प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना सविस्तर माहिती 

आज आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना याबद्दल सविस्तर माहिती

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज या योजनेअंतर्गत घरावरती सोलर पॅनल तुम्ही बसू शकता.
या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी अनुदान दिले जाते.
प्रधानमंत्री सूर्य घर: मुफ्त बिजली योजना ही भारतातील घरांना मोफत वीज पुरवण्याचे उद्दिष्ट असलेली एक सरकारी योजना आहे.
 ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरू केली होती.
 या योजनेअंतर्गत, घरांना त्यांच्या छतावर सौर पॅनेल बसवण्यासाठी अनुदान दिले जाईल.
या अनुदानात सौर पॅनेलच्या किमतीच्या ४०% पर्यंत रक्कम समाविष्ट असेल.
या योजनेचा ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा आहे? योजनेसाठी पात्रता काय आहे? या योजनेचा उद्देश काय आहे? आणि या योजनेचा लाभ कसा घेता येईल याबाबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे पाहू.
 नमस्कार मी पिके भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो.
चला तर या योजनेबाबत मुद्देसूद माहिती पाहूया.
चला तर पाहूया या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत?
या योजनेमुळे घरगुती बिलामध्ये मोठी बचत होणार आहे.
या योजने अंतर्गत १ ते ३ किलोवॅट पर्यंत ४०% अनुदान मिळणार आहे.
३ किलोवॅट ते १० किलोवॅट पर्यंत २०% अनुदान मिळणार आहे.
तसेच सामूहिक वापरासाठी ५०० किलोवॅट पर्यंत आणि प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट पर्यंत मर्यादा आहे.
तसेच जी शिल्लक राहिलेली वीज आहे ती महावितरण कंपनी प्रति युनिट प्रमाणे विकत घेणार आहे.
चला तर पाहूया योजनेची पात्रता काय आहे?
या योजनेसाठी पात्र होण्यासाठी सर्व प्रथम अर्जदार हा भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
अर्जदाराच्या कुटुंबामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरदार नसला पाहिजे.
अर्जदाराचे बँकेचे खाते त्याच्या आधार कार्ड सोबत जोडलेले असावे
अर्जदाराकडे त्याच्या नावाचे वीज बिल असणे आवश्यक आहे.
जर तुम्हाला झिरोपासून दीडशे पर्यंत जर तुमच्या बिलामध्ये युनिट पडत असतील तर तुम्ही १ ते २ किलो वॅट साठी अप्लाय करू शकता.
आणि तुम्हाला 30,000/- ते 60,000/- रु. पर्यंत सबसिडी भेटेल जर तुमचे बिलांचे युनिट 150 ते 300 पडत असेल तर दोन ते तीन किलो वॅट पर्यंतचा तुम्ही सोलर बसू शकता.
आणि 300 पेक्षा जास्त युनिट जर तुमचे बिलाचे युनिट असेल तर 3 किलो वॅट चा सोलर प्लांट तुम्ही बसवू शकता. ज्यामध्ये 78000 सबसिडी तुम्हाला भेटू शकते.
चला तर पाहूया प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?
आधार कार्ड
वीज बिल
रेशन कार्ड
पत्त्याचा पुरावा
मोबाईल नंबर
बँक खाते पासबुक (बँक खाते आधार कार्डशी जोडलेलं असावे)
ही सर्व कागदपत्रे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेसाठी लागतात.
चला तर पाहूया योजनेचे फायदे कोणते आहेत?
या योजनेमुळे देशातील 1 कोटी नागरिकांना खूप मोठा फायदा होणार आहे. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना अंतर्गत जास्तीत जास्त सौर ऊर्जेचा वापर कसा करावा त्यावर भर दिली गेली आहे. या योजनेमुळे होणारे काही फायदे खाली देण्यात आले आहे.
1) 1 कोटी घरासाठी मोफत वीज मिळेल
2) सरकारच्या वीज खर्चात होणारी 50 लाख रुपये बचत होईल.
3) सौर ऊर्जेचा वाढीव वापर होईल आणि त्यामुळे इतर नैसर्गिक साधनांची बचत होईल.
4) कोळशामुळे तयार होणारी वीज कमी होईल आणि त्यामुळे प्रदूषण कमी होईल.
5) नागरिकांना वीजेत खंड न पडता वीजेचा चा वापर करता येईल.
6) 40 टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळेल.
प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी रजिस्ट्रेशन कसे करायचे?
1) Registration करण्यासाठी pmsuryaghar.gov.in
 वेबसाईट वरती क्लिक करा.
2) त्यानंतर “Apply For Rooftop Solar” या पर्यावर क्लिक करा.
3) आता “Register Here” या पर्यायावर क्लिक करा.
4) आता तुमचे राज्य व जिल्हा निवडा
5) त्यानंतर वीज वितरण कंपनी निवडा आणि तुमचा ग्राहक खाते क्रमांक (Consumer Number) टाका.
6) या नंतर “Next” या बटनावर क्लिक करा.
7) तुमचा मोबाईल नंबर टाका आणि OTP पाठवून परत आलेला OTP टाका.
8) आता समोर दिसत असलेला CAPTCHA टाका आणि “Submit” करा.
9) येथे तुमची नवीन नोंदणी झाली (Registration) झाले..
तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुढील फॉर्म कसा भरावा ते पाहू.
1) रजिस्ट्रेशन झाल्यानंतर परत तुम्हाला या pmsuryaghar.gov.in अधिकृत वेबसाईट वरती यायचं आहे.
2) येथे “Login Here” या पर्याया वर क्लिक करा
3) तुमचा Registered Mobile नंबर व संकेतांक (Human Check) टाका आणि Next बटनावर क्लिक करा.
4) येथे आता Apply For Rooftop Solar Installation चा फॉर्म भरावा लागेल.
5) या फॉर्ममध्ये “Application Details” म्हणजे तुमची माहिती भरावी लागेल.
6) त्यानंतर काही “Documents Upload” करावे लागेल.
7) आता फार्म चेक करून Final Submit करावा लागेल.
8) यानंतर तुमचा फॉर्म Inspection साठी जाईल तो Approved होईल.
9) आणि मग तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.
पी एम सूर्य घर फ्री वीज योजना अंतर्गत अर्ज केल्यानंतर त्याचे Status कसे चेक करायचे.
1) फॉर्म भरल्यानंतर त्याचं स्टेटस चेक करण्यासाठी pmsuryaghar.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
2) आता “Login Here” या पर्यायावर क्लिक करून मोबाईल नंबर चा वापर करून लॉगिन करून घ्या.
3) आता तुम्ही भरलेला फॉर्म ची स्थिती चेक करण्यासाठी “Track Details” या पर्यायावर क्लिक करा.
4) आता तुम्ही तुमच्या फॉर्म ची स्थिती चेक करू शकता.
पी एम सूर्यघर योजनेसाठी अर्जदाराला स्वतः किती खर्च येईल. याबाबतची माहिती मिळवण्यासाठी “PM Surya Ghar Yojana Calculator” तयार करण्यात आले आहे. ज्याच्या मदतीने तुम्हाला अंदाजे किती खर्च येईल ती माहिती मिळते. हे कॅल्क्युलेटर कसे वापरायचे त्याबाबतची माहिती पाहू
1) पी एम सूर्य कर योजना कॅल्क्युलेटर वापरण्यासाठी pmsuryaghar.gov.in वेबसाईटला भेट द्या.
2) येथे “Know More About Rooftop Solar” या पर्यायाच्या खाली Calculator असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
3) हे जे काही माहिती विचारली जाईल ती भरा आणि Calculate बटनावर क्लिक करा.
4) आता या कॅल्क्युलेटर मध्ये तुम्ही जेवढी अचूक माहिती भराल तेवढे अचूक परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील.
5) अशा पद्धतीने तुम्ही पीएम सूर्य घर योजनेचे कॅल्क्युलेटर वापरू शकतात.
तर मंडळी तुम्हाला देखील सूर्यघर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही याप्रमाणे फॉर्म भरून सूर्यघर या योजनेचा लाभ घेऊ शकता.

By satta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *