राहुरी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबन प्रकरणी लंके तनपुरे एकत्र येणार!
‘मी काही मरत नाही, पण तो शिवद्रोही सापडलाच पाहिजे’; प्राजक्त तनपुरेंनी सलाईन नाकारत लाखाचं बक्षीस देण्याचं केलं जाहीर
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी या तालुक्यांमध्ये काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे विटंबन करण्यात आले होते.
परंतु तेथील आरोपी अजूनही पकडले गेले नाही. तसेच हा प्रकार कोणी केला त्यांची नाव देखील समोर आलेली नाही.
या घटनेला आता तब्बल वीस दिवस होत आले आहेत परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विटंबन करून देखील आरोपी पकडले जात नाही यामुळे आता माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे चांगलेच आक्रमक झाले आहेत.
दोन दिवसांपासून त्यांचे बेमुदत उपोषण सुरू झाले आहे त्यावेळी त्यांनी सलाईन लावण्याची विनंती देखील फेटाळली आहे.
चला तर पाहूया राहुरी येथील नेमकं प्रकरण काय आहे?
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे विटंबन नक्की कोणी केले आहे?
आज सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही आरोपी का सापडला जात नाही?
या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आज सविस्तर पाहणार आहोत.
मुद्दा क्रमांक १) माजी मंत्री प्राजक्त तनपुरे उपोषणाला का बसले आहेत?
राहुरी मध्ये वीस दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती.
परंतु वीस दिवस उलटल्यानंतरही आरोपींना पकडण्यात यश आलेले नाही?
यामुळे दोन दिवसांपासून प्राजक्त तनपुरे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
त्यामुळे निलेश लंके यांनी आंदोलन स्थळी येत प्राजक्त तनपुरे यांची भेट घेतली.
तसेच त्यांचे दोन दिवसांपासून उपोषण चालू असल्यामुळे त्यांना सलाईन लावण्याची विनंती केली परंतु प्राजक्त तनपुरे यांनी ही विनंती फेटाळली.
प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले आहे की मी काही मरत नाही पण तो शिवद्रोही सापडला पाहिजे.
महापुरुषांची विटंबना करण्याची माहिती देणाऱ्याला शिवप्रेमी कडून एक लाख रुपये दिले जाईल अशी घोषणा तनपुरे यांनी केली आहे.
मुद्दा क्रमांक २) राहुरी हे शहर एक दिवसासाठी बंद का राहणार?
प्राजक्त तनपुरे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून राहुरी हे शहर एक दिवसासाठी बंद राहणार असल्याची घोषणाही व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
प्राजक्त तनपुरे यांच्या बेमुदत उपोषणाचा दुसरा दिवस आहे त्यांच्या या आंदोलनात 50 शिवप्रेमी बसले आहेत.
प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना होऊन वीस दिवस झाले. घटना घडली त्यावेळी मी परदेशात होतो. राहुरीत आल्यानंतर खासदार लंके यांच्यासोबत जाऊन पोलीस ठाण्यात आरोपींना अटक करावी अशी मागणी केली. तसेच उपोषणाची निवेदन केले. त्यानंतर चार दिवस झाले तरी तपासात प्रगती दिसली नाही.
त्यामुळे या घटनेनंतर आता मी उपोषणाला बसलो आहे असे प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले आहे.
मुद्दा क्रमांक ३) आरोपींची नावे जाहीर का करत नाही?
या सर्व घटनेनंतर दोन दिवसांनी पालकमंत्र्यांनी पोलीस व महसूल प्रशासनाची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद देखील घेतली. त्यात त्यांनी एका टप्प्यापर्यंत तपास झाला आहे आरोपींच्या नावाचा उलगडा होतोय परंतु काही शहानिशा करावी लागेल असे सांगितले. मग तपास कशासाठी लांबवला जातोय याचे कोडे पडायला लागले आहे. कारण या घटनेनंतर परिस्थिती गंभीर होऊन जीवित वित्तहानी होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. तरी देखील आरोपींची नावे जाहीर करत नाही.
आत्ताच जर आरोपी सापडले नाही आणखी विलंब झाला तर आरोपींचे मनोबल वाढेल आणि पुन्हा एकदा महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करून वातावरण पेटवण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे अशी घटना पुन्हा होऊ नये. राहुरी शहर आणि तालुक्यात शांतता राहावी अशी प्रामाणिक इच्छा असल्यामुळे ते उपोषणाला बसले आहेत.
तसेच पोलीस ब्रीफिंग करून आरोपीची नावे उलगडले आहेत असे सांगितले जात आहे परंतु 20 दिवस होऊनही आरोपींची नावे जाहीर होत नाही तर संशयित म्हणून सुद्धा कोणाला ताब्यात घेतले नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
तर प्राजक्त तनपुरे हे लोकशाही मार्गाने उपोषणावर ठाम आहे जोपर्यंत ठोस काही हाती लागत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका प्राजक्त तनपुरे यांनी घेतली आहे.
तसेच हिंदूंच्या व महापुरुषांच्या नावे मते मागणाऱ्या सरकारला घटनेचे गांभीर्य नाही त्यामुळे आत्मकलेश म्हणून उपोषण करीत आहे सरकारने जागे व्हावे आरोपींना अटक करावी अन्यथा राज्यभर उद्रेक होईल असा इशारा देखील माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे.
त्यामुळे राहुरी येथील आरोपींना कोण पाठीशी घालत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.