फाशीची शिक्षा पहाटेच का दिली जाते ?
सध्या महाराष्ट्रामध्ये मस्साजोग येथील संतोष देशमुख प्रकरण चांगलेच गाजत आहे.
यामध्ये आता आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी होत आहे.
गुन्हेगारांनी वेगवेगळे गुन्हे केल्यानंतर गुन्हे कोणत्या स्वरूपाचे आहेत हे तपासून झाल्यानंतर गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावली जाते.
फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर गुन्हेगारांना किती दिवसांनी फाशी दिली जाते आणि ती कशा पद्धतीने दिली जाते तसेच फाशी ही नेहमी पहाटेच का दिली जाते याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.
चला तर पाहूया कैद्यांना फाशी ही नेहमी पहाटेच का दिली जाते?
भारतात 30 हून अधिक जेल्समध्ये गुन्हेगारांना फाशी देण्याची सोय आहे. म्हणजे इथे फाशीचा स्तंभ आहे.
सामूहिक बलात्कार, सामूहिक हत्याकांड, खून देशाविरोधी कारवाया निर्घृण गुन्हे , दुर्मिळ स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या आरोपींना फाशी देण्याची कायदेशीर तरतूद करण्यात आलेले आहे.
अशा स्वरूपाच्या खटल्यांचे कामकाज सुरुवातीला त्या त्या जिल्ह्यातील न्यायालयापुढे चालते.
आरोपीला फाशी देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही ही महत्त्वाची कारणे समोर आल्यास जिल्हा न्यायालय अशा आरोपींना फाशीची शिक्षा होते.
परंतु या शिक्षेवर उच्च न्यायालयाची अनुमती आवश्यक असते.
त्यामुळे अशा खटल्यांचे कामकाज पुन्हा उच्च न्यायालयात चालते.
उच्च न्यायालयाला जिल्हा न्यायालयाचा निर्णय आणि फाशी देण्याची करणे योग्य आहे असं वाटले तर फाशीची शिक्षा कायम होते.
याच्यानंतर भाषेच्या शिक्षणात सर्वोच्च न्यायालयात देखील आव्हान दिले जाऊ शकते.
सर्वोच्च न्यायालय मध्ये न्यायालयाच्या दोन किंवा तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे या खटल्याचे काम चालते.
सर्वोच्च न्यायालयाला खालच्या न्यायालयाने दिलेल्या निर्णय आणि त्याची कारणे योग्य वाटली तर फाशीची शिक्षा कायम होते.
यानंतरही आरोपीला फाशीची शिक्षा रद्द करण्याची शेवटची संधी असते ती म्हणजे देशाच्या राष्ट्रपतींकडे दया याचना अर्ज करता येतो.
राष्ट्रपती आरोपीची एकूण प्रकरणाचे गंभीर्य आणि आरोपीची पार्श्वभूमी विचारात घेऊन फाशीची शिक्षा रद्द करू शकतात किंवा कायम ठेवू शकतात.
त्यानंतर सर्वोच्च न्यायालय किंवा राष्ट्रपतींचा अंतिम निर्णय आल्यानंतर या शिक्षेच्या अंमलबजावणीला सुरुवात होते.
प्रत्येक राज्यात फाशी देण्याची वेगळे नियम असतात.
काही राज्यांमध्ये कैद्यांना फाशीच्या आधी 14 दिवसांचा वेळ दिला जातो.
म्हणजे कैदी आपल्या कुटुंबियांना भेटू शकेल आणि आपल्या फाशीची मानसिकरित्या तयारी करू शकेल.
एखाद्या आरोपीला फाशीची शिक्षा झाल्यास त्याची अंमलबजावणी करण्याची एक विशिष्ट पद्धत असते.
सर्वात पहिली तयारी केली जाते ती म्हणजे कायद्याची मानसिक तयारी
आता आपल्याला फाशी देण्यात येणार आहे अशी मानसिकता कायद्याची तयार करण्यात येते.
ज्या दिवशी फाशी देण्यात येणार आहे त्यात तारखेच्या अगोदर चार-पाच दिवस कैद्याला तुरुंगात हजर करण्यात येते.
कारण तेथे अगोदरच काही निर्ढावलेले गुन्हेगार असतात त्या गुन्हेगारांना पाहून आणि त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची वर्णने ऐकून कैदी मानसिकरित्या अधिक सक्षम बनतो.
त्यानंतर दुसरी तयारी चालू होती ती म्हणजे प्रत्यक्ष फाशीचा सराव.
फाशीच्या कैद्याला वेगळ्या कोठडीत ठेवावा लागत.
फाशीच्या शिक्षेची सगळी जबाबदारी ही तुरुंग अधीक्षकांची असते.
फाशीचा स्तंभ , कैद्याच्या चेहऱ्यावर टाकायचं कापड सगळं नीट असावा लागते.
शिवाय या सगळ्या गोष्टी वेळेवर मिळतील याची तजवीज त्यांना करावी लागते.
त्यामध्ये त्यांना फाशीच्या स्तंभ व्यवस्थित उभा आहे का? दोर मजबूत आहे का ? त्याच्या खटक्याला तेल पाणी केलेले आहे का? तेथील साफसफाई झालेली आहे का? हे सर्व अगोदर चेक केले जाते.
त्यानंतर फाशी दिल्या जाणाऱ्या कैद्याच्या वजनाच्या सुमारे दीडपट इतका पुतळा बनवला जातो व त्याला फाशी देण्याचा सराव केला जातो.
जेणेकरून एनवेळी कोणतेही अडचण येऊ नये.
त्यानंतर आरोपीचे वजन पेलू शकेल इतक्या वजनाची दोरी आणली जाते.
या दोरी भारतातील फक्त बिहारमधील बक्सर या शहरात असलेल्या तुरुंगात बनवल्या जातात.
गळ्याभोवती दोरी आवळल्यानंतर कैद्याला त्रास होऊ नये यासाठी या दोरीला तूप तेल व पिकलेल्या केळ्याचा लेप लावून मुलायम बनविले जाते.
कैद्याच्या फाशीच्या शिक्षेच्या अगोदर पंधरा दिवस नातेवाईकांना कळवले जाते.
जेणेकरून ते आरोपीला शेवटच्या वेळी भेटू शकतात.
त्यानंतर फाशीच्या दिवशी कैद्याला अंघोळ करून नवीन काळे कपडे दिले जातात.
त्याला नेहमीचा चहा व नाश्ता दिला जातो.
कायद्याची इच्छा असल्यास त्याला देवाची प्रार्थना करण्यास व धार्मिक व्यक्तीद्वारा प्रार्थना ऐकण्याची मुभा दिली जाते.
अधीक्षकांच्या देखरेखीखाली रक्षक कैद्याला फाशीच्या खोलीत आणतात.
फाशीच्या वेळी जल्लादा व्यतिरिक्त कारागृह अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी आणि दंडाधिकारी उपस्थित असतात. फाशी देण्यापूर्वी त्याला काही दिसू नये म्हणून त्याच्या चेहर्यावर काळी टोपी चढविली जाते.
फाशी देण्यापूर्वी अधीक्षक दंडाधिकारी यांना कळवतात की, कैद्याची ओळख पटली आहे आणि त्याला मृत्यूचे वॉरंट वाचून दाखवले आहे.
डेथ वॉरंटवर कैद्याच्या सह्या अगोदरच घेतलेल्या असतात.
यानंतर अधिक्षकांच्या उपस्थितीत कैद्याचं बोलणं रेकॉर्ड केलं जातं. मग अधीक्षक फाशीच्या ठिकाणी जातात. उप-अधीक्षक मात्र कोठडीतच थांबतात.
फाशी देण्यापूर्वी कैद्याला त्याची शेवटची इच्छा विचारली जाते.
कैद्याच्या त्याच इच्छा पूर्ण केल्या जातात, ज्या तुरुंगाच्या नियमावलीत लिहिलेल्या असतात.
कैद्याला त्याच्या कोठडीतून बाहेर आणल्यापासून ते फाशी देईपर्यंत कोणीही काही बोलत नाहीत.
फाशीच्या एक दिवस आधी संध्याकाळी फाशीचा स्तंभ आणि दोराची पुन्हा तपासणी केली जाते.
फाशीचा दोरावर वाळूचं पोत लटकवलं जातं, ज्याचं वजन कैद्याच्या वजनापेक्षा दीडपट जास्त असतं.
फाशी नेहमीच पहाटे म्हणजेच सुर्योदयपूर्वी दिली जाते. कोणता महिना आणि कोणता ऋतू आहे त्यावर फाशीची वेळ ठरते.
फाशी ही नेहमी सूर्योदयापूर्वीच दिली जाते. याचे मुख्य कारण असे की, त्यामुळे तुरुंगाच्या दैनंदिन कामकाजावर कोणताही परिणाम होत नाही. शिवाय त्या विशिष्ट काळात तुरुंगातील कोणत्याही कैद्याला आपली कोठडी सोडून कोठेही जाण्या-येण्याची परवानगी नसते.
आजपर्यंत देशात फाशी देणारे दोनच जल्लाद आहेत. त्यांना दरमहा ठरावीक मानधन दिले जाते व प्रत्येक फाशीच्या वेळी काही विशिष्ट भत्तादेखील दिला जातो.
त्यानंतर फाशी देण्यापूर्वी जिल्ह्यात गुन्हेगाराकडे जातो आणि त्याच्या कानात म्हणतो मला माफ कर.
मी सरकारी कर्मचारी आहे मला कायद्याचे पालन करण्यासाठी हे करावे लागत आहे.
यानंतर जिल्हा गुन्हेगार जर हिंदू असेल तर त्याला राम राम आणि गुन्हेगार जर मुस्लिम असेल तर त्याला शेवटचा सलाम करतो.
त्याचे हात मागे बांधले जातात. जर त्यांच्या पायात बेड्या असतील तर त्या काढल्या जातात. आणि मग कैद्याला फाशीच्या स्तंभापर्यंत नेलं जातं. तेव्हा तुरुंगाचे उपाधीक्षक, मुख्य वार्डन आणि 6 वॉर्डन कैद्यासोबत असतात.
दोन वॉर्डन पुढे चालत असतात, दोन मागे आणि दोन्ही बाजूने कैद्याचे दंड पकडून दोन वॉर्डन चालत असतात. फाशीच्या ठिकाणी तुरुंगाचे अधीक्षक, मॅजिस्ट्रेट आणि मेडिकल ऑफिसर उपस्थित असतात.
कैद्याला मग फाशी देणाऱ्या जल्लादाच्या हाती सोपवलं जातं. आता कैद्याला फाशीच्या स्तंभावर चढावं लागतं. त्याला फाशीच्या दोराखाली उभं केलं जातं. तोपर्यंत वॉर्डननी त्याचे हात पकडून ठेवलेले असतात.
यानंतर त्यांचे पाय घट्ट बांधले जातात. आणि त्याच्या चेहरा कापडाने झाकला जातो. आणि मग कैद्याच्या मानेभोवती फाशीचा दोर आवळला जातो. कैद्याला धरून ठेवणारे वॉर्डन मागे होतात. मग तुरुंगाधिक्षकांनी इशारा केल्याबरोबर फाशी देणार जल्लाद खटका ओढतो.
यामुळे कैदी ज्या लाकडी फळकुटांवर उभा असतो ते खाली पडतात आणि कैद्याचे पाय लटकू लागतात. कैद्याच्या मानेला फास बसतो आणि हळूहळू त्याचा मृत्यू होतो.
मृतदेह अर्धा तास लटकवत ठेवला जातो. अर्धा तासाने डॉक्टर त्याला मृत घोषित करतात. आणि मग मृतदेह खाली उतरवला जातो आणि पोस्ट मॉर्टमला पाठवलं जातं.
पोस्टमॉर्टम नंतर कैद्याचा मृतदेह त्याचा कुटुंबियांना सोपवला जातो. जर सुरक्षितेचं काही कारण असेल तर तुरुंग अधिक्षकांच्या देखरेखीखाली मृतदेहाला जाळलं अथवा पुरलं जातं. फाशी पब्लिक हॉलिडे, म्हणजे सरकारी सुट्टीच्या दिवशी होत नाही.