सोलापूर या जिल्ह्यामध्ये सांगोला हा विधानसभा मतदारसंघ येतो. सांगोला येथे शहाजी बापू पाटील हे विद्यमान आमदार आहेत. शहाजी बापू पाटील हे शिवसेनेचे उमेदवार आहेत. शहाजी बापू पाटील हे कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी चर्चेत असतात. तसेच ते मध्यंतरी चर्चेत आले होते ते म्हणजे सध्या पावसाचे वातावरण चालू आहे आणि अशाच वातावरणात त्यांनी एक वाक्य बोलले होते, काय झाडी , काय डोंगर , काय हॉटेल हा डायलॉग खूपच प्रसिद्ध झाला त्याच्यामुळे शहाजी बापू पाटील यांना महाराष्ट्रातील सर्वजण ओळखू लागले.
चला तर पाहुयात सांगोला या विधानसभा मतदारसंघाबद्दल .सांगोला ही विधानसभा तसे पहिले तर गणपतराव देशमुख या चेहऱ्यामुळे जास्त चर्चेत होती कारण सलग 11 तगणपतराव देशमुख हे ते एकाच पक्षातून विधानसभेवर निवडून आलेले होते.अतिशय साधी राणी सर्व सामान्यांच्यात मिसळणार नेतृत्व आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाड्यावर पसरलेलं कार्यकर्त्यांचे नेटवर्क. गणपतराव देशमुख हे शेकाप कडून लढत होते. एसटीने प्रवास करणारा आमदार अशी ओळख असणारे गणपतराव देशमुख. परंतु 2019 मध्ये गणपतराव देशमुख यांनी निवडणूक न लढवण्याचे ठरवलं कारण सलग 11 टर्म ते आमदार राहिलेले आहेत त्यामुळे त्यांचं वय जास्त झालं होतं. त्यामुळे 2019 मध्ये त्यांनी माघार घेत त्यांचा नातू अनिकेत देशमुख ला निवडणूक रिंगणात उतरवलं परंतु चेहरा बदलल्यामुळे लोकांना ते आवडले नाही आणि याचाच फायदा झाला तो म्हणजे शहाजी बापू पाटील यांना. 2019 मध्ये शहाजी बापू पाटील यांनी बाजी मारली आणि तिथे शिवसेनेचा झेंडा फडकवला . परंतु नंतर शिवसेनेमध्ये फूट पडली आणि शहाजी बापू पाटील यांनी शिंदे यांना साथ दिली म्हणजेच शहाजी बापू पाटील सध्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत परंतु हे वागणं सांगोला येथील मतदारांना आवडलेलं दिसत नाहीये.
कारण सांगोला येथे नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी डायरेक्ट मोहिते पाटलांना विरोध दर्शविलेला आहे. तसेच विविध डायलॉग बाजी करून ते फेमस झाले आहेत. त्यामुळे आता सांगोला पुन्हा एकदा शहाजी बापू पाटील यांना निवडून देण्याची संधी देणार की अकरा 11 टर्म आमदार राहिलेले गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांना एक नवीन संधी देणार? असा प्रश्न आहे . चला तर पाहुयात सविस्तर मध्ये अनिकेत देशमुख यांच्या आजोबा गणपतराव देशमुख व शहाजी बापू पाटील यांचा इतिहास. सांगोला येथे सलग अकरा 11 टर्म गणपतराव देशमुख हे शेकाप पडून निवडून येत होते. तसेच सलाम 11 टन शहाजीबापू पाटील हे गणपतराव देशमुख यांच्या विरोधी निवडणूक लढत होते आणि हरत होते. त्यामुळे शहाजी बापू पाटील भाषण करण्याच्या वेळी सांगतात की जसा गणपतराव देशमुख हे सलग अकरा टर्म जिंकून आले आहेत तसा मी सलम 11 टर्म हरत आलो आहे परंतु मी कधीही हार मानली नाही त्यामुळेच की काय 2019 ला शहाजी बापू पाटील यांना एकदा जिंकून येण्याची संधी मिळाली असं म्हणायला हरकत नाही.
1995 मध्ये शहाजी बापू पाटील यांनी गणपतराव देशमुख यांना एकदा पराभवाचा दणका दिला होता परंतु हा दणका शहाजी बापू पाटील यांना टिकविता आला नाही. त्यामुळे 1995 पासून पुन्हा एकदा गणपतराव देशमुख हे सलग शेकाप कडून निवडून येत होते येथील जनता गणपतराव देशमुख यांना मनापासून मतदान करत होते. परंतु 2019 मध्ये वय जास्त झाल्यामुळे गणपतराव देशमुख यांनी माघार घेतली आणि त्यांनी आपल्या नातवाला पुढे करत अनिकेत देशमुख यांना संधी दिली. परंतु मतदारांना हे काही फारसं आवडले नाही त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा शहाजी बापू पाटील यांना संधी देण्याचे ठरवले आणि 2019 मध्ये शहाजी बापू पाटील हे निवडून आले. चला तर पाहुयात 2019 मध्ये शहाजी बापू पाटील हे कसे निवडून आले.
गणपतराव देशमुख यांनी 2019 मध्ये आपण निवडणूक लढवणार नाही असे सांगून टाकले. त्यामुळे शेकापणे सांगोल्यातून भाऊसाहेब रुपनर यांना उमेदवारी जाहीर केली. परंतु अचानक हा निर्णय बदलण्यात आला आणि नंतर अनिकेत देशमुख यांनाही उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज झालेल्या भाऊसाहेब रुपनर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. तसेच राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच शहाजी बापू पाटील यांची चांगलीच ताकद वाढली आणि या सर्व गोष्टींचा 2019 मध्ये शहाजी बापू पाटील यांना फायदा झाला. 2019 मध्ये अवघ्या 674 मतांनी शहाजी बापू पाटील हे निवडून आले होते त्याचं कारण असं शेतात मधील इच्छुक कार्यकर्ते नाराज होते तसेच अनिकेत देशमुख यांच्यावर घराणेशाहीचे झालेले आरोप होते या सर्व गोष्टींमुळे अनिकेत देशमुख यांना कमी भेटले
2024 मध्ये अनिकेत देशमुख यांच्या पाठीशी त्यांचे आजोबा गणपतराव देशमुख यांची खंबीर साथ असणार आहे तसेच आता सहानुभूतीची वातावरण तयार झाले आहे. कारण एकनाथ शिंदे यांची भाजप सोबत झालेली होती ही मतदारांना फारशी आवडलेली नाही हे लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आले आहे. तसेच शहाजी बापू पाटील यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये अनेक मोठ्या नेत्यांविरोधात डायलॉगबाजी केली आहे. त्यामुळे याचा फटका शहाजी बापू पाटील यांना 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये बसण्याची शक्यता आहे. बायकोची शपथ घेऊन सांगतो, गणपतरावांना पाडायचं नव्हतं, तालुक्याला पाणी आणि विकास आणायचा होता, म्हणून निवडणूक लढवली, अशा शपथा खाणाऱ्या शहाजी बापूंनीही मतदार संघातील पाण्याचा प्रश्न कितपत सोडवला? हा देखील प्रश्न आहे. त्यात मोहिते पाटील लोकसभेचा वचपा विधानसभेला काढणार हे फिक्स असल्यामुळे महायुतीचे उमेदवार असूनही शहाजी बापू चहूबाजूंनी कोंडीत सापडले आहे. दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाचे माजी आमदार दीपक आबा सोळंके देखील विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
शेकाप बद्दल बोलायचं झालं तर अनिकेत देशमुख आणि त्यांचे काका बाबासाहेब देशमुख यांच्यातही तिकीट कुणाला मिळणार? यासाठी संघर्ष पाहायला मिळू शकतो. पण सध्यातरी शेकापचं पारडं सांगोल्यात जड दिसतंय . शेतकरी कामगार पक्षाचा तालुक्यावरील कंट्रोल तसंच धनगर समाजाचं एकगठ्ठा मतदान नेहमीच देशमुखांच्या पाठीशी राहिलं. त्यामुळे अनिकेत देशमुख यंदा उमेदवार असतील तर हा समाज विजयाचं निर्णायक मतदान शेकापच्या पारड्यात टाकू शकतो, असं चित्र सध्या तरी पाहायला मिळतय.
तर मंडळी सांगोला येथे कोण आमदार व्हावा असं तुम्हाला वाटत हे आम्हाला कमेंट्स करून कळवा.