नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडले आहेत आणि आता वारे वाहू लागले आहे ते म्हणजे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांचे. महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये जागावाटपावरून तेढ निर्माण होतना दिसत आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना आपल्याला कोणती जागा भेटेल आपल्याला कोणती जागा पाहिजे या रेसमध्ये सर्वजण आले आहेत. आता असेच काहीसे वातावरण चालू आहे ते म्हणजे सातारा जिल्ह्यातील मान विधानसभा मतदारसंघ येथे. चला तर पाहुयात मान विधानसभा मतदारसंघांमध्ये लढत नेमकी कोणामध्ये होणार आहे.
आज आपण पाहणार आहोत सातारा जिल्ह्यातील मान या विधानसभा मतदार संघाबद्दल. दुष्काळी माण व खटाव तालुक्यांच्या निवडणुका आजवर पाणीप्रश्नांवर लढविल्या गेल्या व जिंकल्या. दुष्काळी जनतेला निवडणुकीत पाणीप्रश्न आपणच सोडविणार, अशी आश्वासने देऊन निवडणुकीत पाणी प्रश्नाचा मुद्दा उपस्थित करून जनतेला खोटी आश्वासने देऊन निवडणूक जिंकायची. निवडणुका झाल्या की पुढील निवडणुकांपर्यंत पाणीप्रश्नाचा मुद्दा आडगळीत टाकायचा हा आजवरचा इतिहास. प्रत्यक्षात निवडणुकीत दिलेला पाणीप्रश्न सोडविण्याचा शब्द विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांनी उरमोडी योजनेचे पाणी माणच्या अंगणी आणले. माण विधानसभा मतदारसंघ क्रमांक २५८ आहे. माण मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील माण तालुका आणि खटाव तालुक्यातील अधि, वडुज, कटार खटाव आणि मायणी ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो.
माण हा विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघात मोडतो. भारतीय जनता पक्षाचे जयकुमार भगवानराव गोरे हे माण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. सातारा जिल्ह्यातील माण खटाव विधानसभा मतदार संघ फेररचनेआधी 2009 पर्यंत संपूर्ण माण तालुका आणि फलटण तालुक्यातील 36 गावं असा हा माण विधानसभा मतदारसंघ होता. तर खटाव तालुक्यासाठी संपूर्ण खटाव विधानसभा मतदारसंघ होता. 2009 ला मतदार संघाची पुनर्रचना होऊन संपूर्ण माण तालुका आणि खटाव तालुक्याचा बहुतांश भाग असा मिळून नवीन माण खटाव विधानसभा मतदारसंघ तयार झाला. पूर्वीचा माण विधानसभा मतदारसंघ हा स्वातंत्र्यापासून 2009 पर्यंत कायम राखीव होता. त्यावेळी प्रभावती शिंदे, विष्णूपंत सोनवणे, धोंडिराम वाघमारे, तुकाराम तुपे, संपतराव अवघडे यांनी राखीव मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व केले. परंतु या सर्वांना राजकारणात आणून आमदार बनवण्यात सदाशिवराव पोळ यांचा महत्त्वाचा वाटा होता. सदाशिवराव पोळ यांची चाळीस वर्ष माण विधानसभा मतदारसंघावर जबरदस्त पकड होती. राजकारणात कोणत्याही ओळख नसणाऱ्या व्यक्तीला उभं करुन ते माण विधानसभा मतदारसंघात निवडून आणण्याची ताकत त्यांच्यात होती. त्यामुळे त्यांना या मतदारसंघात किंगमेकर म्हणून ओळखले जाते. तर पूर्वीचा खटाव विधानसभा मतदारसंघ हा खुला मतदारसंघ होता.
या मतदारसंघाचे 2004 पर्यंत सलग वीस वर्ष मराठा नसणाऱ्या काँग्रेसचे भाऊसाहेब गुदगे यांनी नेतृत्त्व केले. 2004 ते 2009 भाजपचे डॉ. दिलीप येळगावकर यांनी या मतदारसंघाचे नेतृत्त्व केले. पुनर्रचनेनंतर प्रथमच खुला झालेल्या माण खटाव विधानसभा मतदारसंघात किंगमेकर सदाशिवराव पोळ हे स्वत: मैदानात असताना अपक्ष असणारे जयकुमार गोरे हे पहिल्यांदा आमदार झाले आणि नंतरच्या काळात किंगमेकर म्हणून ओळख असलेल्या सदाशिव पोळ यांची पकड कमी होत गेली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे यांना आमदार होऊच द्यायचं नाही यासाठी सर्वच पक्षातील प्रतिस्पर्धींनी शड्डू ठोकला होता. त्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक झाली होती. त्यात भाजप, शिवसेना, रासप, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षातील दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्वांनी पक्षाच्या विरोधात भूमिका ठेवण्याचा निर्णय घेत, यातून एक उमेदवार उभा करुन तो निवडून आणायचा असा ठराव केला. परंतु या गोष्टीचा काही फायदा झाला नाही 2019 मध्ये जयकुमार गोरे हे आमदार म्हणून निवडून आले. 2019 मध्ये जयकुमार गोरे यांना आमदार होऊच द्यायचं नाही याचे कारणही तसेच मोठे आहे. चला तर पाहूया 2019 मध्ये नेमकं काय घडलं होतं?
