सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता एक महिना पुर्ण होईन गेला आहे. मात्र आरोपींना कोणतीही शिक्षा झालेली नसून प्रकरणाचा तपास सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये सांगितल्यानुसार आरोपींवर मोकका अंतर्गत गुन्हा दाखल केला गेलाय.

मात्र वाल्मिक कराड याच्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. कराडवर हत्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल नसल्याने त्याच्यावर मोक्कां अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला नाही. आता दोन दिवसांनी कराडची पोलीस कोठडी संपत आहे. अशातच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी मोठा निर्णय घेतला आहे. धनंजय यांनी कराडला ३०२ गुन्ह्यामध्ये घेण्यासाठी आंदोलन करणार असल्याचं सांगत स्वतःला संपवणार असल्याचं सांगितलं आहे.
चला तर पाहूया धनंजय देशमुख काय म्हणाले? आणि नेमकं प्रकरण काय आहे.
नमस्कार मी पिके भांडवलकर सत्ता या चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो.
संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे. खंडणी ते खून प्रकरण हे काय कनेक्शन आहे हे सीआयडीने ३१ डिसेंबरला पहिल्या सुनावणीवेळी स्पष्ट केलं आहे. त्यानंतर आरोपीला १५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जर या आरोपीला मोक्का आणि ३०२ आरोपामध्ये नाही घेतलं तर माझ्या कुटुंबाचं मोबाईल टॉवर आंदोलन असेल, त्या टॉवरवर मी स्वतःला संपून घेतो. याचं कारण असं आहे की, हे आरोपी सोडले तर माझा हे खून करतील. माझ्या कुटुंबात न्याय मागणारं कोणी नसेल. माझ्या भावालाही वाटेल की, आपला भाऊ स्वतः संपला. त्यालाही समाधान वाटेल की अशा पद्धतीने मारला गेला नाही, असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.
तसेच ते पुढे म्हणाले की मला भीती आहे, हा गुन्हा खंडणीतूनच घडलेला आहे. जर मला न्याय भेटत नसेल, माहिती मिळत नसेल, मला आणि माझ्या कुटुंबाला दूर ठेवलं जात असेल तर मी माझा स्वतःचा निर्णय घेतलेला बरा आहे. मी आणि माझे कुटुंबिय गांभीर्यपूर्वक हा निर्णय घेत आहे, सकाळी १० वाजता मी टॉवरवर जाणार आणि संपून घेणार आहे. मला सगळ्यांपासून भीती आहे. खंडणी ते खूनापर्यंतचे आरोपी आहेत त्यांना जाणीवपूर्वक बाहेर काढलं जात आहे. मला आणि गावकऱ्यांना माहिती दिली जात नाही. मुख्यमंत्री साहेबांवर विश्वास ठेवला चूकलो का? यंत्रणा आम्हाला माहिती देत नसेल आणि कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर आमच्या न्याय मागण्याला काहीच अर्थ नाही, म्हणून मी हे आंदोलन करत असल्याचं धनंजय देशमुख म्हणाले.

By satta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *