शरद पवारांची तीन वेळेस पंतप्रधान होण्याची संधी का हुकली ?
देशाच्या राजकारणात सगळ्यात जास्त काळ काम केलेले नेते म्हणून सध्या शरद पवारांच नाव घेतलं जात. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्या पिढी पासून आजपर्यंत ते सक्रीय राजकारणात आहेत. बारामती येथील एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात शरद पवार यांचा जन्म झाला.
त्यांनी पुणे येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतले, जिथे त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केली. तिथे असताना ते विद्यार्थी राजकारणात सक्रिय झाले. शरद पवार हे शिक्षण घेत असतानाच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (काँग्रेस पक्ष) च्या युवा शाखेत सामील झाले आणि १९६४ मध्ये त्यांचे अध्यक्ष झाले.
यशवंतराव चव्हाण हे शरद पवार यांचे गुरु होते.
1967 मध्ये वयाच्या 27 व्या वर्षी शरद पवारांचे राजकीय गुरू यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना पहिल्यांदा बारामती मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीत उतरवलं.
शरद पवार 27 व्या वर्षी पहिल्यांदा आमदार झाले आणि पुढे चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही झाले. पन्नास वर्षांच्या सक्रिय राजकारणात त्यांनी देशाचं संरक्षणमंत्रिपद आणि कृषीमंत्रिपदही भूषवलं. परंतु शरद पवारांचे एक स्वप्न राहूनच गेले ते म्हणजे पंतप्रधान होण्याचे.
त्यांना एकदाही देशाचे पंतप्रधान होता आले नाही. एकदा अजित पवार ही असे म्हणाले होते की शरद पवारांना दोन ते तीन वेळा पंतप्रधान होण्याची संधी होती. मात्र काँग्रेस पक्षामुळे ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत.
त्यावेळी अजित पवारांनी अशी देखील सांगितले होते की आम्ही 48 पैकी 38 खासदार म्हणून निवडून गेलो होतो तेव्हा मी पवार साहेबांना पाठिंबा दिला होता परंतु त्यावेळी इतर राज्यातल्या खासदारांनी नरसिंहराव यांना पाठिंबा दिला होता.
त्यामुळे त्यावेळेस नरसिंहराव यांना पंतप्रधान करण्यात आले तर शरद पवारांना संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती.
त्यामुळे शरद पवारांना पंतप्रधान का होता आले नाही?
एवढा वर्षांचा काळ राजकारणात असतांना देखील आज पर्यंत ते पंतप्रधान पदाला गवसणी का घालू शकले नसतील? नेमक त्यांना या पदापासून दूर का राहावं लागलं?
शरद पवारांची तीन वेळेस पंतप्रधान होण्याची संधी का हुकली ?
शरद पवार यांचे निर्णय कुठे चुकले ? याबाबत सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
मुद्दा क्रमांक १) शरद पवारांची पंतप्रधान होण्याची पहिली संधी कशी हुकली ?
1978 साली पावसाळी अधिवेशन सुरू झालं आणि या अधिवेशनात वसंतदादांच्या सरकारमध्ये उद्योगमंत्री असलेल्या शरद पवार यांनी सुशीलकुमार शिंदे, दत्ता मेघे आणि सुंदरराव सोळंके या मंत्र्यांसह एकूण 38 आमदारांना घेऊन भर अधिवेशनात बंडखोरी केली आणि दादासाहेब रुपवते यांच्या नेतृत्वात ‘समांतर काँग्रेस’ असा नवा गट स्थापन केला. या बंडखोरीने वसंतदादांचं सरकारच अल्पमतात आलं आणि ते पडलं.
त्यानंतर जनता पक्षानं (99 जागा) शरद पवारांच्या समांतर काँग्रेसला पाठिंबा दिला आणि त्यांची विधिमंडळ नेतेपदी निवड केली. पवारांनी तत्कालीन राज्यपाल सादिक अली यांची 18 जुलै 1978 रोजी भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला.
त्याच दिवशी म्हणजे 18 जुलै 1978 रोजी शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि वयाच्या 38 वर्षी शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत विराजमान झाले. ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले.
दांडगा जनसंपर्क, आंदोलनांमधून तयार झालेले नेतृत्व गुण आणि राजकीय उद्दिष्ट ठरवून त्याकडे एकमार्गी वाटचाल करण्याची वृत्ती यामुळे देशपातळीवर पोहोचायला शरद पवारांना वेळ लागला नाही.
1991 मध्ये राजीव गांधी यांच्या हत्या झाली.
त्यामुळे 1991 मध्ये राजीव गांधींच्या हत्येनंतर काँग्रेस पक्षाला खंबीर नेतृत्व नव्हतं.
सोनिया गांधी राजकारणात यायला इच्छूक नव्हत्या.
त्यामुळे पक्षाला सावरेल असा मोठा नेता पक्षाकडे नव्हता. शरद पवार हे राजकारणात चांगले माहीर झाले होते.
राजीव गांधींनंतर शरद पवार काँग्रेसला पन्हा उभारी देतील अशीही काही काँग्रेस नेत्यांची मागणी होती आणि म्हणून त्यांच्या नावाची चर्चाही झाली.
पण काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले ते म्हणजे नरसिंहराव.
खरं तर त्यावेळी नरसिंह राव दिल्लीहून पुन्हा हैदराबादला जाण्यासाठी इच्छुक होते पण त्यांची समजूत घालून त्यांना पंतप्रधानपदही दिलं गेलं आणि शरद पवारांसमोर आलेली पहिली संधी अशी गेली. पण पवारांच्या गटानंही प्रयत्न केले, त्यांचे दोन मुद्दे होते.
नरसिंह राव काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले. पण, अध्यक्षानेच पंतप्रधान व्हावं असा नियम नाही. दोन्ही पदं आणि त्यांची कामं वेगवेगळी आहेत, असा प्रचार शरद पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी पक्षांतर्गत केला. महाराष्ट्रातून काँग्रेसचे तब्बल 39 खासदार निवडून गेले होते. हा आकडा इतर राज्यांपेक्षा कितीतरी मोठा होता.
या मुद्यांवर इतर काँग्रेस नेत्यांची सहमती घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण त्याला पक्षातून हवा तसा पाठिंबा मिळाला नाही. नरसिंह रावांच्या मंत्रिमंडळात ते संरक्षणमंत्री झाले. पण मुंबईत उसळलेल्या जातीय दंगलींनंतर महाराष्ट्रातली परिस्थिती हाताळण्यासाठी पंतप्रधान नरसिंह राव यांनी पवारांना पुन्हा महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून पाठवलं.
परंतु असं सांगितलं जाते की या सर्व गोष्टींना कारणीभूत ठरली ती एक व्यक्ती ती म्हणजे प्रणव मुखर्जी
प्रणव मुखर्जी आणि शरद पवार हे मित्रच होते. पण त्यांचा पवारांवर पूर्ण विश्वास नव्हता. याउलट नरसिंह राव काँग्रेसचे जुने जाणते आणि अनेक भाषा येणारे नेते होते. त्याचा फायदा त्यांना सगळ्या राज्यांतल्या नेत्यांना एकत्र ठेवण्यात होईल, असं प्रणव मुखर्जी यांना वाटलं. उलट शरद पवारांना इतर राज्यातील नेत्यांकडून कसा पाठिंबा मिळेल याबद्दल केंद्रातले नेते साशंक होते. त्यामुळे प्रणव मुखर्जी यांनी आपली सगळी ताकद नरसिंह राव यांच्या पाठीशी लावली.
राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर आणि सोनिया गांधी सक्रिय राजकारणात यायला तयार नसताना गांधी व्यतिरिक्त इतर व्यक्तीने काँग्रेसचं नेतृत्व करण्याची ती पहिली वेळ होती आणि त्यात उत्तरेतील नेत्यांना सावधगिरी बाळगायची होती.
‘शरद पवारांना दूर ठेवण्याचं आणखी एक कारण होतं. पवारांची महत्त्वाकांक्षा सगळ्यांना माहीत होती. त्यांना पंतप्रधान पद दिलं तर पक्ष कार्यकारिणीचं ते ऐकणार नाहीत आणि स्वत:चं राज्य चालवतील अशीही भीती केंद्रीय नेत्यांना होती.
काँग्रेस नेत्यांच्या या मानसिकतेमुळे झालं असं की, शरद पवार हे नरसिंह राव यांच्याविरोधात पक्षाध्यक्षपदाची निवडणूकही लढले नाहीत आणि पंतप्रधान म्हणूनही त्यांची निवड झाली नाही.
मुद्दा क्रमांक २) शरद पवार यांची पंतप्रधान होण्याची दुसरी संधी कधी आणि कशी हुकली?
जेव्हा शरद पवार हे प्रमुख विरोधी पक्ष नेते असतांना देखील त्यांची पंतप्रधान होण्याची संधी हुकली.
1996 मध्ये शरद पवारांना पंतप्रधान होण्याची पुन्हा एकदा संधी होती. 1996 मध्ये काँग्रेसनं 145 जागांवर विजय मिळवला.
देवेगौडा, लालू प्रसाद यादव, मुलायम सिंह यादव आणि डावे पक्ष शरद पवारांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबाही देऊ इच्छित होते. पण नरसिंह रावांनी इच्छुक नव्हते. मग काँग्रेसनं देवेगौडांच्या सरकारला बाहेरून पाठिंबा दिला.
कारण शरद पवार यांच्यावर संधीसाधू राजकारण केल्याचा आरोप झाला होता.
25 जून 1975 रोजी इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली. त्यानंतर देशभर एकच गदारोळ सुरू झाला. धरपकड झाली. मोठमोठी आंदोलनं झाली. अखेर 21 मार्च 1977 रोजी आणीबाणी मागे घेण्यात आली आणि देशात निवडणुका झाल्या, ज्यात इंदिरा गांधींचा दारूण पराभव झाला.
आणीबाणीमुळे आधीच काँग्रेसअंतर्गतही धुसफूस होती. आणीबाणीनंतर ही धुसफूस उफाळूनच आली. काँग्रेस फुटण्यात याची परिणिती झाली. ब्रह्मानंद रेड्डी-यशवंतराव चव्हाण हे एका गटाचे, तर इंदिरा गांधी एका गटाच्या प्रमुख झाल्या.
महाराष्ट्रातील वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, शरद पवार ही मंडळी यशवंतराव चव्हाणांच्या बाजूनं राहिले, तर नासिकराव तिरपुडे, रामराव आदिक वगैरे मंडळी इंदिरा गांधींसोबत गेले.
त्यानंतर 1998 च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठं यश मिळालं आणि त्याच जोरावर शरद पवार लोकसभेचे विरोधी पक्षनेते झाले. पण 1999 ला काँग्रेसमधील घराणेशाहीचा निषेध करत आणि सोनिया गांधींच्या परदेशी मूळाला विरोध करत पवारांनी काँग्रेस पक्षाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती केली.
मुद्दा क्रमांक ३ ) शरद पवारांची तिसऱ्यांदा संधी कधी हुकली?
२००९ साली, कुठल्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही असे दिसत असतांना समाजवादी पक्षासोबत हातमिळवणी करून तिसरी आघडी स्थापन करण्याची हालचाल पवार यांनी चालू केली होती आणि तेच पंतप्रधान पदाचे उमेदवार होते, पण तेव्हा कांग्रेस ने २०० चा टप्पा पार केला आणि पुन्हा एकदा शरद पवार यांची पंतप्रधान होण्याची संधी हुकली.
पुलोद पासून शरद पवार यांचा प्रवास बघितला तर त्यांचं राजकारण धरसोडीचं आहे. जेव्हा जेव्हा त्यांना सत्ता हवी असते ते कुठल्याही पक्षाशी युतीसाठी तयार होतात. आताही एकीकडे ते विरोधी पक्षांची मोट बांधतात. त्याचवेळी नरेंद्र मोदींची भेट घ्यायलाही ते कचरत नाहीत. यातून त्यांची विश्वासार्हता कमी होते,’
कदाचित या सर्व गोष्टींमुळेच शरद पवार यांची तीन वेळेस पंतप्रधान होण्याची संधी हुकली.
आणि त्यामुळे शरद पवार यांचा एक चांगलं स्वप्न हे अपुरेच राहिले आहे.