नमस्कार मंडळी आज आपण पाहूयात यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनेक राजकीय घराणे होऊन गेले. यवतमाळ जिल्हा हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा .२०१४ पर्यंत यवतमाळ येथे काँग्रेसच चांगलेच वर्चस्व पाहायला मिळाले परंतु २०१४ आणि २०१९ मध्ये मोदी लाटेमुळे इथे काँग्रेसच्या बालेकिल्लाला सुरुंग लागला. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सात विधानसभा मतदारसंघ येतात. वणी, राळेगाव, यवतमाळ, दिग्रस, पुसद, उमरखेड, आर्णी हे सात विधानसभा मतदारसंघ यवतमाळ जिल्ह्यामध्ये येतात.
यातील पाहिला विधानसभा मतदारसंघ येतो तो म्हणजे यवतमाळ
हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. यवतमाळ विधानसभा मतदारसंघ क्रमांक ७८ आहे. यवतमाळ मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील १. यवतमाळ तालुका आणि २. दारव्हा तालुक्यातील लाडखेड महसूल मंडळ यांचा समावेश होतो. यवतमाळ हा विधानसभा मतदारसंघ यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मोडतो. भारतीय जनता पक्षाचे मदन मधुकरराव येरावार हे यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. यवतमाळ हा विधानसभा मतदारसंघ काँगेसचा बालेकिल्ला मानला जायचा. यवतमाळ य विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार जांबूतराव धोटे हे होते . १९६२ साली ते प्रथम आमदार झाले. त्यावेळी त्यांनी स्वतंत्र विदर्भची मागणी केली होती. २००४ मध्ये भाजपने त्यांचे इथे कमल फुलवले. २००४ मध्ये भाजपचे मदन एरवर हे या मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. परंतु २००९ मध्ये पुन्हा इथे काँग्रेसने बाजी मारली त्यावेळी काँग्रेसचे निलेश पारवेकर यांनी येथे बाजी मारली. परंतु निलेश पारवेकर यांच्या अपघाती निधनानंतर येथे पुन्हा पोटनिवडणूक झाली. त्यामुळे २०१३ च्या पोटनिवडणूक मध्ये काँग्रेसच्या नंदिनी पारवेकर यांनी मदन एअरवर यांचा पराभव केला. नंदिनी पारवेकर या यवतमाळ विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार झाल्या. त्यानंतर २०१४ मध्ये पुन्हा एकदा राजकारण बदलले आणि 2014 मध्ये अतिथटीचा सामना येथे रंगला. २०१४ मध्ये पुन्हा एकदा भाजपचे मदन ऐरावर यांनी निवडणूक जिंकली. त्यानंतर मदन एरोवर यांना मंत्री पदही मिळालं. त्यानंतर २०१९ मध्ये यांनीच ही निवडणूक जिंकली होती. तर काँग्रेसचे बाळासाहेब मांगुलकर यांचा अतिशय कमी मतांनी येथे पराभव झाला होता. तर आता २०२४ मध्ये यवतमाळ येथे महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामध्ये जागेसाठी रस्सीखेच होऊ शकते. तसेच नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणूक मध्ये भाजप बॅक फुटला गेलेला दिसतो त्यामुळे आता यवतमाळ येथे काँग्रेसकडून मांगुळकर कर तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून विधान परिषदेचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी दंड थोपटलेले आहेत. तसेच अशाही चर्चा रंगल्या आहेत की बाजोरिया यवतमाळमध्ये २०२४ मध्ये गुलाल उधळतील.
आता दुसरा मतदारसंघ पाहू तो म्हणजे वनी
हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. वणी विधानसभा मतदारसंघ क्रमांक ७६ आहे. वणी मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील १. मारेगांव, २. झरी जामणी आणि ३. वणी या तालुक्यांचा समावेश होतो. वणी हा विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो. भारतीय जनता पक्षाचे संजिवरेड्डी बापुराव बोदकुरवार हे वणी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. २०१४ मध्ये वनी या विधानसभा मतदारसंघांमध्ये पहिल्यांदा येथे भाजपचे कमल फुलवले. २०१४ मध्ये मोदी लाटेत बोध कुलनवार हे भाजपकडून पहिल्यांदा येथे निवडून आले. २०१४ मध्ये काँग्रेसचे वामनराव कासावार आणि भाजपचे बोधकुलंवार यांच्यात लढत झाली होती. परंतु २०१९ मध्ये ही भाजपचे बोधन कुलवार यांनी ही लढत जिंकली आणि पुन्हा एकदा वनी मध्ये भाजपचे कमळ फुलले. परंतु नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या धानोरकरांना 50 हजारांच्या आसपास लीड मिळाले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा वनी मध्ये काँग्रेसचा पंजा उमटण्याचे चान्सेस वाढले आहेत. त्यामुळे इथे काँग्रेसचे पार्ट जड राहणार आहे तर भाजपचे आमदार बोधकूलंवर यांना येणारी आगामी विधानसभा निवडणूक ही फारसी सोपी जाणार नाही. वनी मध्ये कापूस या पिकाचे जास्त प्रमाणात उत्पादन होते तरीही इथे एकही सूतगिरणी नाही . जास्त गिरणी चालू झाल्या होत्या त्याही आता बंद पडले आहेत त्यामुळे येथील तरुणांना रोजगार मिळत नाहीये अशा देखील चर्चा आहेत तसेच इथे कुणबी समाज हा एक फॅक्टर आहे. तसेच इथे असेही चर्चा आहेत की कुणबी समाज हा कुणाच्या बाजूने जातो त्यानुसार येथील मते फिरतात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता वणी येथे काँग्रेसचे वामनराव कासावार यांचे पारडे जड राहील असेच दिसत आहे.
आता पाहूया तिसरा मतदारसंघ तो म्हणजे राळेगाव
हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. राळेगांव विधानसभा मतदारसंघ क्रमांक ७७ आहे. राळेगाव मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील १. बाभुळगाव, २. कळंब आणि ३. राळेगाव ही तालुके आणि ४. केळापूर तालुक्यातील रुंझा महसूल मंडळ यांचा समावेश होतो. राळेगाव हा विधानसभा मतदारसंघ यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती – ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे. भारतीय जनता पक्षाचे अशोक रामाजी उईके हे राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. राळेगाव हा देखील काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचं परंतु या बालेकिल्लाला सुरू लागला तो म्हणजे मोदी लाट असणाऱ्या २०१४ साली. १९९५ मध्ये काँग्रेसचे डॉक्टर वसंत पुरके यांनी राळेगाव विधानसभा येथे निवडणूक जिंकली होती. १९९५ नंतरच्या २०१४ पर्यंत प्रत्येक निवडणुकीमध्ये राळेगावचे डॉक्टर वसंत पुरके हेच आमदार राहिले होते. २०१४ मध्ये काँग्रेसचे वसंतराव पुरके यांच्या विरुद्ध भाजपकडून अशोक उईके यांच्यामध्ये लढत झाली. परंतु २०१४ मध्ये वसंतराव पुरके यांचा पराभव झाला. २०१४ मध्ये असलेली मोदी लाट त्यामुळे भाजपचे अशोक उईके यांनी बाजी मारत राळेगाव येथे प्रथमच कमल फुलवले. अशोक विके यांचं छोट्या मोठ्या गावात चांगला जनसंपर्क आणि आपुलकीची भाषा असल्यामुळे त्यांचे राजकीय वजन चांगलेच वाढले आहे. २०१९ मध्ये ही काँग्रेसचे वसंतराव पुरके आणि भाजपचे अशोक उईके यांच्यामध्ये लढत झाली 2019 मध्ये ही अशोक उईके यांनी बाजी मारली आणि पुन्हा एकदा येथे कमल फुलवले. मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राळेगाव येथे शिवसेना उद्धव ठाकरे गट म्हणजेच मशाल यांना येथे चांगलेच लीड मिळाल्याचे पाहिला मिळाले. त्यामुळे पुन्हा एकदा आता अशोक उईके हे रेड झोन मध्ये गेले आहेत. त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा मतदारसंघांमध्ये पुन्हा तिसरी लढत होईल ती म्हणजे काँग्रेसचे वसंतराव पुरके आणि भाजपचे अशोक उईके यांच्यामध्ये. त्यामुळे २०२४ मध्ये येथे अतिठटीचा सामना रंगताना दिसणार आहे.
