महाराष्ट्र मध्ये राज्य परिवहन विभागाने कार,  दुचाकी, ट्रॅक्टर, तीन चाकी वाहन, चार चाकी वाहनांसाठी नवीन एच एस आर पी म्हणजेच हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बनवायला सांगितली आहे.
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बनवण्याची 31 मार्च ही महाराष्ट्र मध्ये शेवटची तारीख असणार आहे.
31 मार्चपर्यंत महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बनवण्यासाठी वेळ दिला आहे.
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट इतर राज्यांमध्ये कंपल्सरी केलेली आहे.
परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही कंपल्सरी नव्हती.
परंतु आता महाराष्ट्र सरकारने ही प्लेट 31 मार्चपर्यंत सर्व वाहनांना बसवली पाहिजे असा नियम काढला आहे.
चला तर पाहूया हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजे नक्की काय आहे आणि ती बसवणे का गरजेचे आहे.
हाय-सिक्योरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) ही एक व्हीकल लायसेन्स प्लेट आहे. जी छेडछाड-प्रतिरोधक आणि डुप्लिकेट करणे कठीण आहे. HSRP प्लेट्समध्ये एक यूनिक आयडेंटिफिकेशन नंबर, होलोग्राम आणि रजिस्ट्रेशन नंबर असतो. ही नंबर प्लेट ॲल्युमिनियमसारख्या टिकाऊ मटेरियलपासून बनलेली आहे आणि त्यावर हॉट-स्टॅम्प केलेला अल्फा-न्यूमेरिक कोड आहे.
सुरक्षेसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवर एक युनिक लेझर कोडही छापला जातो. प्रत्येक वाहनासाठी स्वतंत्र कोड दिलेला आहे. तो सहज काढता येत नाही.
HSRP प्लेटची वैशिष्ट्य काय आहे ते पाहू
हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, ती एकदा तुटली की पुन्हा जोडता येत नाही. यासोबतच ही प्लेट अगदी वेगळ्या पद्धतीने बनवली जाते. जेणेकरून कोणीही त्याची कॉपी करून बनावट प्लेट बनवू शकत नाही. त्यामुळे वाहनाची सुरक्षा वाढते. त्याची चोरी व गैरवापर करता येत नाही. एखाद्या वाहनाला अपघात झाला तर गाडीला लावलेली हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वाहनाच्या मालकासह सर्व माहिती देते. याच्या मदतीने जखमींच्या नातेवाईकांना माहिती पोहोचवता येते.
केंद्रीय मोटार वाहन कायदा १९८९ च्या नियम ५० नुसार, वाहनावर HSRP लावणे सक्तीचे आहे. या कायद्यांतर्गत एकूण ६ प्रकारच्या वाहनांवर HSRP लावणे बंधनकारक आहे.
१ ) नॉन ट्रान्सपोर्ट वाहने
२ ) ट्रान्सपोर्ट वाहने
३ ) भाडेतत्त्वावर असलेली वाहतूक वाहने
४ ) बॅटरीवर चालणारी रेंट अ कॅब असलेली वाहने
५ ) बॅटरीवर चालणारी नॉन ट्रान्सपोर्ट वाहने
६ ) बॅटरीवर चालणारी ट्रान्सपोर्ट वाहने
नवीन वाहनांव्यतिरिक्त जुन्या वाहनांवरही ते बसवणे आवश्यक आहे.
चला तर पाहूया हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही कशी बसवता येईल आणि तिचा खर्च किती येणार आहे.
राज्य परिवहन विभागाने एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या जुन्या वाहनांमध्ये हाय सेक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी त्यांचे वेबसाईटच्या वेब पेजवर अपॉइंटमेंट सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांमध्ये हाय-सिक्योरिटी नंबर प्लेट (HSRP) लावण्यासाठी वाहन मालकांना 531 ते 879 रुपये मोजावे लागतील.
महाराष्ट्र परिवहन विभागाने ही माहिती दिली आहे. बुधवारपासून परिवहन विभागाची पेमेंट लिंक अॅक्टिव्ह झाली आहे. या किमतीत नंबर प्लेटच्या स्नॅप लॉकची किंमत आणि जीएसटी देखील समाविष्ट आहे. HSRP लागू करण्यासाठी ट्रॅक्टर, मोटरसायकल आणि स्कूटर यांसारख्या दुचाकींसाठी 531 रुपये, ऑटो-रिक्षासारख्या तीनचाकी वाहनांसाठी 590 रुपये आणि कार, बस, ट्रक, टँकर, टेम्पो आणि ट्रेलर यासारख्या मोठ्या वाहनांसाठी 879 रुपये खर्च होतील.
नवीन दर काय असतील?
महाराष्ट्र परिवहन विभागाने आपल्या वेबसाइटवर विविध प्रकारच्या वाहनांसाठी HSRP दर देखील नमूद केले आहेत. त्यावरही 18 टक्के दराने जीएसटी लावला जाईल. दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसाठी 200 मिमी बाय 100 मिमी आणि 285 मिमी बाय 45 मिमी आकाराच्या प्रत्येक एचएसआरपी प्लेटची किंमत 219.9 रुपये असेल. त्याच वेळी, चार किंवा अधिक चाकी वाहनांसाठी, 500 मिमी बाय 120 मिमी आणि 340 मिमी बाय 200 मिमी आकाराच्या प्लेटची किंमत 342.41 रुपये असेल.
GST वगळता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी स्नॅप लॉक आणि थर्ड रजिस्ट्रेशन मार्कची किंमत अनुक्रमे 10.18 आणि 50 रुपये असेल. HSRP लादण्यासाठी GST वाटा दुचाकी आणि ट्रॅक्टरसाठी 81 रुपये, तीनचाकी वाहनांसाठी 90 रुपये आणि चार किंवा अधिक चाकी वाहनांसाठी 134.10 रुपये असेल. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या जुन्या वाहनांनाही पुढील आणि मागील बाजूस HSRP लावले जाईल आणि त्यांच्या विंडशील्डवर नोंदणी चिन्हाचे स्टिकर लावले जाईल.
अशाच नावीन्यपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.

By satta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *