर्वतीय विधानसभा मतदारसंघाची 2009 ला निर्मिती झाली तेव्हापासूनच येथे भाजपने आपली पकड चांगली ठेवली आहे. भाजपच्या माधुरी मिसाळ यांच्यावर पर्वती मतदारांनी विश्वास ठेवला आहे. त्यामुळे त्या इथे सलग तीन टर्म आमदार म्हणून निवडून आल्या तसं पाहिले तर शहराच्या ठिकाणी सलग तीन टर्म एक महिला असूनही निवडून येणं तसं अवघड आहे. परंतु हे मात्र भाजपच्या माधुरी मिसाळ यांनी शक्य करून दाखवले.
2009 मध्ये भाजपच्या माधुरी मिसाळ यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिन तावरे यांच्यामध्ये लढत झाली.  परंतु 2009 मध्ये माधुरी मिसाळ यांनी बाजी मारली.  त्यानंतर इथे 2014 मध्ये ही माधुरी मिसाळ यांच्याविरुद्ध शिवसेनेकडून आमदारकीसाठी प्रयत्न झाले परंतु इथे शिवसेनेला यश मिळाले नाही. त्यानंतर 2019 मध्ये भाजपच्या माधुरी मिसाळ यांची विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अश्विनी कदम यांना तिकीट देण्यात आलं तसं तर 2019 मध्ये दोन्ही साईडने महिला असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला येथे आपण निवडून येऊ अशी आशा होती परंतु 2019 मध्ये माधुरी मिसाळ यांनी बाजी मारली. यावरूनच दिसते की राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना यांनी ही जागा मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले परंतु येथे त्यांना यश मिळाले नाही. माधुरी मिसाळ यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर या सलग तीन टर्म निवडून आल्यामुळे त्यांचा मतदारसंघावर चांगला होल्ड आहे.
 मार्केट यार्ड शांतीनगर बिबेवाडी सिटी प्राईड स्वारगेट हा मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय मतदार हा नेहमी भाजपच्या बाजूने राहिला आहे एकट्या पर्वती मधून 27 पैकी 23 नगरसेवक हे भाजपचे आहेत. या मतदारसंघातील गुजर, मारवाडी हा समाज भाजपच्या पाठीशी कायम भक्कमपणे उभा राहिलेल्या दिसतो. त्यामुळे ते माधुरी मिसाळ यांना भरभक्कम लीड मिळतं तसंच यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर माधुरी मिसाळ या मतदारसंघातील जनतेशी कनेक्ट नाहीत अशी ओरड आहे. तसेच तेथील झोपडपट्टी पुनर्वसन सिंहगड रस्त्यावरील कोंडी आंबेडकर वसाहत अशा ठिकाणी मूलभूत सुविधांची ही पूर्तता करण्यास माधुरी मिसाळ कुठेतरी कमी पडले आहेत. तसेच पानशेत धरण फुटल्यानंतर स्थलांतरित पुनर्वसन केले पण त्यांना पुनर्विकासासाठी आमदाराकडून पाहिजे त्या प्रमाणात मदत भेटलेली नाही अशी चर्चा आहे. परंतु हे सर्व झाल्यानंतर हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता मोहोळ यांना पर्वती येथे तीस हजार मतांचे लीड येथून भेटलेला आहे त्यामुळे येथील जनता भाजपवर नाराज आहे असं दिसत नाही.
त्यामुळे इथे माधुरी मिसाळ यांचं पारडे जड राहणार आहे परंतु आता भाजप पक्षाला प्रश्न पडला आहे की तीन टर्म आमदार राहिलेल्या उमेदवाराला तिकीट द्यायचं की भाजप पक्षासाठी काम करणाऱ्या उमेदवाराला तिकीट द्यायचं. कारण लोकसभेला मिळालेला भाजपचे यशाच्या क्रेडिट श्रीनाथ भीमाले यांनी स्वतः घेतले ते गेल्या पंधरा वर्षांपूर्वीच भाजपकडून आमदारकीसाठी तिकीट मागत होते. परंतु वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी आतापर्यंत पक्षाचं काम केलं आहे. तसेच त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांच्या घरी जाण्याचं काम केले आहे आणि त्यांनी वरिष्ठांना देखील सांगितले आहे की मला आता लढायचं आहे त्या अनुषंगाने चालू आहे त्यामुळे मला खात्री आहे की मला यावेळेस तिकीट भेटेल असे श्रीनाथ भीमाले यांनी सांगितले आहे. यामुळे माधुरी मिसाळ यांचा तिकीट कापून जर श्रीनाथ भिमाले यांना तिकीट दिले तर येथे भाजप पक्षाला फटका चान्सेस आहेत त्यामुळे महायुती सध्या तरी संभ्रमात आहे नक्की तिकीट कोणाला द्यायची? तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी कडून पर्वती येथे राष्ट्रवादी लढत आले आहे. परंतु आता येते काँग्रेसचे आबा बागुल पर्वतीच्या जागेसाठी आग्रही आहेत. त्यांचे देखील या मतदारसंघात बरसा जनसंपर्क आहे. त्यांनी ते तब्बल सहा टर्म नगरसेवक म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेऊन पर्वती हा विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षासाठी सोडावा अशी विनंती देखील केली आहे.
यावरूनच एकंदरीत असे दिसत आहे की पर्व तेथे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून अजूनही उमेदवार फिक्स नाही तरी देखील मतदार संघातील मतदारांचा कौल हा भाजपच्या बाजूने दिसत आहे. परंतु महायुतीकडून विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांचे तिकीट कापून जर श्रीनाथ भिमाले यांना उमेदवारी देण्यात आली तर याचा फटका भाजपला येथे नक्कीच बसू शकतो आणि याचाच फायदा इथे कदाचित महाविकास आघाडीला होऊ शकतो. तर मंडळी तुम्हाला काय वाटतं पर्वत येथे कोण आमदार व्हावा हे आम्हाला कमेंट करून सांगा.

Leave a Comment