आता पाहुयात चौथा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे दिग्रस. हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. दिग्रस विधानसभा मतदारसंघ क्रमांक ७९ आहे. दिग्रस मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील १. दिग्रस, २. नेर, ३. दारव्हा तालुक्यातील लोही, चिखली, दारव्हा ही महसूल मंडळे आणि दारव्हा नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. दिग्रस हा विधानसभा मतदारसंघ यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मोडतो. शिवसेना पक्षाचे संजय दुलिचंद राठोड हे दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. दिग्रस हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. २००४ मध्ये शिवसेनेचे संजय राठोड विरुद्ध काँग्रेसचे माणिकराव ठाकरे असा संघर्ष पाहिला मिळाला. यामध्ये संजय राठोड यांनी बाजी मारली. त्यानंतर २००९ मध्ये काँग्रेसचे संजय देशमुख विरुद्ध शिवसेनेचे संजय राठोड अशी लढत झाली. २००९ मध्ये ही शिवसेनेचे संजय राठोड यांनी बाजी मारली. संजय देशमुख यांचा मोठ्या लढणे पराभव झाला. त्यानंतर सलग २०१४ आणि २०१९ ला ही संजय राठोड यांनी बाजी मारली. बंजारा समाजाचे आक्रमक शिवसैनिक म्हणून संजय राठोड यांना ओळखले जाते . २०१९ मध्ये संजय देशमुख हेही चांगल्याच तयारीने निवडणुकीमध्ये उतरले होते परंतु त्यांनाही संजय राठोड यांनी शह दिला तब्बल ६००० मतांनी ते निवडून आले. यानंतर त्यांना मंत्रिपदही मिळाले परंतु त्यानंतर एक प्रकरण घडले आणि ते म्हणजे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण त्यावरून संजय राठोड्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तसेच मीडियामध्ये भरपूर बदनामी झाली. तसेच शिवसेना फुटी मध्ये संजय राठोड यांनी शिवसेना शिंदे गटाला साथ दिली त्यामुळे आता संजय राठोड यांच्या नेतृत्वाला बरेच धक्के बसले आहेत. तसेच नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदेच्या उमेदवाराला त्यांना फारशी देता आले नाही. त्यामुळे सध्या येथे संजय देशमुख हे खासदार आहेत. त्यामुळे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीला दिग्रस मधून महाविकास आघाडी कडून अनेक जण इच्छुक असल्याचे बोलले जात आहे त्यामध्ये माणिकराव ठाकरे यांचे पुत्र राहुल ठाकरे यांना संजय राठोड यांच्या विरोधात महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळण्याचे चान्सेस वाढले आहेत. तर संजय राठोड यांच्या पाठीमागे बंजारा समाजाचा हक्काचे मतदान आहे त्यामुळे महाविकास आघाडीला येथे उमेदवार देताना चांगलाच विचार करून उमेदवार द्यावा लागणार आहे.
आता पाहुयात पाचवा मतदासंघ तो म्हणजे उमरखेड
हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. उमरखेड विधानसभा मतदारसंघ क्रमांक ८२ आहे.
उमरखेड मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील १. उमरखेड तालुका आणि २. महागांव तालुक्यातील गुंज,महागांव व मोरथ ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. उमरखेड हा विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती – SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे. भारतीय जनता पक्षाचे नामदेव जयराम ससाणे हे उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. उमरखेड या मतदारसंघामध्ये एकदा निवडूण आलेला उमेदवार पुन्हा निवडूण येत नाही. असा गेल्या ५० वर्षाचा इतिहास आहे. २०१४ मध्ये भाजपचे राजेंद्र नजरधने यांनी काँग्रेसच्या विजय खडसे यांचा पराभव केला. तर २०१९ मध्ये काँग्रेसचे विजय विजय खडसे यांच्या विरुद्ध भाजपचे नामदेव ससाने यांच्यामध्ये लढत झाली होती. यामध्ये भाजपचे नामदेव ससाने हे विजयी झाले. आता येणाऱ्या आगामी विधानसभा मतदारसंघांमध्ये उमरखेड मतदार पुन्हा एकदा भाजपच्या नामदेव ससाने यांना संधी देणार का तसेच नामदेव ससाने यांच्यावरती स्वच्छ भारत मिशन घोटाळ्याचा आरोप तसेच मराठा समाजाकडून होणाऱ्या विरोध होत आहे. त्यामुळे भाजप उमरखेड मध्ये नवीन चेहरा देणार की पुन्हा एकदा नामदेव ससाणे यांना संधी देण्यात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला उमरखेड मधून चांगली मिळाली आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकांमध्ये फायदा होणार आहे. म्हणजेच महाविकास आघाडीचे पारडे येथे जड राहणार आहे.
आता पाहूया सहावा मतदारसंघ तो म्हणजे पुसद
हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. पुसद विधानसभा मतदारसंघ क्रमांक ८१ आहे. पुसद मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील १. पुसद तालुका आणि २. महागांव तालुक्यातील काळी (दौ. खा ) हे महसूल मंडळ यांचा समावेश होतो. पुसद हा विधानसभा मतदारसंघ यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मोडतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंद्रनील मनोहर नाईक हे पुसद विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. पुसद या विधानसभा मतदारसंघाला मोठा इतिहास आहे. तो म्हणजे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक आणि माजी मुख्यमंत्री कै. सुधाकर नाईक हे दोघेही पुसदचे पुत्र होते आणि त्यांनी सर्व महाराष्ट्राचं नेतृत्व केला आहे. या दोघांनी राज्यामध्ये हरितक्रांती तसेच जलसंधारण अशा विकासाची पावले टाकली. नाईक हे घराणं प्रथम काँग्रेसमध्ये होतं त्यानंतर त्यांनी काँग्रेस मधून राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास केला. मनोहर नाईक हे सलंग २००४, २००९ आणि २०१४ अशा निवडणुकांमध्ये ते बाजी मारत आले त्यामुळे त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. त्यानंतर मात्र मनोहर नाईक यांना त्यांचे पुतणे निलय नाईक यांनी राजकीय आव्हान दिलं.निलय नाईक यांनी भाजप प्रवेश करत म्हणून नाईक यांच्या विरोधात निवडणूक लढवल्या. परंतु मनोहर नाईक यांची मतदारसंघावर्षी आणि राष्ट्रवादीची असलेली पकड अजिबात कमी होऊ दिली नाही. परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून निलय नाईक तर राष्ट्रवादीकडून मनोहर नाईक यांचे सुपुत्र इंद्राणी नाईक हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले. इंद्राणील नाईक यांनी प्रथमच पहिल्या निवडणुकीतच विजय मिळवला. २०१९ नंतर राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये फूट पडली तशी फुट नाईक यांच्या कुटुंबातही पडली. नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गट यांना साथ देण्याचे ठरवले. नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गट यांच्यात गेल्यामुळे त्यांचा असणारा मतदार हे नाराज असल्याचे चर्चा आहेत तर इंद्रनील नाईक यांचे सख्खे भाऊ ययाती नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना साथ देण्याचे ठरवले. त्यामुळे २०१९ मध्ये सख्खा चुलत भावाबरोबर असलेले लढत आता येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र सख्ख्या भावासोबत निवडणूक पाहायला भेटेल अशी चर्चा रंगल्या आहेत. तर आता पुसद येथील मतदार नक्की कोणत्या राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आता पाहूया शेवटचा आणि सातवा मतदारसंघ तो म्हणजे आर्णी
हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. आर्णी विधानसभा मतदारसंघ क्रमांक ८० आहे. आर्णी मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील १. आर्णी २. घाटंजी ही दोन तालुके आणि ३. केळापूर तालुक्यातील पाटणबोरी, पांढरकवडा ही महसूल मंडळे आणि पांढरकवडा नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. आर्णी हा विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती – ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे. भारतीय जनता पक्षाचे संदिप प्रभाकर धुर्वे हे आर्णी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे विद्यमान आमदार राजू तोडसाम यांना तिकीट नाकारलं कारण त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते तसेच त्यांच्या दोन बायकांमध्ये असलेले आरोप झाले होते त्यात 2019 मध्ये मोदी लाटे होती त्यामुळे भाजपला येथील जागा गमवायची नव्हती त्यामुळे भाजपने येथील राजू तोड साम यांचे तिकीट कापून ते संदीप दुर्वे यांना दिले. त्यामुळे भाजपचे संदीप दुर्वे यांच्याविरुद्ध काँग्रेसचे शिवाजीराव मोघे यांची लढत 2019 विधानसभा मतदारसंघांमध्ये पाहायला भेटली. शिवाजीराव मोघे यांचा सलग दोन वेळा पराभव झाला आहे. २०१९ ला ही काँग्रेसचे शिवाजीराव मोघे यांचा पराभव झाला. आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे शिवाजीराव मोघे यांना जिंकण्याची संधी भेटणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
तर मंडळी एकंदरीत यवतमाळ जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमधील असा आहे लेखाजोखा.
तर मंडळी तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कोण जिंकून येणार हे आम्हाला कमेंट करून सांगा.