आमदार जयकुमार गोरे यांनी पहिली निवडणूक लढवल्यानंतर त्यांची पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चांगलीच सलगी वाढली. जयकुमार गोरे काँग्रेस मध्ये गेले आणि काँग्रेसवासी झाल्यानंतर तुटपुंज्या कार्यकर्त्यांवर चालणारा काँग्रेस पक्ष वाढेल असे प्रत्येकाला वाटू लागले, मात्र तसेही झाले नाही. गेल्या पाच वर्षात म्हणावी अशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची फळी वाढताना कुठेच पाहायला मिळाली नाही. काँग्रेस वाढली नाही मात्र, काँग्रेसच्या दोन गटातील एका गटाबरोबर राहून दुसऱ्या गटावर आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळाले. काँग्रेसमधून गोरेंनी पहिली निवडणूक लढवताना त्यांच्या घरातच उभी फूट पडली. त्यांचे सख्खे भाऊ शेखर गोरे हे त्यांच्यासमोर त्यांचे विरोधक म्हणून ठाण मांडून उभे राहिले. त्यासाठी विरोधकांनी आपले हात धुऊन घेतले. घरातीलच दुफळीमुळे मतांची विभागणी होईल आणि आपण आमदार होऊ असं प्रत्येक विरोधातील पक्षाच्या उमेदवाराला वाटू लागले. आमदार जयकुमार गोरे आणि त्यांचे बंधू शेखर गोरे यांच्यात कायमच एकमेकांवर गुन्हे दाखल करण्याची साखळी उभी राहत गेली. शिवाय विरोधकांनीही तक्रारदारांच्या पाठिशी उभे राहत गुन्हे दाखल केले. यामुळे तडीपार, मोका या प्रक्रियेपर्यंत या दोन्ही भावंडांना जाण्याची वेळ आलीच तर त्याचबरोबर शेखर गोरे यांनाही काही दिवस तडीपारीच्या प्रक्रियेत रहावे लागले. या आणि इतर अशा अनेक कुरघोड्या एकमेकांवर सुरु असताना राष्ट्रवादीत असणाऱ्या शेखर गोरेंनी पक्षातील लोक कुरघोड्या करत असल्याच्या तक्रारी राष्ट्रवादीतील दिग्गजांना भेटून सांगितल्या. त्याचा काहीच परीणाम झाला नाही असं म्हणत शेखर गोरे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकण्यापूर्वी फलटण येथील शरद पवारांच्या कार्यक्रमात जाऊन स्टेजवरच गोंधळ घालण्याचाही प्रयत्न केला.
यावेळी त्यांनी चक्क शरद पवारांचा हात पकडल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. नंतर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा उघड प्रचार केला आणि उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत मनगटात शिवबंधन बांधले. दुसरीकडे मेगाभरती प्रक्रियेत काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनीही भाग घेत काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला. त्यामुळे मोजक्यांवर चाललेली काँग्रेसची फळी आणखीनच कमकुवत झाली. याच पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे राष्ट्रवादीच्या विरोधात उभे असलेले लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदार झाले आणि अंशात्मक असलेल्या भाजपच्या झेंडाला माण मतदारसंघातूनही चागंल्यापद्धतीने मतं मिळाली. या वादामध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांचं राजकारण कारणीभूत ठरलं असं राजकीय गोटातून सांगितले जाते.
आता पाहुयात मान विधानसभा मतदारसंघाचे भौगोलिक क्षेत्र कशी आहे?
या मतदार संघाचा भौगोलिक अभ्यास केला तर या ठिकाणी ग्रामस्थांच्या दहा एकर पासून ते शंभर एकर पर्यंत जमिनी आजही आहेत. काही ठराविक भाग सोडला तर सर्व जमिनी पाण्याची कमतरता असल्याने पडून आहेत आणि पाणी हाच विषय पुढे करत अनेक राजकारण्यांनी पदांची झालर आपल्या गळ्यात पाडून घेतली. मात्र, आज अखेर तुरळक पाण्याचे डोह तयार करण्यापलीकडे या मतदारसंघात कोणालाच पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवता आलेला नाही. पाणी परिषदांसारखी असंख्य आंदोलनं आजही पाहायला मिळतात. निवडणुकीच्या कालावधीत या भागात पाण्याच्या प्रश्नावरुन स्टेज गाजत असले तरी मुळात या भागात अनेक निवडणुका या जाती-पातीवरुन झालेल्या पाहायला मिळत आल्या आहेत आणि या जातीची गणितं आजही गावागावातील बैठकांमध्ये दिसून येतात. माणच्या या मतदारसंघात मराठा, माळी, धनगर या समाजाची लोकसंख्या जास्त आहे. या मतदारसंघात भाऊसाहेब गुदगे यांच्यानंतर 25 वर्ष मराठा आमदार लाभला नाही अशा आरोपाखाली कोपरा बैठकांमध्ये प्रचार करताना अनेक नेते मंडळी पाहायला मिळाली.
जयकुमार गोरे यांना पाडण्यासाठी दोन्ही टर्मला हा फॉर्म्युला वापरला गेला. त्यात धनगर समाजाचं नेतृत्त्व करणाऱ्या सत्तेतील महादेव जानकरांचीही पकड कमी पडल्याचे या निवडणुकांमध्ये दिसून आलं. आमदार जयकुमार गोरे हे माण मतदारसंघात पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवू शकले नाहीत, तसेच नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सातारा लोकसभा निवडणुकी मधून महायुतीचे उदयनराजे भोसले हे निवडून आले आहेत. त्यामुळे मान येथे आमदार जयकुमार गोरे यांचे पारडे जड दिसत आहे. त्यामुळे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मान येथे महायुतीकडून जयकुमार गोरे हे उमेदवार जवळपास फिक्स असतील तर महाविकास आघाडी कडून मान येथून नक्की कोणाला तिकीट भेटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण माने येथे महाविकास आघाडी कडून भरपूर उमेदवार इच्छुक असल्याच्या चर्चा आहेत. तर मंडळी माण येथे कोण आमदार व्हावा असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवा.