शिवाजी कर्डिले यांना राहुरी मध्ये मोठा धक्का, रावसाहेब चाचा तनपुरे यांनी सोडली साथ


 

राहुरी – पारंपारिक विरोधक रावसाहेब चाचा तनपुरे यांनी शिवाजी कर्डिले यांची साथ सोडलेली आहे आणि ते महाविकास आघाडी मधील काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे तनपुरे यांची ताकद आणखी वाढली आहे.

कोण आहेत चाचा तनपुरे? – ते राहुरी साखर कारखान्याचे संचालक देखील होते, त्याचबरोबर चार ते पाच वेळा राहुरी नगरपालिकेमध्ये नगरसेवक राहिले आहेत, विकास मंडळाचे ते अध्यक्ष आहेत,
2016 मध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात चाचा तनपुरे हे मुख्य विरोधक देखील होते, मात्र प्राजक्त तनपुरेंकडून त्यांचा पराभव देखील झाला होता. थोडक्यातच प्रजाक्त तनपुरे यांचा राहुरी शहरातील मुख्य विरोधक म्हणून चाचा तनपुरे यांच्याकडेच बघितलं जात होतं पण चाचा तनपुरे यांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश यामुळे शिवाजी कर्डिले यांना मोठीच अडचण होणार आहे कारण मतदार संघातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला भाग म्हणजे राहुरी शहर आणि राहुरी शहरातील मुख्य विरोधक हे रावसाहेब चाचा तनपुरे होते. या पक्षप्रवेशावेळी चाचा तनपुरे यांनी स्वतः सांगितले आहे की शिवाजी कर्डिले यांच्या त्रासामुळे त्यांनी काँग्रेस पक्ष प्रवेश केला आहे यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये तनपुरे यांना ही निवडणूक आणखी सोपी झाली आहे आणि कर्डिलें पुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. निवडणुकीच्या ऐन तोंडावर असा मोठा पक्ष प्रवेश हा कर्डिलेंसाठी धोक्याची घंटा आहे असे बोलले जात आहे. मात्र आगामी नगरपालिका निवडणुकांमध्ये चित्र वेगळे दिसेल.


Leave a Comment