प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2025

आज आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना याबद्दल सविस्तर माहिती.

आजच्या काळात जीवन विमा असणे हे किती महत्त्वाचा आहे हे कोरोना नंतर समजले आहे.
त्यामुळे आज प्रत्येक जण आरोग्य विमा करत आहे परंतु काही कुटुंबियांनाजीवन आरोग्य विमा करणे परवडत नाही तर यांच्यासाठी सरकार 2015 मध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना घेऊन आलेल आहे.
या योजनेत वय वर्ष 18 ते 50 यामधील कोणतीही व्यक्ती समाविष्ट होऊ शकते.
यामध्ये जर अचानक विमा घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास या योजनेचा लाभ कुटुंबातील ज्या व्यक्तीचे नाव विमाधारकाने नॉमिनी म्हणून केलेलं असेल त्याला या योजनेचा लाभ मिळतो.
चला तर पाहूया प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा या योजनेसाठी पात्रता काय आहे अर्ज कसा करावा कागदपत्रे कोणती लागतात याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
चला तर या योजनेवरती मुद्देसूद बोलूया.
चला तर पाहूया प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची वैशिष्ट्ये काय आहे?
एक काळाचा होता की भारतामध्ये फक्त 20% लोकांकडेच जीवन विमा होता.
या 20 टक्क्यावरून शंभर टक्क्यांवर जाण्यासाठी प्रधानमंत्री जीवन विमा योजना चालू केली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी वय १८ ते ५० आवश्यक आहे ,पण जे वयाच्या ५० वर्ष आधीपासून योजनेत असतील तर त्यांना या विम्याचे संरक्षण वयाच्या ५५ वर्षापर्यंत मिळते
या योजनेत विमा धारकाच्या खात्यातून वेळोवेळी हप्ता वर्ग करून घेतला जातो या हत्यासाठी आर्थिक वर्ष १ जून ते ३ मे असते .
योजनेतील लाभार्थी/ विमाधारकाचा अचानक नैसर्गिक रित्या मुर्त्यू झाल्यास त्याच्या नॉमिनी असणाऱ्या सदस्याला ताबडतोब प्रक्रिया करून रुपये २ लाख दिले जातात.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठल्याही विमा कंपनी मध्ये नोंदणी करून खाते उघडु शकतो.
हि योजना म्हणजे एक वर्षाची टर्म इन्शुरन्स असते ,
हि योजना प्रत्येक वर्षी नुतनीकरण करावी लागते .
या योजनेसाठी LIC सोबत सामंजस्य करार केलेला आहे.
चला तर पाहूया प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना पात्रता काय आहे
प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेसाठी नागरिक हा भारतीय असावा.
या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराकडे या आधी कोणतीही जीवन विमा योजना नसावी.
अर्ज दाराचे वय हे १८ ते ५० या दरम्यानच असावे
या योजनेचा हप्ता जाण्यसाठी अर्जदाराने त्याच्या बँकेच्या खात्यात पुरेशी रक्कम ठेवणे गरजेचे आहे.
चला तर पाहूया प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना कागदपत्रे कोणती लागतात?
आधार कार्ड
ओळखपत्र (मतदान अथवा पॅन कार्ड )
बँक खाते पासबुक
पासपोर्ट फोटो
मोबाईल क्रमांक
कोणत्याही सरकारी बँकेत स्वतःचे बँक अकाउंट
चला तर पाहूया प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अर्ज कसा करावा
सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या जवळच्या बँक शाखेमध्ये जावे , तेथून योजनेचा अर्ज घेणे.
अर्ज घेतल्यानंतर नाव पत्ता मोबाईल क्रमांक अश्या सर्व प्रकारची सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी , माहिती भरल्यानंतर एकदा सर्व माहिती पडताळून पाहणे
अर्ज करताना भविष्यात वेळेवर पैसे जमा होण्यासाठी ऑटो डेबिटचा पर्याय ठेवावा तसेच हा पर्याय निवडताना अर्जावर सही करावी.
तुमच्या अर्जासोबत तुमच्या आधार कार्ड ची स्वाक्षरी प्रत तसेच इतर कागदपत्रे अर्जासोबत जोडून द्यावी
अर्ज भरताना तुम्ही तुमचा एखादा परिवारातील नॉमिनी करावा त्याची संपूर्ण माहिती भरावी , जेणेकरून अर्जदाराचा मृत्यू झाल्यास त्याला या विमा योजनेचा लाभ घेता येईल.
या योजनेसाठी तुमचे वार्षिक रुपये ३३० याप्रमाणे खात्यामधून ऑटो- डेबिट होत राहतील.
चला तर पाहूया प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना फायदे कोणते आहेत?
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना मधुन आपल्याला परवडल असे विम्याचे कवच आपल्याला सहजरित्या मिळते.
या योजनेमधील जो हप्ता हा वार्षिक असून तो फक्त 330 रुपये आहे. त्यामुळे आपल्या अप्रीवाराचे संरक्षण करू पाहणाऱ्याला ते सहज परवडते.
यामध्ये जर अर्जदाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबातील जो नॉमिनी असेल त्याला अगदी सहजरित्या विम्याची २ लाख रुपये रक्कम प्रधान केली जाते.
योजनेची नोंदणी प्रक्रिया अतिशय सुलभ पद्धतीने केली आहे , आपण बँकेत गेल्यावर अगदी कमी वेळेत याबद्दलची प्रकिया पूर्ण करू शकता.
हि योजना आयकर विभागा अंतर्गत येते कलम 80C कर लाभासाठी लाभार्थी पात्र ठरतात.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजेनेतील कोणती काळजी घ्यावी?
या योजनेमध्ये अर्जदाराने अर्ज केल्यानंतर ३० दिवसाच्या आत अपघाती मृत्यू झाल्यास विम्याचे संरक्षण दिले जाणार नाही.
अर्जदाराने स्वतःला जाणून-बुजून केलेली दुखापत यामध्ये ग्राह्य धरली जाणार नाही.
मादक /अमली पदार्थाच्या सेवनाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यास संरक्षण मिळणार नाही.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची ऑनलाईन स्थिती कशी पहावी?
तुमचे खाते ज्या बँकेत असेल त्या बँकेच्या अधिकृत संकेत स्थळावर यावे ,तिथे तुम्हाला इंटरनेट बँकिंग म्हणून दिसेल तिथे तुम्ही योग्य माहिती भरून लॉगीन करावे.
आपल्या समोर PMJJBY हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे आणि आपला योग्य तो बँकेचा खाते क्रमांक टाकावा.
तदनंतर तुमच्या अर्जावरचा क्रमांक टाकावा आणि सबमिट करावे , अश्याने समोरच तुम्हाला खात्याची सर्व माहिती मिळेल.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विम्याचे प्रमाणपत्र कसे मिळवावे ?
तुमच्या बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे .
त्यातील ‘सामाजिक सुरक्षा योजना ‘यावर क्लिक करा.
त्यात ‘प्रधानमंत्री जीवन विमा योजना’ हा पर्याय निवडावा .
समोर व्यवहार करण्याचा पर्याय निवडा .
पुढे आपले नाव, आधार क्रमांक ,जन्म तारीख टाकावी .
सर्व माहिती दिल्यांनतर ;उत्तम आरोग्यासाठी घोषणा’ व नंतर सबमिट वरती क्लिक करावे
संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला या योजनेचे प्रमाणपत्र डाऊनलोड करता येईल.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा अंतर्गत अनिवासी भारतीयांना या योजनेचा लाभ घेता येईल का ?
या योजनेमध्ये अनिवासी भारतीयांना लाभ घेता येतो पण त्यांचे खाते भारतातील बँकेच्या शाखेत असेल तर आणि त्यांनी या योजनेसाठी लागणाऱ्या बाबी पूर्ण केल्या असतील तरच ते या योजनेस पत्र असतील.अनिवासी भारतीयाचा मृत्यू झाल्यास त्याच्या भारतातील नॉमिनी असणाऱ्या व्यक्तीलाच लाभ दिला जातो.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना कधी बंद पडू शकते ?
लाभार्थी / विमाधारकाचे वय ७० वर्ष झाल्यावर योजना बंद होईल .
खातेदाराचे बँकेतील बचत खाते बंद पडल्याने सुद्धा योजना बंद पडते .
हप्ता जाण्याच्या वेळी खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने योजना खंडित होते
एकापेक्षा जास्त बँकेद्वारे योजनेसाठी अर्ज केल्यावर सुद्धा योजना बंद पडेल.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा क्लेम कसा करावा ?
योजनेसाठी ज्या बँकेद्वारे अर्ज केला होता त्या बँकेमध्ये जाणे.
बँकेमध्ये गेल्यावर क्लेम साठी अर्ज घ्यावा , तो योग्य माहितीसह भरावा .
आवश्यक ती कागदपत्रे त्या क्लेम अर्ज सोबत जोडून बँकेत जमा करावे.
बँकेद्वारे योग्य ती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर काही कालावधी आपल्या खात्यामध्ये रक्कम जमा होते.

By satta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *