राणी लंके पारनेर मधून का पराभूत झाल्या? वारं फिरलं की फिरवलं?


पारनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी लढत होती. त्यामध्ये काही अपक्ष म्हणूनही उभे राहिले होते.

परंतु अत्यंत चुरशीची लढत झाली ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार राणी लंके यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे काशिनाथ दाते .
सोपं वाटत असलेला विजय पराभवात बदलल्यावर काय होतं याचा अनुभव पारनेर विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळाला. कारण खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचा पराभव येथे झाला. राणी लंके यांचा पराभव पारनेर मध्ये नक्की का झाला? राणी लंके आणि निलेश लंके पारनेर मध्ये प्रचार करण्यात कोठे मागे पडले? असा प्रश्न आता सर्वांनाच पडू लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या राणी लंके यांना एक लाख दहा हजार 369 मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे काशिनाथ दाते यांना एक लाख 12 हजार 775 मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे काशिनाथ दाते हे पारनेर विधानसभा मतदारसंघांमध्ये पाहिल्या फेरीपासूनच आघाडीवर राहिले होते. पारनेर या विधानसभा मतदारसंघांमध्ये अतिठटीची लढत होईल असे सर्वांनाच वाटत होते परंतु पहिल्या फेरीपासूनच दाते हे आघाडीवर होते. शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संदेश कारले यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून पारनेर विधानसभा मतदारसंघांमध्ये फॉर्म भरला होता. संदेश कारले यांनी कोणत्याही परिस्थितीत फॉर्म मागे घेणार नाही असे ठणकावून सांगितले होते. आणि शेवटपर्यंत संदेश कारले यांनी हा फॉर्म मागे घेतला नाही. त्यामुळे येथे महाविकास आघाडीमध्ये मत विभाजन झाल्याचे दिसून आले.
निलेश लंके यांनी लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर पारनेरची आमदारकीसाठी जागाही रिक्त झाली होती.
लोकसभा निवडणूक संपली नाही तोच पारनेर येथे आता आमदार राणी लंकेत होणार अशा चर्चा सर्वांच्या तोंडून येत होतं  तसेच इथे तशा प्रकारची बॅनरबाजी ही पाहायला मिळाली.
राणी लंके यांनी देखील लोकसभा निवडणुकी वेळीच निलेश लंके यांचा प्रचार करताना पारनेर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गाव त्यांनी पिंजून काढले होते.
त्यामुळे राणी लंके या नावाला त्या काळात मतदारसंघात एक प्रकारची सहानुभूती तयार झाली होती.
तर लोकसभा निवडणुकीमध्ये निलेश लंके यांनी सुजय विखे यांचा केलेला पराभव हा सुजय विखे यांच्या फारच जिव्हारी लागला होता.
तर पहिल्यापासून प्रचारात आघाडीत असलेल्या राणी लंके शेवटच्या टप्प्यात मागे पडल्या.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार काशीनाथ दाते यांनी चांगलीच आघाडी घेतली.
त्यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कट्टर शिवसैनिक तथा जिल्हा उपप्रमुख संदेश कार्ले यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे इथं तिरंगी लढत झाली.
तर कट्टर शिवसैनिक संदेश कारले यांनी बंडखोरी केली संदेश कारले यांच्या संघटन कौशल्य नगर तालुक्यात खूप मोठे आहे पारनेर मतदारसंघातील बरीच गावे नगर तालुक्यात येत असल्याने लंके यांच्यासमोर आव्हान निर्माण झाले होते तसेच संदेश कारल्यांनी वातावरण निर्मितीत अदृश्य शक्तीचे बळ मिळविल्याची चर्चा होती. तसेच शिवसेनेचे माजी आमदार विजयराव औटी हे देखील अपक्ष म्हणून उभे होते.
अजित पवार यांनी पारनेर मध्ये सहभागी होऊन चांगले वातावरण निर्माण केले होते त्याचा फायदा काशिनाथ दाते यांना झाला. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात काशिनाथ दाते यांनी प्रचारात आघाडी घेतली. तर पारनेर मतदारसंघात तसेच महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात देखील अशा चर्चा चालू होत्या की निलेश लंके खासदार असताना पुन्हा त्याच घरात आमदारकी नको आणि हाच मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील नेत्यांनी देखील लावून धरला होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राणी लंके यांच्या नावाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.
तर पारनेर विधानसभा मतदारसंघाच्या आमदारकीचा राजीनामा देऊन निलेश लंके यांनी अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत लढवली होती
. त्यांच्या लढत भाजपच्या सुजय विखे पाटील यांच्याशी झाली होती. या निवडणुकीत प्रचार दरम्यान निलेश लंके यांनी सुजय विखे यांच्यावर घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका जोरदार हल्लाबोल केला होता. त्यामूळे निलेश लंके यांच्या पत्नीला पारनेरमधून विधानसभेसाठी उमेदवारी दिल्या नंतर सुजय विखे पाटलांनी निलेश लंकेंवर घराणेशाहीचा आरोप केला होता. तसेच शेवटच्या टप्प्यामध्ये निलेश लंके यांचे जवळचे असणारे सहकारी विजय औटी यांनी निलेश लंके यांची साथ सोडून त्यांनी अजित दादा पवार यांचे उमेदवार काशिनाथ दाते यांना जाहीर पाठिंबा दिला.
त्यामुळे एकंदरीत शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणूक फिरली .
तसेच पारनेर विधानसभा मतदारसंघांमध्ये लाडक्या बहीण योजनेचा परिणाम देखील येथे झालेला दिसला.
या सर्व गोष्टींमुळे एकंदरीतच राणी लंके यांचा पराभव पारनेर या विधानसभा मतदारसंघांमध्ये झाला.

Leave a Comment