नुकतच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसतोय ना तोच आता वारे वाहू लागले आहे ते म्हणजे विधानसभा निवडणुकींचे. अजून विधानसभा निवडणुकीच्या तारीख ही जाहीर झाल्या नाही परंतु सर्व पक्षांनी मात्र एकदम टकाटक तयारी करून ठेवलेली दिसते. एकमेकांच्या जागेवरून चर्चाही करताना महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष दिसत आहेत. आज आपण लेखाजोखा म्हणणार आहे तो विधानसभा मतदारसंघ म्हणजे श्रीगोंदा.
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ म्हटलं की एकच नाव समोर येतं ते म्हणजे बबनराव पाचपुते. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघ सध्या चांगला चर्चेत आहे. या ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते हे असून भाजपमधूनच अनेकजण इच्छूक असल्यामुळे आता बबनराव पाचपुते यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार का?  या ठिकाणी खांदेपालट होणार याकडे श्रीगोंदाकरांचे लक्ष लागून राहिले आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ क्रमांक २२६ आहे.  श्रीगोंदा मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्यातील १. श्रीगोंदा तालुका आणि २. अहमदनगर तालुक्यातील चिचोंडी आणि वाळकी ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. श्रीगोंदा हा विधानसभा मतदारसंघ अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मोडतो. भारतीय जनता पक्षाचे बबनराव भिकाजी पाचपुते हे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.  श्रीगोंदा मतदारसंघ हा महाविकास आघाडी बालेकिल्ला  होता. १९६२ पासून राष्ट्रवादी-काँग्रेसचे सात वेळा आमदार येथून निवडणून आले आहेत.   विशेष म्हणजे आजपर्यंत भाजपचां फक्त एकदाच इथे उमदेवार निवडणूनआला  आहे .
2014 सालीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेले  आमदार बबनराव पाचपुते यांना सुद्धा भाजपला विजय मिळवून देता आला नव्हता. राष्ट्रवादीचे उमदेवार राहुल जगताप यांनी पाचपुते यांचा १३ हजार ६३७ मतांनी पराभव केला होता. 2014 पर्यंत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ हा श्रीगोंद्याचे माजी आमदार बबनराव पाचपुते यांचा बालेकिल्ला होता. सध्याची टर्म सोडली तर त्याआधी सलग 6 टर्म बबनराव पाचपुते हे आमदार राहिले होते.  विशेष म्हणजे 6 वेळा पाचपुते यांनी वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवली.  2009 साली बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून येत श्रीगोंद्याचे आमदार झाले.  त्यानंतर आघाडीची सत्ता आल्यावर पाचपुते यांना मंत्रिपद देखील मिळाले. मात्र 2014 साली भाजपची लाट असल्याने बबनराव पाचपुते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत बबनराव पाचपुते यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केल्याने श्रीगोंदा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाची उमेदवारीची माळ तरुण उमेदवार राहुल जगताप यांच्या गळ्यात पडली.
मात्र बबनराव पाचपुते यांच्या भाजप प्रवेशामुळे श्रीगोंद्यातील अनेक राजकीय नेत्यांमध्ये आणि भाजप समर्थकांमध्ये कमालीची नाराजी पसरली.  याच नाराजीतून श्रीगोंद्यातील पाचपुते सोडून इतर सर्व नेत्यांनी एकत्र येऊन राष्ट्रवादीकडून प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतलेल्या राहुल जगताप यांना मदत केली.  त्यामुळे पाचपुते यांचा पराभव होऊन राहुल जगताप यांचा विजय झाला.  अशारीतीने श्रीगोंदा तालुक्यात पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकला. परंतू 2019 चा विधानसभा निवडणुकीमध्ये बबनराव पाचपुते यांचा अगदी निसटत्या मतांनी विजय झाला. त्यामुळे बबनराव पाचपुते यांच्या निमित्ताने 2019 मध्ये श्रीगोंदा येथे कमळ उमलले.  त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी श्रीगोंदा येथील परिस्थिती बदललेली दिसते कारण बबनराव पाचपुते हे आजारपणामुळे थकले आहेत त्यामुळे त्यांचा या मतदारसंघातील संपर्क कमी झाला आहे.  त्यामुळे आता श्रीगोंदा येथे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कमळ पुन्हा एकदा फुलणार की कोमजणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  बबनराव पाचपुते यांच्या आजारपणामुळे त्यांचा श्रीगोंदा येथील जनसंपर्क कमी झाला आहे परंतु त्यांच्या पत्नी प्रतिभाताई आणि चिरंजीव विक्रम पाचपुते यांचा वावर मतदारसंघात चांगला आहे .कारण आमदारकी घरातच हवी असा त्यांचा हट्ट दिसतोय.  तर भाजप पक्षामधूनच दुसऱ्या बाजूला शिवाजीराव कर्डिले पासून तर मोठे मोठे प्रस्थापित नेते श्रीगोंदा मध्ये आमदार व्हायचं स्वप्न पाहू लागले आहेत.
तसेच श्रीगोंदा मध्ये बॅनर्जी झळकू लागले आहेत की यंदा असणारा आमदार हा महिला आमदार असावा. त्यामुळे श्रीगोंदा येथे माजी आमदार राहुल जगताप अनुराधा राजेंद्र नागवडे शिवसेना उपनेते साजन पाचपुते अण्णासाहेब शेलार घनश्याम शेलार असे हे नेते श्रीगोंदा इथून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. तर शिवाजीराव कर्डिले हे श्रीगोंदा येथे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. कारण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुजय विखे यांचा पराभव झाला आहे आणि त्यांना आता विधानसभा निवडणुकीसाठी राहुरी या विधानसभा मतदारसंघातून लढायचे आहे तशी त्यांनी तयारी केली आहे.  तसं पाहायला गेलं तर शिवाजीराव कर्डिले यांचे श्रीगोंदा येथे चांगलेच तगडे कनेक्शन आहे . ते म्हणजे कर्डिले यांचा श्रीगोंदा तालुक्यामध्ये नातेवाईक आणि मित्र परिवाराचा मोठा गोतावळा आहे.  याशिवाय मांडवगण गटात अरुण काका जगताप यांचा मोठा संपर्क आहे आणि तसेच त्यांनी तेथे कामही केले आहे त्यामुळे अरुण काका जगताप हे शिवाजी कर्डिले यांना मदत करून श्रीगोंदा या विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडून आणू शकतात. महिला आमदार यांच्या बद्दल बोलायचं झालं तर अनुराधा नागवडे सध्या यांचं नाव श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीसाठी चर्चेत आहे अनुराधा नागवडे यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला सोड चिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात त्यांनी प्रवेश केला. परंतु लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात त्यांनी प्रवेश करण्यापूर्वीच अजित दादांशी मला श्रीगोंदा येथे विधानसभा निवडणूक लढवायची आहे आणि त्यासाठी तिकीट हव आहे असा शब्द घेतलेला आहे अशा चर्चा रंगलेल्या आहेत. तसेच उद्धव ठाकरे गटाकडून साजन पाचपुते हे ही श्रीगोंदा इथून लढण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जातं
तसेच इथे 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये फक्त साडेचार हजार मतांनी पराभूत झालेले घनश्याम शेलार हेही इच्छुक आहेत.  घनश्याम शेलार सध्या काँग्रेस पक्षामध्ये आहेत. म्हणजेच श्रीगोंदा या विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येक पक्षाचा तगडा उमेदवार विधानसभेसाठी इच्छुक आहे तसेच महायुतीकडून जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष अण्णा शेलार यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. अण्णा शेलार यांनी जो पक्ष तिकीट देईल त्या पक्षाकडून लढायचे,  नाही कुणी तिकीट दिले तर अपक्ष लढायचे असे ठरवून घेतला आहे .आणि त्यानुसार त्यांनी श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये बैठक आहे सुरू केले आहेत. तसेच महायुतीकडून भाजप पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्या सुवर्णा पाचपुते यांनी या निवडणुकीमध्ये उतरायचं आहे त्यांनी त्या दिशेने तशी तयारी केली आहे  त्यामुळे सध्या श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचा तिढा हा वाढतच चालला आहे. तसेच विद्यमान आमदार बबनराव पाचपुते हे ही जागा सोडायला तयार नाहीत ते जरी आजारी असले तरी त्यांच्या जागेवरती त्यांची पत्नी किंवा मुलगा ऊभे राहावे असं त्यांना वाटत आहे.त्यामुळे बबनराव पाचपुते यांच्या घरामधील भाजपमधून एका व्यक्तीला तिकीट भेटावे यासाठी धडपड चालू आहे.
त्यामुळे श्रीगोंदा या विधानसभा मतदारसंघांमध्ये येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महिला उमेदवारांची ही नावे जास्त प्रमाणात पुढे येत आहेत. कारण सुवर्ण पाचपुते अनुराधा नागवडे यांनी आपण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले आहे त्यामुळे राहुल जगताप यांच्या पत्नी डॉक्टर प्रणवती जगताप यांना पुढे करू शकतात.  त्यामुळे यावेळेस श्रीगोंदा येथे पहिल्यांदा महिला उमेदवारांची चुरशीची लढत पाहिला मिळू शकते. तसेच श्रीगोंदा येथे भाजपकडून आणखी एक नाव विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी चर्चेत आले आहे ते म्हणजे राज देशमुख.  राज देशमुख हे तसं पाहिलं तर अजून नवीन नाव आहे.  परंतु आधीच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेले एवढे सगळे उमेदवारांना डावलून राज देशमुख यांना भाजपकडून तिकीट भेटणं तसं अवघड आहे अशा चर्चा आहेत. त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांचे तिकीट वाटप करताना मात्र डोकेदुखी होणार आहे. त्यामध्ये तिकीट वाटप करताना कुणी नाराज झाले तर ते बंडखोरी करून पक्ष बदलू शकतात. त्यामुळे त्याचा फटका हा तिकीट भेटणाऱ्या उमेदवारांना बसू शकतो. त्यामुळे एकंदरीत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे येथील राजकारण पाहिले तर फारच गुंतागुंतीचे वाटत आहे.  त्यामुळे आता इथून प्रत्येक पक्ष ह्या गुंतागुंतीच्या राजकारणाला मार्ग कसा काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर मंडळी तुम्हाला काय वाटतं श्रीगोंदा या विधानसभा मतदारसंघांमध्ये नक्की कोण आमदार व्हावा हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.

By satta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *