शिर्डी म्हंटले की पहिले आठवते ते म्हणजे साईबाबा. जगभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेला शिर्डीचे साईबाबा. आज आपण पाहणार आहोत शिर्डी या विधानसभा मतदार संघाबद्दल. २०१९ शिर्डी हा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. शिर्डी हा विधानसभा मतदारसंघ हा राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला. 2019 मध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांची पुत्र सुजय विखे पाटील यांच्या लोकसभा निवडणुकीनंतर 2019 मध्ये भाजप या पक्षात प्रवेश केला. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप पक्षात प्रवेश का केला याचा इतिहास तर सर्वांना माहीतच आहे. चला तर पाहूया शिर्डी या विधानसभा मतदारसंघ याचा इतिहास कसा आहे?
1995 पासून ते आजपर्यंत राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघात विजय मिळविला असून पाच निवडणुकांपैकी एकदाच 2009 साली विखेंच्या मताधिक्य कमी झाले होते. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आजवर प्रथम काँग्रेस शिवसेना परत काँग्रेस आणि आता 2019 नंतर भाजप असा राजकीय प्रवास केला आहे परंतु यांच्या या राजकीय प्रवासा चा परिणाम यांच्या मतावर कधीच झाला नाही. कारण राधाकृष्ण विखे पाटील कोणत्याही पक्षात असू द्या शिर्डीकरांना त्याचा फरक पडत नव्हता. शिर्डी करांचा एकच ठरलेलं होतं. राधाकृष्ण विखे पाटील कोणत्याही पक्षात जाऊ आम्ही मत देणार ते फक्त त्यांनाच. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांचे शिर्डी या विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व टिकून होतं. परंतु नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बाळासाहेब वाकचौरे यांनी महायुतीचे सदाशिव लोखंडे यांचा तब्बल 50 हजार लिडने पराभव केला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राधाकृष्ण विखे यांच्या मतांवरती काही परिणाम होणार का? असा प्रश्न आता सर्वांनाच पडू लागला आहे.
चला तर पाहूया येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिर्डी या विधानसभा मतदारसंघांमध्ये नक्की काय चालू आहे.
शिर्डी विधानसभा मतदारसंघ क्रमांक २१८आहे . शिर्डी मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्यातील १. संगमनेर तालुक्यातील आश्वी महसूल मंडळ आणि २. राहाता तालुक्यातील राहाता, राजुरी, लोणी ही महसूल मंडळे आणि शिर्डी व राहाता पिंपळास नगरपालिकेचा समावेश होतो. शिर्डी हा विधानसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघात मोडतो. भारतीय जनता पक्षाचे राधाकृष्ण एकनाथराव विखे-पाटील हे शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. 1995 पासून शिर्डी येथे फक्त आणि फक्त राधाकृष्ण विखे पाटील हेच निवडून येत आहेत. मतदार संघातील बहुतांश गावात विखे विरोधक नसल्याने विखे समर्थक दोन गटातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या काही वर्षापासून लढवण्यास गेल्या आहे. 2014 च्या निवडणुकीत देशात व राज्यात मोदी लाट असतानाही राधाकृष्ण विखे पाटील कॉंग्रेसच्या तिकीटावर 75 हजार मतांनी विजयी झाले होते. 2019 च्या निवडणुकीआधीच विखे पाटलांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपची वाट धरली. त्यांच्या या अशा निर्णयाने जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात बदल झालेले दिसले. कारण आघाडीच्या काळातही विखे पाटील यांच्याकडे अनेक महत्त्वाचे खात्यांचा कारभार होता. तरीदेखील राधाकृष्ण विखे पाटील हे आपल्या मुलाच्या राजकीय करिअरसाठी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला.
त्यामुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये नक्की काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु चिन्ह बदलूनही भाजपच्या तिकिटावर काँग्रेसच्या सुरेश थोरात यांचा तब्बल 69 हजारांच्या लीडने दारून पराभव केला .यानंतर शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर विखे पाटील यांना महसूल खात्याचा कारभार देण्यात आला . परंतु नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघांमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांचा पराभव निलेश लंके यांनी केला. तसं पाहायला गेलं तर विखे घराणे हे खूप राजकारणातील खूप मजबूत घराणं असं मानलं जातं. परंतु नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत विखे घराणे यांच्या विरोधात त्यांचे विरोधक एकत्र आले आणि हे सर्व बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राजकारण झाले. या सर्व गोष्टींमुळे लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटलांचा पराभव झाला. तसं पाहिलं तर हा निकाल सर्वांना आश्चर्यचकित करणार होता. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे विखे पाटलांच्या पुत्राचा पराभव झाल्यानंतर आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचा असलेला बालेकिल्ला शिर्डी तरी वाचू शकतील का?
चला तर पाहूया विखे पाटील या घराण्याची सुरुवात राजकारणात कशी झाली? विखे घराण्याची राजकारणाची सुरुवात झाली ती म्हणजे विठ्ठलराव विखे यांच्यापासून. महाराष्ट्र राज्यात पहिला सहकारी साखर कारखाना त्यांनी सुरू केला. त्यानंतर त्यांनी अहमदनगर जिल्ह्यामध्ये व शिर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये आपला वट तयार केला. विठ्ठलराव विखे यांच्यानंतर राधाकृष्ण विखे आणि आता त्यांचे पुत्र सुजय विखे यांची जोडी अहमदनगर जिल्ह्यावर ती राजकारण करत होती. प्रवरानगर सहकारी साखर कारखाना आणि त्यानंतर सुरू झालेला संस्थात्मक राजकारणाचा प्रवास यामुळे शिर्डीत फक्त आणि फक्त विखे असं समीकरण पाहायला भेटत होते. राधाकृष्ण विखे पाटील हे सलग सात टर्म या मतदारसंघात आमदार राहिलेले आहे. शिर्डी या विधानसभा मतदारसंघांमध्ये असे होते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्ष बदलला किंवा भूमिका बदलली तरी त्यांच्यासोबत एक हक्काचा मतदार नेहमीच कायम त्यांच्यासोबत होता. त्यामुळे विखे पाटील सर्वकाही येथे कोणता पक्ष कोणती भूमिका याचा काही फरक पडत नव्हता. राधाकृष्ण विखे पाटील यांना विरोधकांनी खूप वेळा आव्हान दिले परंतु राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर सर्वांचे पत्ते कट झाले त्यामुळे सर्वजण फेल ठरत होते. त्याचं कारण असं आहे राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतःचा मूळ गाभा खूपच स्ट्राँग तयार केला आहे म्हणजेच संस्थात्मक राजकारणात जिल्ह्यात विखे पाटलांची बरोबरी कोणीच करू शकत नाही.
विखे पाटील यांनी प्रवरा सहकारी साखर कारखाना, मुळा-प्रवरा वीज सहकारी संस्था, प्रवरा बॅंक, प्रवरा फळे व भाजीपाला उत्पादक संस्था, प्रवरा मेडिकल ट्रस्ट, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरा ग्रामीण नैसर्गिक-सामाजिक अध्ययन संस्था, साईबाबा संस्थान आदींच्या विविध पदांवर काम करताना उल्लेखनीय काम केलेलं आहे. रशिया, चिन, अमेरिका, इंग्लड, फ्रान्स, अशा अनेक देशांचे दाैरे करून शेतकऱ्यांसाठी, नवीन शिक्षणाबाबत अनेक तंत्रज्ञान आणले. राज्याचे कृषी व पणनमंत्री असताना त्यांनी केलेली कामे राज्याच्या आठवणीत आहेत. काॅंग्रेसमध्ये असताना विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेतेपद त्यांना मिळाले. त्या काळात त्यांनी भाजपवर अनेक प्रश्नांवर टीका केली. परंतु ती अत्यंत अभ्यासूपणे मांडली. प्रशासन आणि राजकारणाचा दांडगा अनुभव असल्याने शिर्डीची जनता त्यांच्या बाजूने नेहमीच चांगला कौल देत आली आहे. परंतु आता येणाऱ्या काळामध्ये लोकसभा निवडणुकीत विखे पाटलांचा प्रभाव काहीसा कमी झाल्याचं दिसत आहे. त्यांच्या बालेकिल्ला असणाऱ्या शिर्डी या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा चांगलाच पराभव झालेला पाहायला भेटला.
त्यामुळे आता शिर्डी येथे देखील चित्र बदलण्याचं पाहायला मिळत आहे. म्हणजेच विखे पिता पुत्रांसाठी हा राजकीय काळ अवघड आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये आपण जिंकू असा विश्वास विखे यांना होता परंतु त्यांचा पराभव झाला. त्यामुळे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राधाकृष्ण पाटील यांच्यासाठीही विचार करायला लावणारी बाब आहे. अहमदनगरच्या राजकारणात नवनवीन सत्ता केंद्र तयार होताना दिसत आहेत त्यामुळे विखे पाटलांच्या प्रस्थापित राजकारणाला धक्के लागत आहेत. विखे पाटील यांच्या विरोधात सातत्याने वाढ होत गेली आहे . लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत विखे पाटील यांना हरवायचे असा तह धरून बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या खांद्यावर नेतृत्व घेतला आहे. तसेच शिर्डी या विधानसभा मतदारसंघातूनच स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांकडून विखे पाटील यांची उमेदवारीला जोराचा विरोध होताना दिसत आहे. कारण भाजपमध्ये असलेले राजेंद्र पीपाडा हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी तशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केलेले आहे. त्यामुळे एकंदरीतच विखे पाटलांच्या विरोधात शिर्डी या विधानसभा मतदारसंघांमध्ये वातावरण आहे.
तर शिर्डी हा विधानसभा मतदारसंघ भाजप या पक्षाला गमवायचा नाहीये त्यामुळे भाजप पक्षामधूनच राधाकृष्ण विखे पाटील यांना विरोध होताना दिसत आहे. शिर्डी या विधानसभा मतदारसंघांमध्ये संगमनेर राहता कोपरगाव आणि श्रीरामपूर तालुक्यातील काही गाव एकत्रित येऊन शिर्डी हा विधानसभा मतदारसंघ बनला आहे. त्यामध्ये कोपरगाव येथून स्नेहलता कोल्हे ह्या विखे पाटील यांच्या विरोधात गेलेले आहेत हे सर्वांना माहीतच आहे. मराठा माळी धनगर ही जातीय संख्यांना राजकीय विधानसभेत निर्णय ठरतात लोकसभेला या जातींचा सपोर्ट महाविकास आघाडीच्या बाजूने राहिला आहे तसेच जरांगे हा फॅक्टर देखील महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडला आहे. तसेच पक्ष फुटी नंतर महाविकास आघाडीला मोठी सहानुभूती मिळालेली दिसत आहे. म्हणजेच एकंदरीत महाविकास आघाडीच्या बाजूने सहानुभूतीचे वातावरण आहे त्यामुळे या सर्वांचा एकत्रित विचार केला तर राधाकृष्ण विखे पाटील यांना येणारे आगामी विधानसभा निवडणूक वाटते तेवढी सोपी जाणार नाहीये हे मात्र निश्चित आहे. तसेच आता राधाकृष्ण विखे पाटील यांना शिर्डीतून भाजप तिकीट देणार का आणि जरी तिकीट दिले तरी अंतर्गत असलेल्या राजकारणातील गटबाजीमुळे राधाकृष्ण पाटील यांच्या मतांवर परिणाम होऊ शकतो. तसेच आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी कडून येथे नेमका कोणता चेहरा उभा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर मंडळी विधानसभा मतदारसंघांमध्ये एकंदरीत वातावरण हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात दिसत आहे. त्यामुळे एकंदरीत राधाकृष्ण विखे पाटील यांना येथे धक्का बसेल का असे तुम्हाला वाटते का? तर मंडळी तुम्हाला काय वाटते शिर्डी येथे कोण आमदार व्हावा हे आम्हाला कमेंट्स करून कळवा.