लोकसभा निवडणुकीच्या नंतर सध्या वारे वाहू लागले आहे ते म्हणजे विधानसभा निवडणुकीचे. आता गावागावात चर्चा पहिल्या भेटतात त्या म्हणजे फक्त विधानसभा निवडणुकीचे . चला तर मग आज आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाबद्दल
हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. शिरूर विधानसभा मतदारसंघ क्रमांक १९८  आहे.  शिरूर मतदारसंघात पुणे जिल्ह्याच्या १. शिरुर तालुक्यातील न्हावरे, वडगांव रासाई आणि तळेगांव ढमढेरे ही महसूल मंडळे आणि शिरुर महसूल मंडळातील शिरुर सझा आणि करंजवणे सझा आणि शिरुर नगरपालिका, २. हवेली तालुक्यातील वाघोली आणि उरळी कांचन ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. शिरूर हा विधानसभा मतदारसंघ शिरुर लोकसभा मतदारसंघात मोडतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अशोक रावसाहेब पवार हे शिरूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अशोक पवार यांच्याविरुद्ध भाजप पक्षाचे बाबुराव पाचरणे अशी लढत झाली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अशोक रावसाहेब पवार 1,45,131 मते मिळवून विजयी झाले. भाजपा पक्षाचे बाबुराव काशीनाथ पाचरणे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयाचे अंतर: 41,504 मते एवढे होते.2014 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे बाबुराव काशीनाथ पाचरणे 92,579 मते मिळवून विजयी झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अशोक रावसाहेब पवार यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती.
 शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलायचे झाले तर शिरूर हवेली हा विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा.  परंतु आमदार बाबुराव पाचरणे यांना कायम विरोधात उभे राहत आले ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अशोक पवार. परंतु 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर माजी आमदार बाबुराव पाचरणे यांचे निधन झाले.  त्यामुळे सगळीकडे एकच चर्चा होऊ लागली ते म्हणजे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या विरोधात महायुतीकडून उभे राहण्यासाठी बाबुराव पाचवणे यांच्यासारखा तगडा उमेदवार कोण ? कारण बाबुराव पाचरणे यांचा शिरूर विधानसभा मतदार संघ येथे चांगला जनसंपर्क होता. परंतु त्यांच्या निधनानंतर महायुतीमध्ये आता त्यांची पोकळी निर्माण झाली आहे. परंतु महायुतीमधून तिकीट मिळवण्यासाठी येथे भरपूर जण इच्छुक असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
त्यामुळे आता शिरूर हवेली मतदारसंघांमध्ये येथे वेगवेगळ्या संस्थांकडून संपूर्ण मतदारसंघाचा सर्वे करणे मतदारसंघातील आपल्या नव्या जुन्या कार्यकर्त्यांबरोबर वेगवेगळ्या कार्यक्रमांना आवर्जून भेट देणे तसेच विविधतेत क्षेत्रांच्या मोफत यात्रा आयोजित करणे अशी जोरदार तयारी शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघांमध्ये चालू आहे. महाविकास आघाडी कडून अशोक पवार यांचे नाव हे जवळपास फिक्स आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर लगेचच अशोक पवार यांनी शिरूर हवेली मतदारसंघात आपला आणखी जनसंपर्क वाढवण्यासाठी प्रयत्न चालू केला आहे.  तसेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्या उमेदवार अमोल कोल्हे हे भरघोस मतांनी येथून निवडून आलेले आहेत. त्यामुळे शिरूर हवेली या विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्यातरी सहानभूतीचे वारे आहेत ते म्हणजे महाविकास आघाडी कडून. परंतु महायुतीकडून शिरूर हवेली या विधानसभा मतदारसंघांमध्ये चांगला चेहरा उमेदवार म्हणून महायुतीकडून उभा करण्यात आला तर इथे चांगली अति तटीची लढत होऊ शकते.
तर आता इथे महायुतीकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद हे जोरदार तयारी करताना दिसत आहेत.  तसेच येथे माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके व घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादा पाटील फराटे या उमेदवारांबरोबरच शांताराम कटके हे ही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.  तसेच यातील प्रत्येक उमेदवाराने आपल्या परीने आता शिरूर हवेली मतदारसंघांमध्ये विविध कामे तसेच आधी सांगितल्याप्रमाणे तीर्थ यात्रा करणे,  यांच्या माध्यमातून आपल्या जनसंपर्क वाढवणे ह्या सर्व गोष्टी चालू केले आहेत. शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे शिरूर आणि हवेली असे दोन तालुके एकत्र येऊन हा विधानसभा मतदारसंघ बनला आहे परंतु आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये जास्त करून शिरूर तालुक्यातील उमेदवाराने येथे आपली राजकीय धुरा टिकवलेली दिसते.  त्यामुळे शिरूर हवेली या विधानसभा मतदारसंघांमध्ये शिरूर तालुक्याचे वर्चस्व कायम राहिलेले दिसते.
परंतु आता येणाऱ्या आगामी विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीकडून जे काही उमेदवार इच्छुक आहेत ते सर्व हवेली या तालुक्यातील उमेदवार जास्त करून इच्छुक आहेत. त्यामुळे आता जरीही ही शिरूर हवेली अशी विधानसभा निवडणूक असली तरीही ही तसे पाहिले तर शिरूर तालुका आणि हवेली तालुका अशी ही लढत पाहायला मिळणार आहे.  येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये हवेली तालुक्यातील उमेदवार हा आमदार म्हणून कसा पुढे येईल यासाठी जास्त प्रयत्न करताना दिसणार आहेत. तर मंडळी तुम्हाला शिरूर हवेली तालुक्याचा आमदार कोण होईल असं तुम्हाला वाटत हे आम्हाला कमेंट करून सांगा.

By satta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *