शरीर सुखाची मागणी, कटरने वार, गोधडीसारखं अंग शिवण्याची वेळ, 280 टाके छ. संभाजीनगरची हादरवणारी घटना

सध्या महाराष्ट्रामध्ये महिलांचे शोषण कमी होण्याचं काही दिसत नाही.

दररोज एक नवीन घटना समोर येत आहे.
पुण्यातील प्रकरण थांबण्याचं नाव घेत नाही तोच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये संतापजनक घटना घडली आहे.
एका१९ वर्षीय तरुणाने 36 वर्षीय महिलेला शरीरसुखाची मागणी केली. तिने त्याला नकार दिला म्हणून तिच्यावर कटर ने वार करण्यात आले.
ते वार इतके भयंकर आहेत की सुई ने आपण जशी गोधडी शिवतो तशी डॉक्टरला महिलेची बॉडी शिवावा लागली.
चला तर पाहूया नक्की घडलंय काय ?
नमस्कार मी पिके भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो.
पाहूया छत्रपती संभाज नगर मध्ये घडलेली घटनेची इनसाइड स्टोरी
भावकीतीलच 36 वर्षांच्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी 19 वर्षांच्या तरुणाने केली. तिने नकार दिला त्याच्या रागातून नराधमाने तिच्या शरीरावर कटरने सपासप वार केले. त्यामुळे तिच्या अंगावर तब्बल 280 टाके घालावे लागलेत. तिच्या मानेपासून ते कमरेपर्यंत सव्वादोन फुटांचा एक वार आहे. भयंकर वेदना सहन करत ही महिला एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. घरातील परिस्थिती जेमतेम आहे. त्यांना 11 वर्षांची दोन मुलं आहेत. सासरप्रमाणेच त्यांच्या माहेरची परिस्थितीही हलाखीची आहे. पीडितेवर उपचार करण्यासाठी आता जो खर्च येईल त्यासाठी त्यांकडे पुरेसे पैसेही नाहीत. पिडीतेच्या अंगावर 280 टाके पडले आहेत, यासाठी लागणाऱ्या दोऱ्यांचा खर्चच 22 हजार इतका आला आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना पिडीतेने ही माहिती दिली आहे.
अंगावरती झालेल्या भयंकर वेदना सहन करत पिडित महिला एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. अभिषेक तात्याराव नवपुते (वय 19 वर्षे) असं आरोपीचे नाव आहे. या घटनेनंतर संपूर्ण गावभर काही घडलंच नाही, अशा आविर्भावात वावरत होता. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा साधा लवलेशही दिसत नव्हता.पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे
रविवारी 2 तारखेला दुपारी पीडित महिला शेतात काम करत असताना आरोपी अभिषेकने तिला फोन केला . तो फोनवरती म्हणाला, एक तर तू माझ्याबरोबर झोप, नाही तर तुझ्या जावेशी माझं जुळवून दे…हे ऐकून पीडितेला खूप राग आला. तिने फोन कट केला. संध्याकाळी ती शेतातली काम संपवून पांदीच्या रस्त्याने ती एकटीच जात असताना अचानक पाठीमागून येऊन त्याने तिची वेणी खेचली आणि डोकं दगडावर आपटलं. तिला काही समजण्या आधी त्याने पहिल्यांदा कटरने तिच्या तोंडावर वार केला. तिने ओरडायचा प्रयत्न केला तर त्याने तिच्या गळ्यावर वार केला. यामध्ये तिचे कपडे देखील फाटून गेले. वार केल्यावरती तिचं रक्त काही थांबत नव्हतं. त्यातच त्याने मोठा दगड उचलला आणि तिच्या अंगावर मारला. दुसरा दगड तिच्या तोंडावर मारला आणि तिच्या डोळ्यांसमोर अंधारी आली.
शुद्धीत आल्यानंतर तिचा डोळा उघडत नव्हता. थोड्या वेळानं लक्षात आलं की दोन्ही हाताला सलाइन लावलेलं होतं. तिने एक डोळा उघडायचा प्रयत्न केला. पण अंगभर सुरू झालेल्या ठणक्यामुळे डोळ्यातून पाण्याची धार लागली. पाणी जखमेला लागल्यावर तर आग जास्त भडकली, अशी आपबिती पिडितेने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीवेळी सांगितली आहे.
पिडितेने या घटनेबाबत माहिती दिली, तिला होणाऱ्या यातना, शारीरीक आणि मानसिक त्रास हे एकून अंगावर काटा येतो. माझ्यावर त्यानं इतके वार केले आहेत की, डॉक्टरला गोधडीवानी माझं अंग शिवावं लागलं. हे टाके शिवण्यासाठी नुसता दोराच 22 हजार रुपयांचा लागला आहे. एकही अवयव असा नाहीये की जिथे फाडलेलं नाहीये. त्या घावांमुळे सगळ्या अंगातच आगडोंब उठला आहे. या यातना सहन होत नाही, पण रडताही येत नाही. कारण, डोळ्यातून आलेलं पाणी टाके शिवलेल्या जखमेला लागलं तर आणखीच आग मारते. आता मी करू तरी काय ? असं ती पिडित महिला म्हणत आहे.
तर मंडळी दररोज महिल्यांवरती कोठे ना कोठे अत्याचार होत आहे. अशा अत्याचार करणाऱ्या नराधमांना कोणती शिक्षा झाली पाहिजे हे आम्हाला कमेंट्स करून कळवा

By satta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *