वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाईचा सरकारचा निर्णय
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर आता सरकारने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 मार्च 2025 पासून, नियम तोडणाऱ्यांना अधिक दंड, तुरुंगवास आणि अनिवार्य समाजसेवेची शिक्षा होऊ शकते. नव्या नियमांमुळे निष्काळजी वाहन चालवणाऱ्या चालकांना आळा बसेल आणि रस्ते सुरक्षित होण्यास मदत होईल. वाहतूक कायद्यांमध्ये सुधारणा करून अपघातांची संख्या कमी करण्यावर भर दिला जात आहे. शिस्तबद्ध वाहतूक राखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांसाठी दंडात मोठी वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी अशा गुन्ह्यांसाठी 1,000 ते 1,500 रुपये दंड आकारला जात असे. मात्र, आता पहिल्यांदा नियमभंग केल्यास 10,000 रुपये दंड आणि सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शक्यता आहे. वारंवार नियम तोडणाऱ्यांसाठी दंडाची रक्कम 15,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच, त्यांना दोन वर्षांपर्यंत तुरुंगवासही होऊ शकतो. या कठोर निर्णयामुळे वाहतुकीतील शिस्त वाढण्यास मदत होईल.
चला तर पाहूया एक मार्च 2025 पासून कोणत्या वाहतूक नियमात आणि दंडात कोणते बदल करण्यात आले आहे.
नमस्कार मी पिके भांडवलकर स्वतः चैनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो.
जर वाहन चालवताना वैध परवाना किंवा विमा नसेल, तर संबंधित चालकाला दंड भरावा लागेल. परवान्याशिवाय वाहन चालवल्यास 5,000 रुपये आणि विमा नसल्यास 2,000 रुपये दंड ठोठावला जाईल. सरकारने वाहतूक नियम अधिक कठोर केले असून नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू शकतो. अशा कारवाईमुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल आणि रस्ते सुरक्षा वाढेल. प्रत्येक वाहनचालकाने आवश्यक कागदपत्रे बाळगणे आता अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. अन्यथा मोठ्या दंडाला सामोरे जावे लागू शकते.
आता जर तुम्ही रस्त्यावर वाहतुकीचे नियम पाळले नाहीत तर तुम्हाला तीन नव्हे तर दहा पट दंड भरावा लागणार आहे. कारण नवीन मोटार वाहन दंड २०२५, १ मार्च २०२५ पासून लागू झाला आहे.
चला तर पाहूया कोणते नियम मोडल्यास किती दंड भरावा लागेल?
1.ड्रायव्हिंग लायसन्स
जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर ५०० रुपयांऐवजी ५००० रुपये दंड द्यावै लागणार आहे. तसेच जर तुम्ही इन्शुरन्सशिवाय गाडी चालवत असाल तर तुम्हाला २००० रुपये दंड आणि/किंवा तीन महिन्यांची तुरुंगवास होऊ शकतो.
2.हेल्मेट
जर तुम्ही हेल्मेट न घालता दुचाकी चालवताना आढळलात तर तुम्हाला १००० रुपये दंड आकारला जाईल. यासोबतच, ड्रायव्हिंग लायसन्स देखील तीन महिन्यांसाठी रद्द केले जाईल. पूर्वी, जर तुम्ही ही चूक केली तर १०० रुपये दंड आकारला जात होता. जर दोन पेक्षा जास्त लोक प्रवास करत असाल तर तुम्हाला १००० रुपये द्यावे लागतील.
3. सीट बेल्ट
सीट बेल्ट न लावता गाडी चालवताना पकडल्यास १००० रुपये दंड आकारला जाईल. यापूर्वी यासाठी १०० रुपयांची तरतूद होती.
4. सिग्नल तोडल्यास
दुसरीकडे तुम्ही सिग्नल तोडलात तर तुम्हाला ५०० रुपयांऐवजी तुम्हाला ५००० रुपये दंड द्यावा लागेल.
5. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणे
जर तुम्ही दारू पिऊन गाडी ड्राईव्ह करत असाल तर १०,००० रुपये दंड आणि ६ महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. पूर्वी हा दंड फक्त १,००० ते १५०० रुपयांच्या दरम्यान होता. जर तुम्ही पुन्हा असे करताना पकडले गेलात तर तुम्हाला १५,००० रुपये दंड आणि २ वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो
6. ट्रिपल रायडिंग, डेंजरस ड्रायव्हिंग आणि रेसिंग
जर तुम्ही गाडीवर ट्रीप सीट जातांना पकडले तर, तुम्हाला १००० रुपये दंड भरावा लागेल. दुसरीकडे, जर तुम्ही डेंजरस ड्रायव्हिंग किंवा रेसिंग करताना पकडले गेले तर तुम्हाला ५००० रुपये दंड भरावा लागेल. दुसरीकडे, रुग्णवाहिकांसारख्या आपत्कालीन वाहनांना रस्ता न दिल्याबद्दल १०,००० रुपयांचा मोठा दंड भरावा लागेल.
7. १८ वर्षांपेक्षा कमी वय
जर मूल १८ वर्षांपेक्षा कमी वयाचे असेल आणि तो वाहन चालवताना आढळला तर त्याला २५,००० रुपये दंड आणि ३ वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. यासोबतच त्या वाहनाची नोंदणी देखील १ वर्षासाठी रद्द केली जाईल. वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाणार नाही.
8., ड्रायव्हिंग करताना फोनचा वापर
जर तुम्ही गाडी चालवताना फोन वापरताना दिसलात तर तुम्हाला ५००० रुपये दंड होऊ शकतो. आधी हा दंड ५०० रुपये होता.
9. ओव्हरलोडिंग
नवीन नियमानुसार, वाहन ओव्हरलोड केल्यास २०,००० रुपये दंड भरावा लागेल.
10. आपत्कालीन वाहनांना रस्ता न देणे
रुग्णवाहिकासारख्या आपत्कालीन सेवांचा मार्ग अडवला तर त्याला १०,००० रुपये दंड भरावा लागेल.
तर मंडळी वाहतूक नियमात हे बदल करण्यात आले आहेत त्यामुळे रस्त्यावर उतरताना खूप विचार करून उतरा आणि आपल्याकडून कोणतेही चूक होणार नाही याची काळजी घ्या नाहीतर सर्वसामान्य लोकांना खिशाला परवडणार नाही एवढा भुई दंड एक चूक झाली तरी भरावा लागणार आहे.