मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामध्ये 2100 रुपये भेटणार का?
नुकतेच अधिवेशन चालू झाले आहे. या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पावरती देखील चर्चा होत आहे.
तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेमध्ये महिलांना महायुती सरकार आल्यानंतर पंधराशे रुपयांचे 2100 रुपये देण्यात येतील असे विधानसभा निवडणुकीवेळी सांगण्यात आले होते.
आता विधानसभा निवडणुका पार पडून तीन महिने झाले.
परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये अजूनही महिलांना पंधराशे रुपये मिळत आहे.
यामुळे महिलांना 2100 रुपये कधी मिळणार यावरती विरोधी पक्षनेते शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब आणि काँग्रेस पक्षाचे आमदार सतीश पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांनी महायुती सरकारला प्रश्न विचारले.
या प्रश्नांवरती उत्तर देताना महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी काय उत्तरे दिले हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत.
महिलांना अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर पंधराशे रुपये ऐवजी 2100 रुपये भेटणार का?
तसेच महिलांना अजून कोणत्या निकषांना सामोरे जावे लागणार?
अनिल परब यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल आम्ही दरवर्षी बोलत असतो ही लक्षवेधी लाडका बहिणींची आहे. किती बहिणी अपात्र होणार आहेत किंवा निकष आधी का लावले गेले नाहीत असा प्रश्न विचारात सरकारला धारेवर धरलं.
तसेच या योजनेसाठी जी तरतूद गरजेचे होती, ती केली गेली का? पण आता महिलांना अपात्र करत आहात. नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजना दोन्हीचा लाभ काही महिला घेत आहेत. म्हणजे सरकारची फसवणूक केली जात आहे. यावर सरकार काय कारवाई करणार असा सवाल देखील परब यांनी उपस्थित केला.
सरकार कारवाई करणार का? ज्या अधिकाऱ्यांनी सरकारच्या पैशांचा अपव्यय केला आहे, ते दोन्ही लाभ देऊन त्यांच्यावर काय कारवाई करणार आहात? असा सवालही त्यांनी केला. अर्थसंकल्पावेळी लाडक्या बहिणांनी 2100 रुपये देऊ अशी घोषणा केली होती, ते 2100 रुपये कधी देणार असा सवालही परब यांनी उपस्थित केला होता.
त्यावरती अदिती तटकरे या काय म्हणाल्या याबद्दल सविस्तर पाहू
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीत किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण 2100 घोषित करु अशा पद्धतीचं वक्तव्य कुठंही केलं नाही असे अदिती तटकरे म्हणाल्या.
राज्य सरकार एखादी योजना जाहीर करत असतो. तर तो 100 टक्के देणार, पण जाहीरनामा हा पाच वर्षांचा असतो, या अर्थसंकल्पात 2100 रुपये अशा पद्धतीचं वक्तव्य कुठंही केलेले नाही. जाहीरनामा पाच वर्षांसाठी जाहीर केला जातो. योग्य पद्धतीनं त्यासंदर्भातील प्रस्ताव विभाग म्हणून शासन आणेल. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ ज्यावेळी सूचित करेल त्यावेळी तशा प्रकारचा प्रस्ताव विभाग तयार करेल असे आदिती तटकरे यांनी सांगितले .
लाडकी बहिण योजना ही महायुती सरकारची सर्वात महत्वाची योजना आहे असं अदिती तटकरे म्हणाल्या. आधीपासून टीका होत राहिली पण महिलांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
2 कोटी 63 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. तपासणीची प्रक्रिया ऑगस्टपासून आम्ही सुरुवात केली होती. संजय गांधी निराधार योजनेतील डेटा आम्हाला प्राप्त झाला, त्यात 1 लाख 97 हजार महिलांचा डेटा आला आहे. ही प्रक्रिया सुरु होती म्हणून तसे अर्ज झाले तसा डेटा प्राप्त होत गेला. सप्टेंबरमध्ये जेव्हा अर्ज भरले गेले तेव्हा 2 लाख 54 हजार निराधार योजनेचा डेटा आम्हाला मिळाला असल्याचे अदिती तटकरे म्हणाल्या. ऑक्टोबर डिसेंबरमध्ये आचारसंहिता होती म्हणून तपासणी प्रक्रिया बंद होती. डेटा आम्ही स्वतः परस्पर करत नाही. इतर विभागाकडून आम्हाला डेटा येतो असेही तटकरे म्हणाल्या. त्या त्या पद्धतीने कारवाई करत आम्ही गेलो.
लाडक्या बहिणीचा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात हप्ते काढले होते त्यावेळी देखील निकषात बदल केले नव्हते. स्थानिक पातळीवर आम्हाला जशा तक्रारी आल्या, तशी करवाई आम्ही करत गेलो असे तटकरे म्हणाल्या. RTO वरुन जो डेटा मिळाला तशी कारवाई केली गेली आहे. जुलैमध्ये 5 लाख महिला अशा होत्या ज्यांचं आधार कार्ड बँकेशी लिंक नव्हते. तेव्हा आपण आधी प्रक्रिया सुरु केली. त्यानंतर महिलांना खात्यात लाभ दिला गेला असेही तटकरे म्हणाल्या. 21 ते 65 वय असणाऱ्या महिलांसाठी ही योजना आहे. 65 नंतरच्या महिला बाद केल्या जातील असेही तटकरे म्हणाल्या.
तर मंडळी एकंदरीतच आदिती तटकरे यांच्या बोलण्यावरून तरी असंच वाटत आहे की महायुती सरकार लाडक्या बहिणींना 2100 रुपये न देता पंधराशे रुपये देणार आहेत.
यावरती जर विरोधकांनी तगादा लावून धरला तर लाडक्या बहिणींना महायुतीला 2100 रुपये हे महिन्याला द्यावाच लागतील.
तर मंडळी तुम्हाला काय वाटते महिलांना पंधराशे रुपये मिळाले पाहिजे 2100 रुपये मिळाले पाहिजे हे आम्हाला कमेंट करून कळवा.