राजन साळवींचा एकनाथ खडसे सारखाच गेम होणार का?
राजन साळवींचा एकनाथ खडसेंसारखाच ‘गेम’ होण्याच्या मार्गावर; रत्नागिरीत भाजप आपला पत्ता कधी ओपन करणार?
विधानसभा निवडणूक होऊन चार महिने होत आले तरी देखील पक्षांतराच्या चर्चा ह्या रंगतच आहेत.
निवडणूक झाल्यानंतर देखील या पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याचे काम चालूच दिसत आहे.
तसेच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत.
तर काही नेते हे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आणि देवेंद्र फडवणीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांना कोणतेही मंत्रिपद न भेटल्यामुळे देखील नाराज आहेत.
तर काही देते हे विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला म्हणून देखील नाराज आहेत.
तर मागील आठवड्यातच अशी चर्चा चालू होती की ऑपरेशन टायगर चालू आहे.
त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटातील अनेक आमदार हे ठाकरे यांना रामराम करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना किंवा भाजप पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत असे बोलले जात होते.
त्यातीलच एक नेते म्हणजे राजन साळवी.
राजन साळवी यांचा भाजप प्रवेश होणार असं बोललं जात होतं आणि तो भाजप प्रवेश 3 फेब्रुवारी ला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत होणार होता असे देखील बोलले जात होतं.
परंतु त्यांचा भाजप प्रवेश हा अजूनही झालेला नाही.
त्यामुळे आता राजन साळवी यांचा गेम देखील एकनाथ खडसे सारखाच होणार का अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.
चला तर मग पाहूया राजन साळवी यांचा भाजप प्रवेश का रखडण्यात आला आहे?
राजन साळवीच्या देखील एकनाथ खडसेंसारखाच गेम होणार आहे का?
राजन साळवी यांच्या भाजप प्रवेशासाठी नक्की कोण अडवणूक करतात ?
राजन साळवी यांचा भाजप प्रवेश करून रत्नागिरीमध्ये भाजपला काय साध्य करायचं?
चला तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात.
नक्की राजकारणात चाललंय काय यावर आपण मुद्द्याचं बोलू या.
मुद्दा क्रमांक १) राजन साळवींना उद्धव ठाकरे गटाला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश का करायचा आहे?
राजकारण हे अनिश्चितेच आहे असं नेहमीच बोललं जातं. त्यामुळेच राजकारणामध्ये कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कधीच मित्रही नसतो. त्यामुळे काहींना सत्ता उपभोगता येते तर काहींना सत्ता उपभोगता येत नाही.
कधी विरोधातल्या नेत्याला मोठी संधी मिळते तर सत्तेतल्या नेत्याला संधीसाठी झगडावा लागतो.
त्यामुळे कधी कोणाला वनवासी हे सांगता येत नाही.
असाच काही प्रकार याआधी एकनाथ खडसे यांच्यासोबत झाला होता.
आता तसाच प्रकार राजन साळवी यांच्यासोबत होत आहे का असा प्रश्न आता सर्वांना पडत आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटातील अनेक नेते हे नाराज झाले आहेत.
ज्यात कोकणातील शिवसेनेचे महत्त्वाचे नेते राजन साळवी यांचा देखील समावेश आहे.
लांजा, राजापूर मतदारसंघासह रत्नागिरीवर पकड असणारे राजन साळवी भाजपमध्ये प्रवेश करणार करणार आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या विश्वासू पैकी एक अशी राजन साळवी यांची ओळख होती.
मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी स्वकीयांना डावलून भाजपचे काम केले असा ठपका त्यांच्यावर शिवसेनेतील काही वरिष्ठांवर ठेवला. यामुळेच ते नाराज झाले असून शिवसेनेशी त्यांनी फारकत घेतली आहे.
तसेच राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या अडचणी वाढल्याचे बोलले जात होते
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचा आरोप आहे. त्यांच्या निवासस्थानावर तीन ठिकाणी एसीबीने छापे घातले होते
त्यानंतर त्यांना चौकशीसाठी रत्नागिरी कार्यालयात बोलावण्यात आले होते.
त्यांच्याकडे तब्बल 118.96 टक्के अपसंपदा जमा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, त्यांच्याविरोधात
एसीबीने सुरू केलेल्या कारवाईमुळे देखील ते कंटाळले असून आता कारवाई थांबवण्यासाठीच ते भाजपच्या वाटेवर असल्याचेही बोलले जात आहे.
मुद्दा क्रमांक २) राजन साळवीच्या देखील एकनाथ खडसेंसारखाच गेम होणार आहे का?
राजन साळवे यांचा 3 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये भाजप प्रवेश होणार होता.
परंतु त्यांच्या प्रवेशाला भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी पूर्णविराम दिला आहे. यामुळे साळवे यांचा एकनाथ खडसे होणार की त्यांचा भाजप प्रवेश होणार असा प्रश्न आता राजकीय पटलावर पडू लागला आहे.
विधानसभेतील पराभवानंतर नाराज झालेले राजन साळवी यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाला राम राम ठोकला. तसेच ते भाजप प्रवेश करतील अशा चर्चा सुरू झाल्या. यानंतर आधी नाही पण नंतर त्यांनी स्वत: याबाबत कबुली देत भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू असल्याचं सांगितले होते.
तर याबाबत भाजप नेत्यांशी चर्चा झाल्याचेही म्हटलं होतं.
पण भाजपचे माजी मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या भाजप प्रवेशावर थेट वक्तव्य केले. चव्हाण यांनी त्यांच्या भाजप प्रवेशाची कोणतीच चर्चा झालेली नाही. तशी भेट देखील झाली नसल्याचे म्हटलं होतं. यामुळे भाजप साळवींची राजकीय कोंडी करत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांनी आपण पुन्हा भाजपमध्ये जाणार असल्याचे जाहीर केले होते.
तसेच निवडणुकीवेळी त्यांनी थेट दिल्लीतील अमित शाह, जे.पी.नड्डा यांच्यासोबतचा फोटो टाकत घरवापसीचे संकेत दिले होते. तशी चर्चाही काही महिन्यांपासून सुरू झाली होती. एकनाथ खडसे यांनीही त्याला दुजोरा दिला होता .
राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत माझा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे, असे एकनाथ खडसे सांगत होते.
मात्र, त्याची अखेरपर्यंत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
आपण भाजपमध्ये प्रवेश करावा म्हणून केंद्रातून प्रयत्न करण्यात आले.
मात्र, स्थानिक नेत्यांनी त्यांच्या भाजपप्रवेशाबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्यानं आपण आपल्या मूळ पक्षात म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातच राहणार असल्याची भूमिका विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसेंनी जाहीर करावी लागली.
त्यावेळी एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. खडसेंसारखंच राजकारण महायुतीत आता साळवींच्या बाबतीत होतंय का अशी चर्चा जोर धरु लागली आहे.
तर आता पुन्हा एकदा एकनाथ खडसे आणि छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे. तसेच त्यांच्यात बराच वेळ चर्चा देखील झाले आहे. त्यामुळे आता राजन साळवी ऐवजी छगन भुजबळ आणि एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश होणार का असा देखील प्रश्न पडत आहे .
मुद्दा क्रमांक ३) राजन साळवी यांच्या भाजप प्रवेशाला नक्की कोण विरोध करत आहे?
निवडणूक होऊन आता जवळपास चार महिने होत आले आहे परंतु राजन साळवी यांचा प्रवेश मात्र रखडलेलाच आहे.
तसेच राजन साळवे यांचा भाजप प्रवेश होणार आहे यावरती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हात वर केले आहे.
कारण त्यांनी तर डायरेक्ट अशा काही चर्चा झाल्या नाही असं वक्तव्य केलं आहे.
त्यामुळे महायुतीमध्ये राजन साळवी यांच्या प्रवेशासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोध आहे असे बोलले जात आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महायुतीमध्ये उद्धव ठाकरे गटातील इतर आमदार चालतील पण त्यांना राजन साळवी नको आहेत. अशा चर्चा कोकण येथील रत्नागिरी जिल्ह्यात दबक्या आवाजात चालू आहेत.
मुद्दा क्रमांक ४) राजन साळवी यांचा भाजप पक्ष प्रवेश करून भाजपला काय साध्य करायचे आहे?
रत्नागिरीत सध्या ऑपरेशन टायगरमधून उद्धव ठाकरे गट फोडला जात आहे. येथे ठाकरे यांच्या शिवसेनेचे दोन आमदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
तर शेकडो पदाधिकारी प्रवेश करत आहेत.
पण शिंदे गटाला राजन साळवी नको आहोत. तर भाजपला येथे उदय सामंत यांच्याविरोधात राजन साळवी यांच्या रूपाने एक चांगला मोहरा मिळत आहे.
तसेच राजन साळवी यांच्यामार्फत भाजपला रत्नागिरीमध्ये स्वतःचं वर्चस्व तयार करता येईल.
त्यामुळे आता राजन साळवी यांचा भाजप प्रवेश होणार की राजन साळवी यांचा एकनाथ खडसे होणार असा प्रश्न सर्वांनाच पडत आहे. तर मंडळी तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून कळवा.
Your blog post really resonates with me! Speaking of creative content, have you tried Sprunki? It’s an amazing music-mixing experience that I think you’d love!