फुले चित्रपट वादात का सापडला?

थोड्या दिवसांपूर्वी छावा हा चित्रपट रिलीज झाला होता ज्यावेळी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला त्यावेळी देखील त्यातील काही गोष्टी बदलण्यास भाग पाडल्या. तसेच आता फुले या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. परंतु या चित्रपटाचा ट्रेलर पाहून या चित्रपटांमध्ये देखील काही बदल करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. फुले हा चित्रपट महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्त 11 एप्रिल 2025 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. परंतु चित्रपटाचा ट्रेलर पाहूनच हा चित्रपट वादाच्या भवऱ्यात सापडला आहे .

त्यामुळे आता हा चित्रपट आता आणखी थोड्या दिवसांनी रिलीज करणार आहे.
चला तर पाहूया फुले हा चित्रपट नक्की वादात का सापडला आहे?
अगोदर सेन्सर बोर्ड ने यु हे सर्टिफिकेट दिले असताना आता पुन्हा त्याच्यामध्ये बदल का करायला सांगितले आहेत?
या चित्रपटातील दृश्यांवरती नक्की विरोध कोण करत आहे?
या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत
मुद्दा क्रमांक १) फुले हा चित्रपट कोणी दिग्दर्शित केला आहे आणि यामध्ये प्रमुख भूमिकेत कोण आहे?
राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत महादेवन यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 11 एप्रिल 2025 ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. ‘फुले’ या चित्रपटात अभिनेता प्रतिक गांधी आणि अभिनेत्री पत्रलेखा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
महात्मा जोतिबा फुले यांच्या आयुष्यावर आधारित ‘फुले’ हा चरित्रात्मक हिंदी चित्रपट सध्या एका सांस्कृतिक आणि राजकीय वादळाच्या केंद्रस्थानी सापडला आहे.
पण राज्यातल्या ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतल्यानंतर चित्रपटाचं प्रदर्शन दोन आठवड्यांनी पुढे ढकललं आहे, असं सांगण्यात आलंय. नव्या तारखेनुसार चित्रपट 25 एप्रिलला प्रदर्शित होईल.
मुद्दा क्रमांक २) फुले या चित्रपटातील दृश्यांवरती विरोध नक्की कोण करत आहे?
ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांच्या नेतृत्वाखाली या संघटनांनी चित्रपटावर जातीयतेला खतपाणी घालण्याचा आणि ब्राह्मण समाजाचं कलंकित चित्रण केल्याचा आरोप ब्राह्मण संघटनांनी केला.
सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर लगेच दवे यांनी चित्रपटावर टीका करताना असा दावा केला की महात्मा फुलेंच्या समाजसुधारणांमध्ये योगदान देणाऱ्या ब्राह्मणांचा उल्लेख या चित्रपटात दुर्लक्षित केला गेला आहे.
त्यात सेन्सॉर बोर्डानेही उडी घेत चित्रपटातल्या काही दृश्यांना कात्री लावायला सांगितली आहे.
मुद्दा क्रमांक ३) फुले या चित्रपटात आक्षेप नक्की कशावर घेण्यात आला आहे?
फुलेंना ब्राह्मणांनी काही प्रमाणात विरोध केलाच, पण काही प्रमाणात समर्थनही केलं. चांगली कामंही केली. शाळा दिली, देणगी दिली, शिक्षक दिले, विद्यार्थी दिले. ते तुम्ही दाखवलं आहे की, नाही हा आमचा अनंत महादेवन यांना प्रश्न होता,” असंही असे दवे यांनी म्हटले आहे.
तसेच आमचा एकमेकांत संवाद झाला आहे. चित्रपट एकांगी होणार नाही, याची काळजी घेऊ, असं त्यांनी कळवलं आहे. त्यासाठी बदल करायचे असतील तर ते करू, त्यासाठी आम्हाला 15 दिवस लागतील, असं दिग्दर्शक महादेवन यांनी सांगितलं हे दवे यांनी स्पष्ट केलं आहे.
तर त्याच अनुषंगाने, पत्रकार परिषदेत दिग्दर्शकांनी चित्रपट दोन आठवडे पुढे ढकलल्याचं अधिकृतरीत्या घोषित केलं. “आता ते बदल करतील आणि त्या बदलांचं आम्ही स्वागत करतो,” असं दवे म्हणाले.
चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेण्यात आल्यानंतर चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.
कोणती दृश्य आक्षेपार्ह वाटतात असं विचारलं असता दवे यांनी ट्रेलरमध्ये एक ब्राह्मण मुलगा सावित्रीबाईंवर चिखल फेकताना दाखवण्यात आले आहे त्याचा संदर्भ दिला.
त्यावर भाष्य करताना दवे म्हणाले, असं काही निगेटिव्ह घडलं असेल, तर ते दाखवण्याची गरज नाही, असं माझं मत आहे. पण तो त्यांचा अधिकार आहे आणि त्याशिवाय चित्रपट पूर्ण होणार नाही, हेही आम्ही मान्य करतो.
पण त्याच ट्रेलरमध्ये शाळा घेताना एखादा ब्राह्मण त्यांना मदत करतोय असं जर एखादं दृश्य असतं, तर ते चाललं असतं,
पण ते न दाखवणं हे जातीय द्वेषाकडे घेऊन जातं, असं मला वाटतं. तेच पटलं आहे, असं दिसतंय,” असंही दवे यांनी शेवटी स्पष्ट केलं.
त्यातला काही भाग काढायची गरज नाही. पण जे चांगलं आहे, ते तुम्ही दाखवलं आहे की नाही हा आमचा प्रश्न आहे,” असं ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले.
मुद्दा क्रमांक ४) महात्मा फुले यांचे नातू प्रशांत फुले यांनी कोणता आक्षेप घेतला आहे?
राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत महादेवन यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 11 एप्रिल 2025 ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता.
परंतु चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये फुलेंना मारहाण झाल्याचंही एक दृश्य दाखवण्यात आलं आहे. त्यावरही महात्मा फुले यांचे नातू, प्रशांत फुले यांनी आक्षेप घेतला आहे.
फुले पैलवान होते. ते आखाड्यात जायचे. दांडपट्ट्याची कला त्यांना अवगत होती. असं असूनही त्यांना मारहाण झाली हे कसं दाखवलं जाऊ शकतं?
महात्मा फुलेंना कुणी मारलं अशी कोणतीही नोंद इतिहासात सापडत नाही. त्यांना मारायला आलेल्या दोन मारेकऱ्यांचं परिवर्तन फुलेंनी केलं होतं. त्यानंतर ते दोन्ही मारेकरी त्यांचे अंगरक्षक झाले होते. बाकी सिनेमाबद्दल त्यांचा काही आक्षेप नाही, असंही त्यांनी नमूद केलं.
त्याचबरोबर, सिनेमातल्या अशा न पटलेल्या गोष्टींबद्दल फक्त चर्चा केली गेली. त्यावर बंदी घाला असं सांगितलं गेलं नव्हतं. मात्र, माध्यमांनी अर्धवट माहिती दिल्यामुळे विनाकारण वादाला तोंड फुटलं, असं प्रशांत फुले म्हणाले.
मुद्दा क्रमांक ५) सेन्सॉर बोर्डाने कोणते बदल करायला सांगितले ?
चित्रपटाला सुरुवातीला केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाने (सीबीएफसी) ‘यू’ प्रमाणपत्र दिलं होतं. पण वाद सुरू झाल्यानंतर बोर्डाने चित्रपटातल्या अनेक दृश्य आणि संवादात बदल सुचवले.
मंडळाने विशेषतः जातिव्यवस्थेवर असलेल्या व्हाईसओव्हरचा भाग हटवण्याचे आदेश दिलेत. त्याचबरोबर पेशवाईला राजेशाही म्हटलं गेलंय आणि ‘महार’, ‘मांग’, ‘मनूची जातिव्यवस्था’ अशा उल्लेखांमध्येही फेरफार करण्यात आलाय.
काही संवादांमध्येही बदल करण्यात आलेत. उदाहरणार्थ, “जहाँ क्षुद्रों को… झाडू बाँधकर चलना चाहिए” हा संवाद “क्या यही हमारी… सबसे दूरी बनाके रखनी चाहिए” असा बदलण्यात आला.
तर “3000 साल पुरानी… गुलामी” या वाक्याला “कई साल पुरानी हैं” असं बदलण्यात आलंय.
काही ठिकाणी ‘जात’ या शब्दाऐवजी ‘वर्ण’ असा शब्द उपशीर्षकात बदलण्यात आला.
तर हे सर्व बदल चित्रपटाच्या मूळ आशयावर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर परिणाम करणारे ठरतात, असं मत तज्ज्ञ मांडत आहेत.
मुद्दा क्रमांक ६) महात्मा ज्योतिराव फुले समता प्रतिष्ठानचे सरचिटणीस नितीन पवार यांनी काय म्हटले आहे?
राज्य कुणाचं आहे?
सरसकट सगळ्या ब्राह्मणांना दोष देण्याचं कारण नाही, असं माझही म्हणणं होतं. फुलेंच्या कामात त्यांच्या अनेक ब्राह्मण सहकाऱ्यांनी मदत केली.
मात्र, फुलेंच्या कामाचा फायदाही ब्राह्मण समाजालाच झाला.
बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिला असेल, तर फुलेंनी शिक्षणाचा अधिकार स्त्रियांना मिळवून दिला. “कोणत्याही सामाजिक बदलाचा पहिला फायदा हा वर्चस्वशाली समाजालाच होतो.
पण जेव्हा इतिहासाचं खरं रूप दाखवलं जातं, तेव्हा भावना का दुखावल्या जातात असा प्रश्न त्यांना पडतो.
त्यावेळेला जे होतं ते तसंच असेल आणि ते तसंच दाखवलं तर भावना दुखवायचं काहीही कारण नाही,” असंही नितीन पवार नमूद केले आहे.
एका बाजूला औरंगजेबाचा कोथळा वगैरे म्हटलेलं चालतं. त्याची खुलेआम पोस्टर्स लावलेली जातात. तेव्हा आपण काही म्हणत नाही. कबर खणण्याबद्दल पण आपण बोलतो.
समाजात काही विशिष्ट ऐतिहासिक व्यक्ती किंवा समुदायांविरोधात तीव्र आणि हिंसक भाषा वापरली जाते, त्यावर सेन्सॉर मंडळ, समाज, प्रसारमाध्यमांकडून फारसा विरोध होत नाही.
एखाद्या विचारधारेविरोधात इतका संताप व्यक्त केला जातो की मरणोत्तरही व्यक्तीचं अस्तित्वही मिटवण्याचा प्रयत्न आपण करतो.
पण या पार्श्वभूमीवर जेव्हा फुलेंवर चित्रपट येतो, जो शोषितांच्या बाजूने बोलतो, ज्यात जातिव्यवस्थेवर भाष्य आहे; तेव्हा मात्र त्यातले शब्द, दृश्यं, संदर्भ बदलण्याची मागणी होते,” असं पवार यांनी म्हटले आहे.
फुल्यांचा चित्रपट जेव्हा येतो आणि तेव्हा त्यात बदल करायला सांगितलं जातं, तेव्हा हा प्रश्न पडतो की राज्य कुणाचं आहे?” पवार प्रश्न उपस्थित करतात.
‘फुल्यांना ब्राह्मणांनी त्रास दिला होता हे खरंच आहे’
जोतीरावांच्या मृत्युलेखात सुबोधपत्रिका या वृत्तपत्रानं 1890 मध्ये नोंदवलं आहे की सावित्रीबाईंना लोक खडे आणि दगड मारत होते. पुढे ब्राम्हण इथवरच थांबले नाहीत तर त्यांनी अजून काय त्रास दिला त्याचंही वर्णन आहे.
तर मंडळी कोणताही ऐतिहासिक चित्रपट आला की त्यावरती कोणत्या ना कोणत्या कारणावरून बदल करण्यात यावे असे सांगण्यात येते.
असंच फुले या चित्रपटाबाबतही घडले आहे.
आता 11 एप्रिल रोजी प्रदर्शित होणारा फुले हा चित्रपट 25 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.
तर मंडळी अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता चॅनलला सबस्क्राईब करा.

By satta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *