महापालिका निवडणुकांआधी मविआत फूट? उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची कारणे काय? आणि आता ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत स्वबळावर लढणे कितपत शक्य?
राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले परंतु राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या यामध्ये महाविकास आघाडीचा दणकून पराभव झाला. त्यामुळे झालेला पराभव हा महाविकास आघाडीच्या चांगला जिव्हारी लागला. आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी गाफील न राहता काही ना काही ठोस पावले उचलले पाहिजे असा विचार महाविकास आघाडीमध्ये प्रत्येक जण करू लागला आहे. असाच काहीसा विचार ठाकरे गटाच्या शिवसेनेने केला आहे आणि त्यांनी मुंबई ते नागपूर स्वबळावर लढणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितला आहे.
चला तर पाहूया नक्की उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची कारणे काय होते? आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये शिवसेनेला मुंबईत स्वबळावर लढणे कितपत शक्य आहे?
मुंबईपासून नागपूरपर्यंतच्या महानगरपालिका निवडणुका आम्ही स्वबळावर लढू. एकदाच काय व्हायचे ते होऊ द्या, आम्हाला स्व:ताला आजमावयचे आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्हाला यासाठी परवानगी दिली आहे, असे विधान राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी नागपूरमध्ये केले.
कारण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अवघ्या ४६ जागा निवडून आल्या. यामध्ये शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गटाच्या २० जागा, काँग्रेसच्या १६ जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या १० जागांचा समावेश आहे. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरे गटातील कार्यकर्ते विचारत आहेत की महाविकास आघाडीचा आपल्याला फायदा काय झाला? विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर, पक्षाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीशी संबंध तोडण्याचा आणि स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा विचार करावा, असे सांगितले होते. विधानसभेच्या निकालानंतर दोन दिवसांनी झालेल्या पक्षाच्या बैठकीत, बहुसंख्य आमदारांनी ठाकरे यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची विनंती केली होती. यामुळे कार्यकर्त्यांच्या वाढत्या दबावाखाली उद्धव ठाकरे शिवसेना गट यांनी शनिवारी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचे जाहीर केले.
तर आमदार आणि नेत्यांनी असा युक्तिवाद होता की, महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यास तळातील कार्यकर्त्यांशी पुन्हा संपर्क निर्माण करण्यास आणि त्यांना शिंदे सेनेकडे जाण्यापासून रोखण्यास मदत होईल.
तसेच १९७० पासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. या महत्त्वाच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षापासून वेगळे झाल्यास भाजपा आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला रोखण्यास मदत होईल असे, या आमदार आणि नेत्यांना वाटते.तर संजय राऊत यांनी फक्त मुंबई ते नागपूर पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा नारा दिला आहे त्यामुळे ते पूर्णतः महाविकास आघाडी पासून वेगळे होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. कारण संजय राऊत म्हणाले लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळाली नाही त्यामुळे पक्षाची वाढ खुंटली. आता आम्हाला आमचा पक्ष भक्कम करण्यासाठी आम्ही आता महानगरपालिका जिल्हा परिषदा आणि परिषदांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच उद्धव ठाकरे शिवसेना पक्षातील नेत्यांच्या असं मत आहे की जोपर्यंत आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवत नाही तोपर्यंत आम्हाला आमची ताकद पूर्णपणे समजणार नाही. तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आम्हाला महाविकास आघाडीची गरज होती परंतु यामुळे बऱ्याच जागा आम्हाला यामुळे निवडता आला नाही त्यामुळे तेथील कार्यकर्ते तिकीट न भेटल्यामुळे नाराज झाले आहेत. त्यामुळे आता त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ती संधी द्यायची आहे.
तर दक्षिण मुंबईचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत म्हणाले आपण विधानसभा स्वतंत्रपणे लढलो असतो तर वीस पेक्षा जास्त जागा मिळाल्या असत्या.
तर लोकसभेच्या तुलनेत त्यांची विधानसभेला सात टक्के मते घटली. तर आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये शिवसेनेचा साराभर हा मुंबई वरच राहील. कारण पुणे नागपूर या ठिकाणी त्यांची फारशी ताकद नाही.
तर ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व आहे. तर या भागात ठाण्यासह उल्हासनगर कल्याण डोंबिवली या महत्त्वाच्या महापालिका आहेत. मुंबई येथे मागील तीन दशके शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे. तसेच मुंबईतील राजकारणाचा प्रभाव कोकणावरही पडतो. तर यावेळी विधानसभा निवडणुकीमध्ये कोकणात म्हणजेच रत्नागिरी सिंधुदुर्ग वर रायगड या तीन जिल्ह्यात फक्त भास्कर जाधव यांच्या रूपात एकमेव जागा शिवसेना पक्षाला जिंकता आली आहे. तर लोकसभा आणि विधानसभेत तीन पक्षातील आघाडीमुळे ठराविक कार्यकर्त्यांना संधी मिळाली. परंतु जे पहिल्या फळीतील कार्यकर्ते आहेत किंवा पक्षाचा वर्षानुवर्ष रस्त्यावर उतरून काम करणार आहे अशांना संधी मिळाली नाही. त्यामुळे भरपूर कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही त्यामुळे कार्यकर्ते नाराज होतात आणि त्याचा परिणाम पक्ष विस्तारावरती होतो. त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना संधी मिळेल तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे तेथील असणाऱ्या बहुतांशी समस्यांवरती होतात त्यामुळे या समस्या कार्यकर्त्यांना बऱ्यापैकी माहीत असतात. त्यामुळे याचा देखील फायदा होईल.
मुंबईमध्ये पन्नास ते साठ हजार मतदारांचा एक प्रभाग आहे तर राज्यातील इतर महापालिकांमध्ये तीन ते चार वॉर्डाचा एक प्रभाग आहे. तेथेही जवळपास आठ ते दहा हजार मते एका ठिकाणी येतात. त्यामुळे आता विजय मिळवण्यासाठी पक्ष संघटना भक्कम असली पाहिजे. त्यामुळे तेथील प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचता येईल. तसेच महापालिकेत सरासरी 60 ते 65 टक्के मतदान होत असल्याचा अनुभव आहे. मुंबईचा विचार केला तर काँग्रेसचा पारंपारिक मतदार सर्वत्र आहे ठाकरे गट स्वबळावर गेल्यास त्यांना काँग्रेस प्रभागातील मते भेटणार नाही. तर बरेच कार्यकर्ते आता महायुती निवडून आल्यामुळे महापालिका निवडणुकांसाठी भाजप किंवा शिंदे शिवसेना पक्षाकडून तिकीट भेटेल का याच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे आता शिवसेनेला स्वबळावर लढल्यास किती जागा निवडून येतील हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे का हे समजणार आहे. तर मंडळी तुम्हाला काय वाटते महाविकास आघाडीतील पक्षांनी स्वबळावर लढले पाहिजे की एकत्रित लढले पाहिजे हे आम्हाला कमेंट्स करून सांगा