बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये नक्की वाद काय आहे?
पुणे – नाशिक सेमी हायस्पीड रेल्वचा मार्ग बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर संगमनेर (जि. अहिल्यानगर) चे युवा नेते आमदार सत्यजित तांबे यांनी पुढाकार घेत सर्वपक्षिय नेत्यांची मोट बांधून, जुन्याच सर्वेक्षणानुसार सरळ चाकण, मंचर, नारायणगांव मार्गे रेल्वे होण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.
परंतु या प्रकल्पाला नगर जिल्ह्यातील माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि सध्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील राजकीय वाद हा आडवा आला आहे.
त्यामुळे आता बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये आता रेल्वेच्या मार्गावरून नक्की वाद काय आहे?
तसेच पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेचा इतिहास नक्की काय आहे? हा रेल्वे मार्ग अजूनही का पूर्णत्वास गेला नाही यामागे इनसाइड स्टोरी आपण पाहणार आहोत.
मुद्दा क्रमांक १) पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे चा इतिहास नक्की काय आहे?
सन 2004 मध्ये शिवाजीराव आढळराव पाटील हे खासदार झाल्यानंतर यांनी पहिल्यांदा पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेची संकल्पना पुढे आणली असं शिवाजीराव आढळराव पाटील सांगत आहे.
2004 मध्ये आढळराव पाटील यांनी हा मुद्दा संसदेत मांडला. त्यावेळी चे तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. हा रेल्वे प्रोजेक्ट पिंक बुक मध्ये देखील आला होता. परंतु काही तांत्रिक कारणामुळे हा प्रकल्प रखडत गेला.
तर हा प्रकल्प रखडण्याचं मोठे कारण ते म्हणजे जुन्नर तालुक्यातील खोडद येथे असलेल्या जीएमआरटी (GMRT) या दुर्बिण संशोधन प्रकल्प आहे.
कारण हा जी एम आर टी प्रकल्प रेल्वेच्या मार्गावर येत आहे.
त्यामुळे हा प्रकल्प हटवणे अवघड आहे.
त्यामुळे आता पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेसाठी नवीन मार्गाचा वापर करावा असं तत्कालीन रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी पुणे येथे म्हटल आहे.
परंतु या नवीन मार्गाला आता तेथील शेतकऱ्यांचा आणि राजकारणांचा विरोध आहे.
कारण ज्यावेळेस पहिल्यांदा हा प्रकल्प चालू झाला होता त्याच वेळेस 300 हेक्टर जागा ही या प्रकल्पासाठी अधिग्रहण करण्यात आली होती.
मुद्दा क्रमांक २) जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात वाद नक्की काय आहे?
राजकीय सत्तेचा संघर्ष किती टोकाला जाऊ शकतो, याची अनेक उदाहरणे आहेत. सध्याचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वादाचे असेच उदाहरण देता येऊ शकते.
मंत्र राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय वाद सगळ्यांनाच माहिती आहे.
नाशिक-पुणे हाय स्पीड रेल्वे प्रकल्प मंजूर झाला आहे. त्यासाठी 30 टक्के जमिनीचे संपादन देखील झाले आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे भूमिपूजन आणि कामाला सुरुवात केव्हा होते, याची सगळ्यांना उत्सुकता आहे.
मात्र सध्या तरी ही उत्सुकता राजकीय वाद विवादामुळे शमण्याची चिन्हे आहेत.
हा रेल्वे मार्ग मूळ नाशिक-संगमनेर-चाकण-पुणे असा आहे. त्यासाठी विविध लोकप्रतिनिधींनी संघर्ष केला, सरकार दरबारी पाठपुरावा केला आहे. त्यानंतर या प्रकल्पाला मंजूरी मिळाली.
तर या प्रकल्पात काही सुधारणा म्हणून शिर्डी आणि अहिल्यानगरचा समावेश करण्यात येईल, असे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी कुमार यांनी नुकतेच सांगितले.
त्यामुळे या प्रकल्पाला राजकीय अडथळा निर्माण केला जात आहे. नाशिक- पुणे रेल्वे मार्गात संगमनेर हे अपरिहार्यपणे येते.
परंतु शिर्डी आणि अहिल्यानगर हे जाणून-बुजून या रेल्वे प्रकल्पामध्ये आणले जात आहे असं बाळासाहेब थोरात यांचे म्हणणं आहे.
कारण शिर्डी बाजूला राहते. शिर्डीमार्गे हा प्रकल्प गेल्यास रेल्वे मार्गाचे अंतर वाढणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प लांबण्याची चिन्हे आहेत.
आता याच वादाचा फटका एका महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पाला बसणार असे दिसते.
तसेच दोन्ही बाजूंकडून राजकीय श्रेयवादासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली जात आहे.
त्यासाठी असलेली सर्व राजकीय ताकद वापरून सरकारवर दबाव निर्माण झाला आहे.
राजकीय वादातून हे घडल्याचे लपून राहिलेले नाही. त्याचा फटका जनतेला बसण्याची चिन्हे आहेत.
यासंदर्भात आमदार सत्यजित तांबे यांनी नुकतेच या प्रकल्पाशी संबंधित लोक प्रतिनिधींना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, संगमनेरचे आमदार अमोल खताळ, खासदार राजाभाऊ वाजे आदींसह सात लोकप्रतिनिधी एकत्र आले होते.
या सर्व लोक प्रतिनिधींनी आता प्रकल्प व्हावा म्हणून आपली ताकद पणाला लावण्याचा निर्णय घेतला आहे.
तो कितपत यशस्वी होईल हे अद्याप स्पष्ट नाही.
अहिल्याननगर जिल्ह्यातील अंतर्गत राजकारणामुळे आणि थोरात आणि विखे यांच्यातील पारंपारिक राजकीय संघर्षातून हा मार्ग रोखण्यासाठी अप्रत्यक्ष प्रयत्न केले जात आहेत .असे दिसत आहे.
त्यामुळे नाशिक पुणे रेल्वे मार्ग तब्बल 20 वर्ष लेट झाला आहे. तो कधी पूर्ण होणार हे देखील अनिश्चित आहे. राजकीय सत्ता स्पर्धेचा मोठा अडथळा या मार्गाला निर्माण झाला आहे.
मुद्दा क्रमांक 3 ) पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे याच्या नवीन मार्गाला विरोध का आहे?
बाळासाहेब थोरात यांचा विरोध आहे कारण की ही रेल्वे जर अहिल्यानगर आणि शिर्डी इथून गेली तर यामध्ये संगमनेर हे येत नाही.
जुन्या मार्गासाठी सिन्नर, संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात भूसंपादन करण्यात आले आहे. हा प्रकल्प उद्याोग, तसेच शेतकरी, नोकरदारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
या भागातून रेल्वे प्रकल्प गेल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. पुणे-नाशिक या दोन्ही शहरांच्या मध्यवर्ती भागांना बाजारपेठांत मालाची ने-आण करण्यासाठी याचा फायदा होणार आहे.. शेतमाल वाहतूक आणि औद्योगिकदृष्ट्याही याचा फायदा होणार आहे.
त्यामुळे संगमनेर करांचा नवीन मार्गाला विरोध आहे.
तसेच या प्रकल्पामुळे खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील शेती, औद्योगिक, व्यावसायिक धोरणांना मोठी चालना मिळणार आहे. जीएमआरटी प्रकल्पाबाबत तांत्रिक अडचणी असल्या, तरी त्यावर पर्यायी मार्ग असून, थेट मार्ग वळवणे धोक्याचे आहे. कारण, अनेक ठिकाणी भूसंपादन करण्यात आले आहे. ‘
तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे खासदार अमोल कोल्हे, अपक्ष आमदार सत्यजित तांबे, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी नवीन मार्गाला विरोध दर्शविला आहे, तर सत्ताधारी महायुतीतील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनीदेखील जुन्या मार्गावरूनच रेल्वे जावी, अशी भूमिका घेतली आहे.
तर मंडळी तुम्हाला काय वाटते पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे ही नवीन मार्गाने जाणे चांगले राहील की जुन्या मार्गाने जाणे चांगले राहील हे आम्हाला कमेंट्स करून सांगा