PM Kusum Solar Pump Yojna|पीएम कुसुम सोलर पंप योजना 2025
पीएम कुसुम सोलर पंप योजना 2025 या प्रेरणादायी योजनेच्या माध्यमातून सरकार केंद्र शेतकऱ्याच्या शेतावर सौरपंप बसवणार आहे.
शेतकऱ्याला शेतीमध्ये उत्पादन घेण्यासाठी पाणी आणि वीज खूप महत्वाची असते.
तर आपल्या महाराष्ट्रामध्ये लाईटचे सरकारने शेड्युल केले आहे.
प्रत्येक आठवड्याला लाईटचे शेड्युल बदलत राहते.
एका आठवड्यातला सकाळी असते तर दुसऱ्या आठवड्यातला एक दुपारी येते तर तिसऱ्या आठवड्यातले ही संध्याकाळी येते.
त्यामुळे शेतकऱ्यांना सकाळ दुपार आणि संध्याकाळ असे तीनही टाईम शेतात जाऊन भरणे करावे लागतात.
आता यासाठी उपाय म्हणून सरकारने कुसुम सोलर पंप योजना ही चालू केली आहे.
या योजनेमुळे आपण आपल्या विहिरीवर सोलर पंप पासून आपण रात्रीची भरणी न करता दिवसभर भरणे करू शकतो.
त्यासाठी आपल्याला सरकारची लाईटची गरज लागणार नाही.
आपण आपल्या विहिरीवर बसवलेल्या सोलर पंपाचे निर्मितीतून होणाऱ्या वीज वरती शेतीला पाणी देऊ शकतो.
चला तर पाहूया कुसुम सोलर पंप योजना नक्की काय आहे? या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात आणि काय पात्रता लागते?
चला तर मुद्द्याचं बोलूया.
जगातील एकूण शेतीपैकी २०% शेती सिंचन पद्धतीने केली जाते .शेतीतील उत्पादन याचे एकूण प्रमाण बघितले तर ४०% उत्पादन हे शेतीमधून होत आहे .
नैसर्गिक पावसाच्या आधारे शेती व सिंचन शेती यामध्ये तुलना केल्यावर, सिंचन पद्धतीने केलेल्या शेतीचे उत्पन्न जास्त पटीने वाढलेले आपल्याला दिसते.
महाराष्ट्र राज्यात एकूण सिंचन क्षेत्र ४४.१९% लाख हे.असून त्यापैकी जवळपास ८०% क्षेत्र हे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे .यातील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक गटातील आहेत .
शेतकऱ्यांचा खर्च कमी करून त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रधानमंत्री कुसुम योजना सुरू करण्यात आली आहे.
पीएम कुसुम योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांच्या शेतात सौरपंप बसवणार आहे.
 त्यामुळे शेतकरी मोफत वीज निर्मिती करून त्याचा लाभ घेऊ शकणार आहे.
पंतप्रधान कुसुम योजना तीन भागांमध्ये विभागली आहे.
पहिला घटक ‘अ’ मध्ये ज्यांची जमीन नापीक आहे अशा शेतकऱ्यांचा समावेश होतो.
त्यांच्या शेतात सोलर प्लांट बसवून ते याचा फायदा घेऊ शकतील. यामध्ये 5000 किलोवॅटपासून ते 2 मेगावॅटपर्यंतचे सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यात येणार आहेत.
PM कुसुम योजनेअंतर्गत, घटक ‘B’ मध्ये सौर पंप बसवण्यासाठी एकूण खर्चाच्या फक्त 10% रुपये खर्च करावे लागेल. कारण खर्चानुसार 60% अनुदान सरकार देईल आणि 30% पर्यंत कर्ज दिले जाईल. हा सोलर पंप 25 वर्षांपर्यंत बसवला जाईल.
पीएम कुसुम योजनेच्या घटक ‘सी’ मध्ये, ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विद्युत पंप आहेत ते त्यांचे सौरीकरण करू शकतात. अनेक गावांमध्ये 24 तास वीज उपलब्ध नसते.
त्यामुळे शेतकरी आपल्या शेतात सोलर प्लांट बसवून 24 तास वीज वापरू शकतो.
शेतात पाण्याची कमतरता भासणार नाही आणि जे डिझेल वापरतात त्यांचा डिझेलचा खर्चही वाचेल.
चला तर पीएम कुसुम योजनेचा उद्देश पाहूया
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे भारतातील सर्व शेतकरी सर्वसंपन्न ,समृद्ध व्हावेत
यासाठी हि पीएम कुसुम सोलर पंप योजना अंमलात आणली आहे .
भारतात अनेक ठिकाणी वीज नसते, त्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान होत असते
 त्यामुळे जर शेतकरी वर्गणी या योजनेचा लाभ घेतला तर शेताला मुबलक पाणी मिळेल.
शेताचे उत्पन्न वाढेल ,वेळेची बचत होईल या सर्व गोष्टीचा फायदा शेतकऱ्याला मिळणार आहे .
डिझेल वर चालणाऱ्या पंपामुळे प्रदूषण सुधा वाढत होते ,तेही या योजनेने कमी होईल .या योजनेत सरकारकडून ६०% अनुदान दिले जाते तर ३०% कर्ज उपलब्ध करून दिले जाते .यामध्ये शेतकऱ्याला सुरवातीला फक्त १०% खर्च करावा लागणार आहे.
चला तर पीएम कुसुम योजना वैशिष्ठ्ये जाणून घेऊया
पी एम कुसुम योजनेंतर्गत ७.५ HP चे सौर पंप बसवण्यासाठी आर्थिक मदत किंवा सहाय्य केले जाते .
पीएम कुसुम योजनेंतर्गत सौर कृषी पंपासाठी केंद्रीय आर्थिक सहाय्य दिले जात असते .
या योजनेत राज्याचे सरकार, शेतकरी आणि बँक या तिघांचे योगदान राहते .
या योजनेसाठी वयक्तिक शेतकरी ,शेतकरी गट ,एफपीओ ,डब्लूयुए यांसारख्या संस्था यात पात्र असतात .
चला तर पीएम कुसुम सोलार योजना यासाठी कागदपत्रे कोणती लागतात हे पाहू.
पीएम कुसुम सोलर योजनेसाठी अर्जदार हा भारतीय नागरिक असावा .
या पीएम कुसुम योजना साठी अर्जदाराकडे किसान कार्ड असणे आवश्यक आहे.
रहिवाशी (राहत्या ठिकाणचा) पुरावा, अर्जदाराच्या जमिनीची कागदपत्रे, आधार कार्ड, अर्जदाराचे पासपोर्ट फोटो
मोबाईल क्रमांक, स्वतःच्या जमिनीचा ७/१२ उतारा,
अर्जदार स्वतः शेत जमिनीचा एकटा मालक नसेल तर बाकी हिस्सेदारांचा ना हरकत हे स्टंप पेपर वर द्यावे लागेल.
बँकेचे पासबुक, जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जाती जमाती साठी ),
शेतकऱ्याच्या जमिनीतील पाण्याचा स्रोत हा डार्क झोन मध्ये असेल तर भूजल सर्वेक्षण विभागाचा ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे .
पीएम कुसुम सोलार योजनेची पात्रता काय आहे ते पाहू
ज्या भागात आतापर्यंत वीज पोहोचलीच नाही अश्या शेतकरी वर्गाला याचा अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे.
या योजनेसाठी कुठलीही अट नाही म्हणजेच मोठे क्षेत्र ,अल्प , लघु क्षेत्र असणर्या सर्व शेतकरी वर्ग या योजनेस पात्र असणार आहे.
हि योजना सर्व जाती जमाती साठी असणार आहे , खुला वर्ग , अनुसूचित जाती जमाती हे सर्व या योजनेस पात्र आहेत.
चला तर पाहूया अनुदान कश्याप्रकारे दिले जाते ?
३ HP पंपाची किंमत ही एक लाख 93 हजार 803 रुपये आहे.
यामध्ये सर्वसाधारण शेतकऱ्याला 19हजार 380 रुपये भरायचे आहेत तर अनुसूचित जाती जमाती शेतकऱ्याला नऊ हजार सहाशे नव्वद रुपये भरायचे आहे
५ HP पंपाची किंमत दोन लाख 69 हजार 746 आहे
यामध्ये सर्वसाधारण शेतकऱ्याला 26 हजार 975 एवढे रुपये भरायचे आहेत तर अनुसूचित जाती जमाती शेतकऱ्याला 13 हजार 488 एवढे रुपये भरायचे आहेत.
७.५ HP पंपाची किंमत तीन लाख 74 हजार 402 रुपये आहे
 यामध्ये सर्वसाधारण शेतकऱ्याला 37 हजार 440 रुपये भरायचे आहेत. तर अनुसूचित जाती जमाती शेतकऱ्याला 18 हजार 720 रुपये भरायचे आहे.
लाभार्थी शेतकऱ्याला जमिनीच्या क्षेत्रानुसार सौर पंप मिळणार आहेत
ज्या शेतकऱ्याकडे ५ एकर शेतजमीन आहे त्याला ७.५ HP चा सौर पंप मिळेल .
२.५ ते ५ एकर शेतजमीन असणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्याला ५ HP चा सौर पंप मिळेल.
२.५ एकर शेतजमीन असणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्याला ३ HP चा सौर पंप मिळेल
चला तर पाहूया पीएम कुसुम योजनेसाठी फॉर्म कसा भरावा?
सुरवातीला अर्जदार शेतकऱ्याला सरकाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल (PM Kusum Solar Pump 2025).
त्यावर Solar Kusum Yojna या पर्यायावर क्लिक करावे .
किंवा https://pmkusum.mnre.gov.in/ या लिंक वर जाऊन क्लिक करावे
त्यानंतर तुम्हाला समोर असलेल्या Make New Application वरती क्लिक करावे. समोर नवीन पेज उघडेल.
समोर आलेल्या पेज वर आपला मोबाईल क्रमांक टाकून ओटीपी आपल्या मोबाईल क्रमांक येईल तो टाकावा.
शेतकऱ्याने आपल्या बद्दलची सर्व माहिती भरावी ,त्यानंतर समोर असणाऱ्या Next बटनवर क्लिक करावे .
यांनतर शेतकऱ्याला आपली माहिती पुन्हा भरावी लागणार आहे ,त्यात शेतकऱ्याने आधार ई केवायसी ,बँकेचा तपशील ,जातीचे स्वघोषणा,जमिनी संबंधित कागदपत्रे तसेच सौर पंप माहिती भरावी .
त्यानंतर शेवटी सेल्फ डीक्लेरशन चेक बॉक्स वरती क्लिक करावे म्हणजे तुमचा अर्ज पूर्ण होईल ,नंतर पेमेंट करावे ,पेमेंट केल्यावर एक क्रमांक प्राप्त होईल आणि मोबाईल वरती याची माहिती मेसेज वरती दिली जाईल .जी माहिती तुम्ही भरली आहे त्याची प्रत म्हणून घ्या म्हणजे भविष्यात काही माहितीसाठी अडचणी येणार नाहीत .
चला तर पीएम कुसुम सोलर पंप योजना फायदे जाणून घेऊया
भारतात ज्या शेतकरी मित्रांकडे शेतात वीज नाही ते या योजनेचा फायदा घेवू शकतात .
PM Kusum Solar Pump Yojna योजनेंतर्गत शेतकऱ्याला शेतात सौर प्लांट बसविले जाणार आहेत .
पीएम कुसुम योजना मुळे डिझेलचा खर्च तसेच प्रदुषण सुद्धा कमी होईल .
या योजनेच्या माध्यमातून शेतकरी सोलर प्लांट बसवून शेतात २४ तास सिंचन करू शकतात.
शेतकरी सोलर प्लांट बसवून वीजनिर्मिती तर करतीलच शिवाय शेतातील उत्पन्नही वाढवू शकतात.
सौर पंप पासून तयार झालेली वीज शेतकरी हे विकूही शकतात .
विकून आलेल्या पैश्यातून शेतकरी नवीन शेती धंदा किंवा व्यवसाय उभारू शकतात .
खुल्या वर्गातील शेतकऱ्याला ९०% अनुदान देण्यात येईल तसेच अनुसूचित जाती ,जमाती साठी ९५% अनुदान देण्यात येते .
सौर पेनल हा विशिष्ठ उंचीवर बसवला जातो त्यामुळे शेतकऱ्याला पिके घेण्यास अडचण येत नाही .
आता सर्वात महत्त्वाची सूचना अशी आहे कुसुम सोलार योजना ही 31 मार्च 2026 पर्यंत चालू राहणार आहे.
त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर शेतकऱ्यांनी आपल्या अर्ज करावे.

By satta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *