शेतकरी ओळख पत्र काढल्याशिवाय PM किसान हप्ता मिळणार नाही?
भारत हा कृषिप्रधान देश आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सरकार नवनवीन योजना आणत आहे.
तर आता शेतकऱ्यांसाठी शेतकरी ओळख क्रमांक किंवा फार्मर आयडी मिळणार आहे.
परंतु आता पी एम किसान सन्माननीय योजनेसाठी या शेतकरी ओळख क्रमांक किंवा फार्मर आयडी लागणार आहे
तसा आता  नवीन नियम लागू करण्यात आला आहे.
पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणिसावा हप्ता हा 24 फेब्रुवारी 2025 रोजी वितरित केला जाणार आहे.
परंतु पीएम किसान सन्मान निधी योजनेचा विसाव्या हप्त्यासाठी काही नवीन नियम व अटी लागू केल्या आहेत.
चला तर पाहूया ह्या नवीन नियम व अटी नक्की काय आहेत.
तसेच शेतकऱ्यांनी  शेतकरी ओळख क्रमांक कसा काढावा? याची देखील माहिती आपण या व्हिडिओतून सविस्तर पाहणार आहोत.
चला तर पाहूया नवीन अट काय आहे?
पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी रोजी वितरीत केला जाणार आहे.
 या हप्त्यासाठी शेतकरी ओळख क्रमांकाची अट लागू होणार नाही.
मात्र 20 व्या हप्त्यापासून शेतकरी ओळखपत्र बंधनकारक होणार आहे.
 नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी, पती-पत्नी आणि 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कुटुंबातील सदस्यांची आधार नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे.
नियमांचे पालन केले नाही तर पीएम किसानचे पैसे मिळवण्यास शेतकरी पात्र ठरणार नाही.
चला तर पाहूया शेतकरी ओळखपत्र काय आहे?
शेतकरी ओळखपत्र हा एक अद्वितीय ओळख क्रमांक आहे.
 जो प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांना दिला जातो आणि हा शेतकरी ओळखपत्र आधार कार्डसारखा आहे.
जो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे.
शेतकरी आयडीमध्ये संबंधित शेतकऱ्याची वैयक्तिक माहिती तसेच त्याच्या शेती, जमीन, पिके आणि इतर शेतीविषयक कामांची माहिती असते.
 शेतकरी आयडीचा उद्देश शेतकऱ्यांचा केंद्रीकृत डेटाबेस राखणे आहे जेणेकरून सरकारी योजनांचे फायदे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचू शकतील.
शेतकरी ओळखपत्र हे एका प्रकारचे सरकारी ओळखपत्र आहे जे शेतकऱ्यांच्या ओळखीचा पुरावा म्हणून वापरले जाते. या कार्डाच्या मदतीने शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येतो, तसेच शेतीसाठी आवश्यक कर्जे आणि अनुदाने मिळवता येतात.
पी एम किसान सन्माननिधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी आता अनिवार्य करण्यात आला आहे.
तसेच पी एम किसान सन्माननिधी साठी आता शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड हे लिंक करावे लागणार आहेत.
यामध्ये पती-पत्नी आणि अठरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या कुटुंबातील सदस्यांची आधार नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
नियमांचे पालन केले नाही तर पीएम किसान सन्मान निधी योजनेची पैसे मिळवण्यास शेतकरी पात्र ठरणार नाही.
चला तर पाहूया शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
आधार कार्ड,  7/12 उतारा, शेत जमिनीचा मालकीचा पुरावा, शेतकऱ्याचे फोटो, बँक खाते तपशील
चला तर पाहूया शेतकरी ओळख क्रमांक कसे काढायचे?
शेतकरी ओळख पत्रासाठी  ऑफलाइन आणि ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारचे अर्ज शेतकरी करू शकतात
महाराष्ट्रात शेतकरी ओळखपत्रासाठी ऑफलाईन अर्ज करण्यासाठी आपल्या स्थानिक कृषी विभागाच्या कार्यालयात जा.
तिथे तुम्हाला शेतकरी ओळखपत्रासाठी अर्ज मिळेल.
अर्जामध्ये आवश्यक माहिती भरा. या माहितीमध्ये तुमचे वैयक्तिक तपशील, शेतजमिनीची माहिती, आणि इतर आवश्यक डेटा असावा.
अर्जाबरोबर आधार कार्ड (कॉपी),  7/12 उतारा, शेत जमिनीचा मालकीचा पुरावा, शेतकऱ्याचे फोटो (पासपोर्ट साइज)
बँक खाते तपशील हे जोडावे.
भरलेला अर्ज आणि कागदपत्रे संबंधित कृषी विभागाच्या कार्यालयात जमा करा.
अर्ज सबमिट केल्यानंतर, तुम्हाला एक स्वीकृती मिळेल, ज्यामध्ये तुमच्या अर्जाची स्थिती ट्रॅक करण्यासाठी क्रमांक दिला जाईल.
संबंधित अधिकारी तुमचा अर्ज तपासून मान्यता देतील.
सर्व माहिती योग्य असल्यास, तुम्हाला शेतकरी ओळखपत्र मिळेल.
शेतकरी ओळख क्रमांक किंवा फार्मर आयडी मिळवण्यासाठी तुम्ही जवळच्या सीएससी केंद्रात जाऊन तुमचा फार्मर आयडी
तयार करून घेऊ शकता.
चला तर पाहूया शेतकरी ओळखपत्रासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?
https://aaplesarkar.mahaonline.gov.in या वेबसाईटवर जा.
या वेबसाईटवर तुम्हाला तुमचे एक प्रोफाइल तयार करावे लागेल त्यासाठी लॉगिन करा.
लॉगिन करून तुमचा एक प्रोफाइल तयार करा.
त्यानंतर ऑनलाइन सेवा शोधामध्ये जाऊन शेतकरी असल्याचा दाखला याठिकाणी क्लिक करा.
 यानंतर तुम्हाला विचारलेली आवश्यक माहिती भरा.
आता तुम्हाला तुमचे सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील.
यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करावा लागेल आणि पावती डाउनलोड करावी लागेल.
चला शेतकरी ओळखपत्राचे फायदे जाणून घेऊ
1. शेतकरी ओळखपत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना पिक विमा, कर्ज माफी, सिंचन सुविधा यासारख्या विविध सरकारी योजनांमध्ये प्रवेश मिळतो.
2. खत, बी-बियाणे, औषधे यावर विशेष अनुदाने मिळतात.
3.सरकारी पातळीवरून शेतकऱ्यांना सिंचन सुविधा पुरवण्यासाठी सुलभता होते.
4. अल्प व्याज दरावर कर्ज सुविधा उपलब्ध होते
तर मंडळी तुम्ही जर शेतकरी असाल तर लवकरात लवकर आपला शेतकरी ओळख पत्र क्रमांक काढून घ्या .

By satta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *