प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना 2025

आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशामध्ये शेतीला जास्त महत्त्व दिले जाते.

आपल्या देशात शेतकर्याला अन्नदाता ही उपमा दिलेली आहे.
2014 ला नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर 2018 मध्ये प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना जाहीर केली.
या योजनेची अंमलबजावणी ही 24 फेब्रुवारी 2019 मध्ये करण्यात आली.
 पीएम किसान योजने अंतर्गत ज्यांनी अर्ज करून पात्र ठरलेले असतील त्यांना प्रतिवर्षी रुपये ६००० याप्रमाणे रक्कम खात्यावर जमा होईल .वर्षाचे ३ भाग याप्रमाणे प्रत्येक ४ महिन्यांनी रुपये २००० चा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होत राहील.
भारत देशातील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी प्रत्येकी सहा हजार रुपये याप्रमाणे पी एम किसान योजना खात्यावर पैसे जमा केले जातात.
परंतु या योजनेपासून अजूनही काही शेतकरी वंचित आहेत.
चला तर पाहूया पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना नक्की काय आहे.
यासाठी कोणत्या नियम व अटी आहेत तसेच कोणती कागदपत्रे लागतात आणि प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसाठी नक्की फॉर्म कुठे भरायचा याची सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत.
मुद्दा क्रमांक १) पी एम किसान सन्मान योजनेचा उद्देश नक्की काय आहे
पी एम किसान योजना ही शेतकऱ्याला आधार देणारी ठरलेली आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा व्हावी तसेच पेरणी, फवराणी तसेच इतर महत्त्वाच्या शेतीविषयक कामांसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी हा या योजनेमागचा प्रमुख उद्देश आहे.
शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करणे.
शेतीसाठी आवश्यक साधनांची खरेदी करण्यास मदत करणे.
शेतीला प्रोत्साहन देणे.
मुद्दा क्रमांक २) पी एम किसान सन्मान योजनेची पात्रता काय आहे
शेतकरी भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
शेतकऱ्याची 2 हेक्टरपर्यंत जमीन असणे आवश्यक आहे. आता हि अट काढण्यात आली आहे.
ज्या लाभार्थीकडे शेतीयोग्य जमीन असेल ते योजनेस पात्र असतील.
१ जानेवारी २०१९ पूर्वी घेतलेली जमीन असेल तरीही ते या योजनेस पात्र असतील
शेतकऱ्याचे नाव aadhar शी लिंक असणे आवश्यक आहे.
शेतकरी आयकरदाता नसणे आवश्यक आहे.
मुद्दा क्रमांक ३) या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात
आधार कार्ड
बँक खाते क्रमांक
भूमी अभिलेख
मुद्दा क्रमांक ४) पी एम किसान सन्मान योजनेचे फायदे कोणते आहे?
शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते.
शेतीसाठी आवश्यक साधनांची खरेदी करण्यास मदत होते.
शेतीला प्रोत्साहन मिळते.
मुद्दा क्रमांक ५ ) योजनेसाठी अर्ज कसा करावा:
पीएम किसान योजनेसाठी अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने करता येतो.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
ऑफलाइन अर्ज करण्यासाठी, जवळच्या कृषी कार्यालयात संपर्क साधा.
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसाठी सरकारच्या अधिकृत संकेत स्थळाला https://pmkisan.gov.in/ भेट द्या
संकेतस्थळावर उजव्या बाजुला ‘नवीन शेतकरी नोंदणी ‘ असेल त्यावर क्लिक करावे.
समोर फॉर्म उघडल्यानंतर आपले नाव, मोबाईल क्रमांक , आधार कार्ड क्रमांक टाकावा.
त्यानंतर आपल्या बँक खात्याशी संबधीत सर्व गोष्टी भराव्यात .
सर्व गोष्टी अचूक भरल्या कि नाही ते एकदा पहावे.
सर्व अचूक असेल तर आपला फॉर्म सबमिट करावा .
पीएम किसान योजना खात्याची स्थिती कशी पहावी
पीएम किसान योजनेची स्थिती पाहण्यासाठी सुरवातीला शासनाचे अधिकृत संकेतस्थळ https://pmkisan.gov.in/ यावर जावे .
उजव्या बाजूला आपल्याला ‘Know Your Status ‘असे दिसेल त्यावर क्लिक करावे .
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसाठी सरकारच्या अधिकृत संकेत स्थळाला https://pmkisan.gov.in/ भेट द्या
संकेतस्थळावर उजव्या बाजुला ‘नवीन शेतकरी नोंदणी ‘ असेल त्यावर क्लिक करावे.
समोर फॉर्म उघडल्यानंतर आपले नाव, मोबाईल क्रमांक , आधार कार्ड क्रमांक टाकावा.
त्यानंतर आपल्या बँक खात्याशी संबधीत सर्व गोष्टी भराव्यात .
सर्व गोष्टी अचूक भरल्या कि नाही ते एकदा पहावे.
सर्व अचूक असेल तर आपला फॉर्म सबमिट करावा .
त्यानंतर सुरवातीला अर्ज करतेवेळी नोंदवलेला मोबाईल क्रमांक , तसेच कॅप्चा आपल्याला टाकावा लागेल
अश्याप्रकारे आपल्याला PM Kisan या योजनेची आपली सध्याची स्थिती काय आहे हे पाहता येईल.
PM Kisan E-KYC प्रक्रिया कशी करावी
PM Kisan E -KYC प्रक्रिया साठी प्रथमतः आपल्याला अधिकृत संकेतस्थळ यावर जावे लागेल.
समोर दिसत असलेल्या Former Section वरती दिसत असलेल्या E-KYC यावर क्लिक करावे लागेल
E-KYC वरती क्लिक करून आल्यानंतर खालील रकान्यात आधार कार्ड क्रमांक टाकावा आणि search वरती क्लिक करावे
तर मंडळी तुम्ही देखील अजून पीएम किसान सन्मान योजनेचा निधी घेतला नसेल तर तुम्ही देखील फॉर्म भरून हा निधी घेऊ शकता.
तुम्ही पीएम किसान सन्मान योजनेचा निधी घेता का? हे आम्हाला कमेंट्स करून सांगा

By satta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *