सध्या बीड येथील मस्साजोग हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामधील आरोपी तब्बल वीस ते पंचवीस दिवसांनी सापडत आहे
तर काही आरोपी स्वतःहून सरेंडर करत आहेत
तर काही आरोपींना पुण्यामध्ये अटक करण्यात आली.
त्यामुळे सगळीकडे आता चर्चा रंगू लागल्या आहेत ते म्हणजे आरोपी हे पुण्यामध्येच का आहेत ?
तर पुण्यामध्ये पकडलेले आरोपी म्हणजे सुदर्शन घुले व सुधीर सांगळे.
मस्साजोग मध्ये जी हत्या झाली त्या घटनेला सर्वात जास्त कारणीभूत सुदर्शन घुले हा आहे
संतोष देशमुख यांची हत्या डिसेंबर महिन्यामध्ये नऊ तारखेला झाली होती.
तेव्हापासून सुदर्शन घुले हा फरार होता.
त्यानंतर असे बोलले जात होते की सुदर्शन घुले हा नेपाळला पळून गेला आहे
परंतु सुदर्शन घुले हा तर पुण्यामध्ये सापडला.
नमस्कार मी पिके भांडवलकर , चला तर पाहूया सुदर्शन घुले याचं नक्की प्रकरण काय आहे आणि याचा इतिहास काय आहे?
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावच्या सरपंचाची हत्या करण्यात आली.
खरंतर प्रकरणाला सुरुवात झाली ती म्हणजे अवादा कंपनीमध्ये खंडणी मागण्यासाठी सुदर्शन घुले आणि त्याचे इतर सहकारी गेले होते.
त्यावेळी त्यांनी तिथे अवधा कंपनीमध्ये सेक्युरिटी म्हणून काम करणारे सोनवणे यांना मारहाण केली
यामुळे सोनवणे यांनी गावचे सरपंच म्हणून संतोष देशमुख यांना तिथे बोलावून घेतले
त्यावेळी संतोष देशमुख यांनी त्यांच्यामधील भांडण सोडवली
या भांडणांचे काही व्हिडिओ सोशल मीडिया वरती व्हायरल झाले होते.
त्यामुळे सुदर्शन घुले याचा अपमान झाला असे त्याला वाटत होतं.
त्यामुळे याचा राग सुदर्शन घुले यांच्या मनात होता.
 तर 6 डिसेंबर लां व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुदर्शन घुले याचा मित्र प्रतीक घुले याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून एक पोस्ट शेअर केली होती ती म्हणजे सुदर्शन घुले हा फोनवर बोलतानाचा फोटो होता आणि त्यावर ती लिहिले होते बाप तो बाप होता है #३३३
यावरून असे समजते की प्रतीक घुले याने काहीतरी होणार असल्याचे संकेत दिले होते.
तर#३३३ म्हणजे सुदर्शन घुले याची काळया रंगाची स्कार्पिओ आहे.
आणि त्या स्कार्पियो चा नंबर 9333 असा आहे.
त्यांनतर सुदर्शन घुले व त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या केली.
त्या’ दिवशी नेमंक काय घडलं याचा एक व्हिडिओ पोलीसांच्या हाती लागला आहे.
या हत्येमध्ये ३.५ फूट लांब गॅस सिलिंडर पाईप, लोखंडी खिळ्यांनी गुंडाळलेला पाईप, लाकडी दांडक्यांचा वापर करण्यात आला होता. मोबाईलमधील व्हिडिओ क्लिप्समध्ये मारहाण करतानाचा संपूर्ण प्रकार आहे. या व्हिडिओत देशमुख यांना मारहाण करण्यात असल्याचे दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच डॉक्टरांनी देखील त्यांच्या शरीरावर ५६ जखमा आणि फोड असल्याचे शवविच्छेदन अहवाल देत नमूद केले आहे.
तर या सर्व प्रकरणानंतर अवधा कंपनीने खंडणी मागितल्या प्रकरणी तक्रार केली होती.
त्यामध्ये अवधा कंपनीने वाल्मीक कराड व सुदर्शन घुले यांची नावे घेतली होती.
तेव्हापासून वाल्मीक कराड व सुदर्शन घुले यांच्या नावाची चर्चा चालू होती.
परंतु या दोघांवरही कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती.
परंतु त्यानंतर राजकीय दबाव वाढत गेला आणि यांना अटक करण्याचे मागणी वाढत गेल्यामुळे शेवटी वाल्मीक कराड याने स्वतःला सरेंडर केले.
त्यांनतर सुदर्शन घुले व सुधीर सांगळे या दोघांना पुणे येथील बालेवाडी मधून अटक करण्यात आली.
सुदर्शन घुले हा हत्या झाल्यापासून आपल्या सहकाऱ्यांसह फरार झाला होता.
वाल्मीक कराड यांनी पुण्यामध्ये सरेंडर केल्यानंतर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे यांना फरार म्हणून घोषित करण्यात आले होते
त्यानंतर सीआयडी चौकशी मध्ये पोलिसांना नांदेड मध्ये असणाऱ्या एका डॉक्टरचे धागे दोरे हाती लागले
त्यामुळे पोलिसांनी नांदेडमध्ये जाऊन त्या डॉक्टरांना ताब्यात घेतले तर डॉक्टरच्या पत्नी ह्या वकील आहे
त्यानंतर पोलिसांचा संशय आणखीच बळावला.
त्यांच्या चौकशीतून पोलिसांना समजले की सुदर्शन घुले आणि त्याच्या सहकाऱ्यांना हे डॉक्टर आणि वकील मदत करत आहेत
त्यामुळे पोलिसांनी त्यांची खाक्या दाखवत डॉक्टरांना बोलते केले.
त्यावेळी डॉक्टर पोपटासारखे बोलू लागले व त्यांनी सांगितले सुदर्शन घुले याला मीच मदत केली आहे आणि सुदर्शन घुले हा सध्या पुणे येथे बालेवाडी मध्ये आहे असे सांगितले
त्यानुसार पोलिसांनी चक्र फिरवली आणि चार डिसेंबर रोजी सुदर्शन घुले आणि त्याचा सहकार्य सुधीर सांगळे यांना पकडण्यात आले.
परंतु सुदर्शन घुलेचा आणखी एक सहकारी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला.
कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देशमुख यांची हत्या केल्यानंतर घुले, आंधळे आणि सांगळे हे तिघेही आरोपी एकत्रच होते.
रेल्वेने ते गुजरातमध्ये गेले.
 तेथील एका शिवमंदिरात जवळपास 15 दिवस राहिले.
मंदिरातच जेवण करायचं आणि झोपायचं असा त्यांचा दिनक्रम सुरू होता. मात्र नंतर या तिघांजवळचे पैसे संपल्यामुळे कृष्णा आंधळे हा पैसे आणण्यासाठी महाराष्ट्रात आला होता
एका माणसाकडून पैसे घेऊन तो गुजरातला माघारी जाणार होता.
मात्र, तो येण्याआधीच सुदर्शन घुले आणि सांगळे दोघेही पुण्याला आले.
 यावेळी ते एका व्यक्तीची भेट देखील घेणार होते. मात्र, त्याआधीच पोलिसांनी त्यांना अटक केली. मात्र, कृष्णा आंधळे यांच्यासोबत नसल्याने तो पोलिसांना तावडीत सापडला नाही.
चला तर पाहूया सुदर्शन घुले ह्याचा नक्की इतिहास काय आहे.
सुदर्शन घुले हा केज तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी आहे
त्याचे वय अवघे 27 वर्षे आहे.
त्याचे शिक्षण इयत्ता सातवी पर्यंत झालेले आहे.
तो लहान असतानाच त्याचे वडील वारले त्यामुळे त्याच्या कुटुंबामध्ये तो एकुलता एक आहे आणि त्याच्यासोबत फक्त त्याची आई राहते. सुदर्शन घुले याचं घर तसे पाहिले तर पत्र्याचे आहे परंतु याच्या पत्राच्या घरासमोर काळा रंग असणारी स्कार्पिओ आहे.
याच काळा रंग असणाऱ्या स्कार्पिओ मधून संतोष देशमुख यांचे अपहरण झाले होते
सुदर्शन घुले याला तीन ते चार एकर कोरडवाहू जमीन आहे
पण त्याला शेती करण्यामध्ये रस नाही
त्यामुळे त्याने पैसे कमवण्यासाठी ऊस तोडी कामगारांचा मुकादम म्हणून काम करण्याचे ठरवले.
हे काम करताना तो जो मजूर कामावर येणार नाही त्या मजुरांकडूनही वसुली करण्याचा तो काम करत होता
त्यानंतर त्याच्या आयुष्य ऊसतोड मुकादम ते खंडणीखोर असे होत गेले
कारण त्याच्या डोक्यामध्ये आधीपासूनच भाईगिरी व नेतेगिरी करण्याचं वेड होते
त्यामुळे आता त्याच्याबद्दल असं बोलले जात आहे की वाल्मीक कराडपेक्षा अधिक खतरनाक सुदर्शन घुले आहे.
कारण त्याला केज तालुक्याचा भाई व्हायचे होते.
त्याला डॉन होऊन तालुक्यामध्ये त्याची दहशत निर्माण करायचे होती.
त्यामुळे तो एका गॉडफादरच्या शोधात होता.
त्याच दरम्यान तो वाल्मीक कराडचा खास असणारा विष्णू चाटे याच्या संपर्कात आला.
त्यानंतर तो विष्णू चाटेसाठी खंडणी गोळा करण्याचा काम करू लागला.
त्याची स्थानिक राजकारणांसोबत उठबस वाढत गेली.
त्यानंतर सुदर्शन वर दहा वर्षात दहा गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
सुदर्शन घुले याच्याविरोधात हत्या, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, दंगल आदी १० गुन्हे दाखल आहेत.
विष्णू चाटे याच्या ओळखीमुळे त्याला काही कामे मिळाली.
सुदर्शन घुले हा देखील गावकऱ्यांच्या मते राजकीय नेत्यांची व त्यांच्या पक्षांची व्यवहार सांभाळण्यात तरबेज होता.
तर आता पुढील तपास चालू आहे त्यामुळे सुदर्शन घुले हा नक्की मास्टरमाइंड आहे की आकाचा प्यादा आहे.
हे लवकरच समोर येइल
सध्या तरी सुदर्शन घुले आणि सांगळे यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अशाच माहिती पूर्ण व्हिडीओसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा.

By satta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *