मुद्रा लोन/कर्ज योजना 2025
आपल्याला जर व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी भांडवल लागते.
जर आपल्याकडे पुरेसे भांडवल नसेल तर सरकारकडून आपल्याला कर्ज भेटू शकते.
मुद्रा कर्ज योजनेमार्फत आपल्याला छोटा व्यवसाय करण्यासाठी सरकार कर्ज देते.
चला तर पाहूया मुद्रा कर्ज योजना नक्की काय आहे?
त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात आणि पात्रता काय आहे , तसेच आपल्याला किती व्याजदर भरावा लागेल याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत.
मुद्दा क्रमांक १) चला तर पाहूया मुद्रा कर्ज म्हणजे काय?
मुद्रा कर्ज ही एक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना आहे. या योजने अंतर्गत बिगर शेती आणि बिगर कार्पोरेट सुक्ष्म व लघु उद्योगांना कर्ज दिले जाते या संस्थांना (मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रीफायनान्स एजन्सी लिमिटेड) या योजनेअंतर्गत दहा लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते.
मुद्दा क्रमांक २) चला तर पाहूया मुद्रा कर्ज योजनेचे फायदे कोणते आहेत?
1. मुद्रा कर्ज योजना उत्पन्न निर्मितीमध्ये गुंतलेल्या सूक्ष्म आणि लघु उद्योगांना पत सुविधा प्रदान करते.
2. मुद्रा कर्जाचा एक मुख्य फायदा म्हणजे कर्जदारांना सुरक्षा किंवा दुय्यम सुविधा पुरवणे आवश्यक नसते. याव्यतिरिक्त, मुद्रा कर्जात कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
3. पीएमएमवाय अंतर्गत विस्तारित पत सुविधा कोणत्याही प्रकारच्या फंड किंवा बिगर-फंड आधारित आवश्यकतांसाठी असू शकतात.
4. कर्जदार मुद्रा कर्ज योजनेचा उपयोग विविध कारणांसाठी करू शकतात. मुद्रा कर्जाची पत मुदतीची कर्जे आणि ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी किंवा पत आणि पत हमीपत्रांसाठी अर्ज करण्यासाठी वापरली जाऊ शकते.
मुद्दा क्रमांक ३) चला तर पाहूया कर्जाच्या रकमेवर अवलंबून तीन प्रकारची मुद्रा कर्जे कोणती आहेत ?
शिशु – पीएमएमवाय योजने अंतर्गत ५०,०००/- रुपयांपर्यंतची कर्ज मंजूर होऊ शकते.योजनांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि अर्जदाराचा क्रेडिट इतिहास लक्षात घेऊन व्याजदर बँकेवर अवलंबून असेल. कर्ज परतफेडीचा कालावधी बँकेच्या पर्यायावर अवलंबून असतो
किशोर – पीएमएमवाय योजनेंतर्गत कर्ज ५० हजार ते ५ लाख रुपयांपर्यंत मंजूर होऊ शकते.
– पीएमएमवाय योजने अंतर्गत ५ लाख ते २० लाख रुपयांपर्यंत कर्ज मंजूर होऊ शकते.
एकूण 21 सार्वजनिक क्षेत्रातील बँका, 36 प्रादेशिक ग्रामीण बँका, 18 खाजगी क्षेत्रातील बँका, 35 नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC), 25 मायक्रो फायनान्स संस्था (MFI), 47 NBFC-MFI, 15 सहकारी बँका आणि 6 लघु वित्त बँका आहेत. हे कर्ज वाटप करण्यासाठी निवडले गेले आहे. योजनेतील 60 टक्के कर्ज ‘शिशू’ पर्यायाद्वारे आणि उर्वरित 40 टक्के कर्ज ‘किशोर’ आणि ‘तरुण’ योजनांद्वारे दिले जाईल.
मुद्दा क्रमांक ४) चला तर पाहूया पंतप्रधान मुद्रा कर्ज ची वैशिष्ट्ये
प्रक्रिया शुल्क किशोर आणि शिशु कर्जासाठी शुन्य तर तरुण कर्जाचा ०.५% रक्कम हे प्रक्रिया शुल्क वेगवेगळ्या बँकांनुसार आकारले जातात.
पंतप्रधान मुद्रा कर्जचा परतफेड कालावधी किती असेल?
जर तुम्ही पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कर्ज घेतले, तर कर्ज घेतल्यापासून तीन ते पाच वर्ष हा त्या कर्जाचा परतफेड कालावधी असेल.
मुद्दा क्रमांक ५) प्रधानमंत्री मुद्रा कर्ज लाभार्थी पात्रता काय आहे?
1. लघु उद्योग व्यवसाय मालक
2. फळ आणि भाजी विक्रेते
3. पशुधन दुग्ध उत्पादक
4. कुक्कुट पालन
5. मत्स्यपालन
6. विविध शेती विषयक उपक्रमांची संबंधित दुकानदार
7. कारागीर
8. ओरिएंटल बैंक ऑफ कॉमर्स
असे व्यवसायिक या योजनेसाठी पात्र असतील.
मुद्दा क्रमांक ६) चला तर पाहूया मुद्रा योजना अर्ज आवश्यक कागदपत्रे काय आहे?
ओळख पुरावा (आधार कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स)
पत्याचा पुरावा (वीज बील किंवा गॅस बील किंवा नळपट्टी बील किवा टेलिफोन बील)
व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र
व्यवसायाचा ओळख पुरावा/पत्ता पुरावा (संबंधित प्रमाणपत्रे आणि परवाने)
श्रेणी पुरावा, असल्यास
मागील सहा महिन्यांचे हिशोबाचे विवरण
मागील दोन वर्षांच्या ताळेबंदासह प्राप्तिकर परतावा
व्यवसाय अस्तित्वाचा पुरावा, जसे की मेमोरँडम ऑफ असोसिएशन किंवा पार्टनरशिप डीड
ही सर्व कागदपत्रे मुद्रा लोन साठी लागतात.
मुद्दा क्रमांक ७) मुद्रा लोन योजनेसाठी अर्ज कसा करावा?
या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे घेऊन जवळच्या वित्तीय संस्थेकडे (बँकेत) जावे लागेल. भारतात जवळजवळ सर्व आर्थिक संस्था मध्ये मुद्रा कर्जासाठी अर्ज करू शकता.
बँकेत गेल्यानंतर तुम्हाला कर्ज मागणीचा अर्ज भरावा लागेल आणि आपला वैयक्तिक व व्यावसायिक तपशील द्यावा लागेल. मुद्रा मंत्रालय कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करावा? हे जाणून घेण्यासाठी त्यांना किती रक्कम द्यायची आहे? ते देखील तपासून घ्यावे लागतील. त्यामध्ये बैंक तुम्हाला मुद्रा लोन ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पर्याय पुरवले जातील, त्यामध्ये शिशू, किशोर आणि तरुण हे तीन पर्याय असतील तुमच्या व्यवसायानुसार तुम्ही या तिन्ही पैकी कोणताही एक पर्याय निवडून या योजनेअंतर्गत कर्ज घेऊ शकता.
तर अशाप्रकारे तुम्ही ऑफलाइन अर्ज करू शकता.
चला तर पाहूया ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
सर्वप्रथम आपल्याला मुद्रा योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
https://maharnudra. maharashtra.gov.in/Site/Home/ Index.aspx या वेबसाईट वर जावा.
आता मुख्यपृष्ठ आपल्यासमोर उघडेल. मुख्य पृष्ठावर, आपल्याला लॉगिन बटणावर क्लिक करावे लागेल. पंतप्रधान मुद्रा लोन योजना आता आपल्यासमोर एक नवीन पृष्ठ उघडेल ज्यामध्ये आपल्याला आपले वापरकर्ता नाव, संकेतशब्द आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करावा लागेल. आता आपल्याला लॉगिन बटणावर क्लिक करावे लागेल. आपण मुद्रा पोर्टलवर लॉगिन करण्यात सक्षम असाल.
त्यानंतर तिथे विचारले जाईल ती माहिती भरावी.
आणि फॉर्म सबमिट करावा.
तर अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.
तर मंडळी तुम्हाला नवीन व्यवसाय करण्यासाठी जर कर्ज पाहिजे असेल तर तुम्ही मुद्रा लोन घेऊ शकता.
अशाच नावीन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा.