श्रीगोंदा नगर विधानसभा मतदार संघातून मतदानासाठी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. यामध्ये तरुण उमेदवार असलेल्या विक्रम पाचपुते आणि राहुल जगताप यांच्याकडे तरुण मतदारांचा ओढा दिसून येत आहे. उसाचे पेमेंट द्यायला नव्हते आणि आता अचानक मतदारांना प्रलोभाने दाखवण्यासाठी इतका पैसा कोठून आला अश्या चर्चा मतदार संघात रंगल्या आहेत. विक्रम पाचपुते यांच्या प्रचाराची सांगता सभा काष्टीत झाली आणि वातावरण फिरले. धडपड करणारा आणि हुशार तरुण उमेदवार म्हणून विक्रम पाचपुते यांच्याकडे पाहिले जाते. विक्रम पाचपुते यांच्याकडे विकासाची दृष्टी आणि व्हिजन असल्याचे तरुण वर्गात बोलले जाते.
लाडक्या बहिणीचा उत्साह मतदानात प्रचंड दिसून येत आहे. त्यांचा उत्साह नक्कीच माहविकास आघाडीची धाक धुक वाढविणारा आहे. अनेक ठिकाणी महिला ग्रूपणी मतदानासाठी जात असल्याचे दिसून येत आहे. महिलांचा मतदानात वाढणारा टक्का भाजपच्या फायद्याचा होईल अशी शक्यता वाटत आहे. पूर्वी महिलांना पती जिकडे सांगेल तिकडे मतदान होत होते पण या वर्षी चित्र वेगळे आहे. महिला पती समोर जाहीर पने बोलू लागल्या आहेत की मला जिकडे द्यायचं तिकडे देईल. यावरून राज्यात महाविकास आघाडी व महायुती दोन्ही पक्ष सत्तेच्या अगदी जवळ जाणार आहेत.