विधवा पेन्शन योजना २०२५
महाराष्ट्रात महिला व बालविकास विभागामार्फत विधवा पेन्शन योजना राबविण्यात येते. या योजनेद्वारे राज्यातील दारिद्र्यरेषेखालील विधवांना आर्थिक मदत दिली जाते.
महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना राज्यातील आर्थिक दुर्बल विधवा महिलांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केली आहे. या महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातीलं गरीब कुटुंबातील विधवा महिलांना दरमहा ६०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
महिलांच्या पतीच्या मृत्यूनंतर योजनेतून मिळालेल्या पेन्शनमुळे ती स्वतःचे आयुष्य जगू शकेल, तीला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. राज्यातील इच्छुक विधवा महिला ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, तर त्यांना या योजनेंतर्गत अर्ज करावा लागेल. या योजनेंतर्गत राज्यातील विधवा महिलांना शासनाने दरमहा दिलेली रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
चला तर हे जाणून घेऊयात या योजनेसाठी पात्रता काय आहे कागदपत्रे कोणती लागतात आणि फॉर्म कसा भरावा.
विधवा पेन्शन योजना २०२५ ची उद्दिस्टे काय आहे
पतीच्या निधनानंतर महिला आर्थिक दृष्ट्या दुर्बल होऊन जाते त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हे महाराष्ट्र राज्य सरकार चे प्रमुख उद्दिष्ट योजनेचे प्रमुख उद्दिष्टे आहे.
र्आजदारास आर्थिक मदत मिळाल्यामुळे ती कुणावरही अवलंबून राहत नाही यातून तिची सक्षमीकरण होते.
आर्थिक दृष्ट्या महिलेला स्वावलंबी बनवायची बनवणे हे या योजनेच्या प्रमुख उद्देश आहे.
योजनेतून मिळालेल्या पैशातून वृद्ध महिला देखील स्वावलंबी जीवन जगू शकतात व आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या गरजा भागवू शकतात.
महाराष्ट्र विधवा निवृत्तीवेतन योजनेसाठी पात्रता काय?
1. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवासी असावा.
2. अर्जदार महिलेचे वय ६५ वर्षांपेक्षा कमी असावे.
3. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. २१,००० पेक्ष्या जास्त नसावे.
4. अर्जदाराचे बँक खाते असले पाहिजे आणि बँक खाते आधार कार्डाशी संलग्न असणे गरजेचे आहे.
5. दारिद्रय रेषेखालील सर्व विधवा महिला योजनेसाठी अर्ज करू शकतात.
विधवा पेन्शन योजना नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
1. अर्जदार महिलेचे आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र
रेशन कार्ड., उत्पन्नाचे दाखला., बँक खाते पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो , मोबाइल नंबर
वय प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जाती जमातीची असल्यास), पती मृत्यू प्रमाणपत्र
तर ही सर्व कागदपत्रे फॉर्म भरताना लागतील.
विधवा पेंशन योजना ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ते पाहूया.
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्र सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
“ऑनलाइन अर्ज करा” वर क्लिक करा : वेबसाइटच्या होमपेजवर उपलब्ध असलेल्या “ऑनलाइन अर्ज करा” लिंकवर क्लिक करा.
नोंदणी/लॉग इन करा : तुम्ही प्रथमच वापरकर्ते असाल, तर तुम्हाला तुमची माहिती जसे की नाव, संपर्क क्रमांक आणि ईमेल पत्ता टाकून वेबसाइटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. तुम्ही विद्यमान वापरकर्ता असल्यास, तुम्ही तुमचे वापरकर्तानाव आणि पासवर्ड वापरून थेट लॉग इन करू शकता.
: सर्व आवश्यक तपशील जसे की वैयक्तिक तपशील, संपर्क माहिती, बँक खाते तपशील आणि इतर आवश्यक तपशीलांसह ऑनलाइन अर्ज भरा. प्रदान केलेली माहिती बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी.
ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, बीपीएल कार्ड, वयाचा पुरावा, पतीचा मृत्यू प्रमाणपत्र आणि अलीकडील पासपोर्ट आकाराचे फोटो यासारखी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
सर्व आवश्यक तपशील भरल्यानंतर आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, अर्ज सबमिट करा.
अर्ज सादर केल्यानंतर, संबंधित अधिकारी अर्जामध्ये दिलेल्या कागदपत्रांची आणि माहितीची पडताळणी करेल.
अर्ज मंजूर झाल्यास, निवृत्ती वेतनाची रक्कम अर्जदाराने दिलेल्या बँक खात्यात मासिक आधारावर जमा केली जाईल.
तर तुम्ही अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज भरू शकता.
महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेसाठी ऑफलाइन अर्ज कसा करावा ते पाहू
ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, बीपीएल कार्ड, वयाचा पुरावा, पतीचा मृत्यू प्रमाणपत्र, बँक खात्याचे तपशील आणि अलीकडील पासपोर्ट आकाराचे फोटो यासारखी सर्व आवश्यक कागदपत्रे गोळा करा.
जवळच्या समाज कल्याण कार्यालयाला किंवा ग्रामपंचायत कार्यालयाला भेट द्या आणि महाराष्ट्र विधा पेन्शन योजनेसाठी अर्ज मागवा.
सर्व आवश्यक तपशील जसे की वैयक्तिक तपशील, संपर्क माहिती, बँक खाते तपशील आणि इतर आवश्यक तपशीलांसह अर्ज भरा. भरलेली केलेली माहिती बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी.
सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडा.
आवश्यक कागदपत्रांसह अर्ज संबंधित प्राधिकरणाकडे जमा करा. तुम्हाला अर्जाची पोचपावती मिळेल.
अर्ज सादर केल्यानंतर, संबंधित अधिकारी अर्जामध्ये दिलेल्या कागदपत्रांची आणि माहितीची पडताळणी करेल.
अर्ज मंजूर झाल्यास, निवृत्ती वेतनाची रक्कम अर्जदाराने दिलेल्या बँक खात्यात मासिक आधारावर जमा केली जाईल.
तर अशाप्रकारे तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरू शकता.
तर मंडळी तुम्ही अशा प्रकारे अर्ज करुन लाभ घेऊ शकता.