सिंधुदुर्ग जिल्हा विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Sindhududurg jilha Assembly Election


आजच्या काळात सर्वात चर्चेत असलेल्या जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग. कारण आहे त्याला तसेच मोठे आहे. सिंधुदुर्ग येथे आठ महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. या पुतळ्याचे उद्घाटन आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती झाले होते. परंतु गेल्याच आठवड्यामध्ये येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यांची पडझड झालेली आपल्याला पाहायला मिळाली. यावरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात बरेचसे राजकारण तापलेले दिसत आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणावर परिणाम होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. चला तर पाहूया सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल थोडक्यात माहिती..
सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा अशी जिल्ह्याची ओळख आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला गोवा आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या तर रत्नागिरी आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांच्या सीमांनी जोडण्यात आलं आहे. तर एका बाजूने अथांग अशा निळ्याशार समुद्राने वेढले आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वांत लहान जिल्हा असून भौगोलिकदृष्ट्या डोंगरदर्यांनी वेढलेला आहे. अथांग अशा निळ्याशार समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणमध्ये समुद्रात सिंधुदुर्ग किल्ला बांधला आहे. त्याच किल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं देशातील एकमेव शिवराजेश्वर मंदिर आहे. याच मालवणमधील तारकर्ली समुद्रकिनारा जगभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे तर ब्लू फ्लॅगच्या नामांकनासाठी वेंगुर्ल्यातील भोगवे समुद्र किनारा जगभरात प्रसिद्ध झाला आहे. राज्यातच नव्हे तर देशाच्या राजकीय पटलावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एक वेगळं स्थान राहीलं आहे.
चला तर मग आपण पाहूयात देशात प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग या जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण कसे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन विधानसभा मतदासंघ आहेत. कणकवली कुडाळ आणि सावंतवाडी या तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश सिंधुदुर्ग जिल्ह्यात होतो.  सर्व ठिकाणी हायव्होल्टेज लढती पाहायला मिळणार आहेत. कोकणची ओळख ही शिवसेनेचा बालेकिल्लाशी कायम राहिले आहे त्यामुळे या ठिकाणी उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे हा संघर्ष कायम पाहायला भेटतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये वेगवेगळ्या पक्षाचे आमदार नेतृत्व करतात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग येथील रत्नागिरी सिंधुदुर्ग व रायगड या दोन मतदारसंघात भाजपचे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विजय मिळवला. त्यामुळे कोकण येथे भाजपचे पारडे  जड दिसत आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटी नंतर येथे पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये आता काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागले आहे.
चला तर पाहुयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात पहिला विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे
कणकवली विधानसभा मतदारसंघ. कणकवली विधानसभा मतदारसंघ क्रमांक २६८ हा  आहे.  कणकवली मतदारसंघात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, वैभववाडी आणि कणकवली या तालुक्यांचा समावेश होतो. कणकवली हा विधानसभा मतदारसंघ रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मोडतो. भारतीय जनता पक्षाचे नितेश नारायण राणे हे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. कणकवली विधानसभा मतदारसंघ येथे गेली दोन टर्म नितेश राणे हे येथे आमदार आहेत. 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत नितेश राणे यांनी शिवसेनेच्या सतीश सावंत यांचा पराभव केला.  या निवडणुकीत नितेश राणे यांना 84 हजार 504 मते मिळाली होती. तर सतीश सावंत यांना 56 हजार 388 मते मिळाली होती.  कणकवली विधानसभा मतदारसंघ हा राणेंचा बाल्लेकिल्ला म्हणून ओळखला जातो. नारायण राणे यांचा राजकीय वारसा चालवत नितेश राणे यांनी 2009 साली राजकारणात पाऊल ठेऊन पहिल्यांदाच कणकवली विधानसभा मतदारसंघात 25 हजारांपेक्षा जास्त मताधिक्क्याने काँग्रेसकडून निवडून आले.
 नारायण राणे कणकवली मालवण या मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून आले.  कणकवली मतदारसंघातून नितेश राणेंनी लोकसभेच्या निवडणुकीत नारायण राणे यांना 42 हजाराचे मताधिक्य मिळवून देत आपली पकड भक्कम केली आहे. या मतदारसंघात भाजप सोडून अजून कोणत्याही राजकीय पक्षाने दावा केलेला नाही.  त्यामुळे आमदार नितेश राणे यांच्यासमोर प्रतिस्पर्धी उमेदवार कोण हा प्रश्नचिन्ह कायम आहे. यंदाच्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे ही जागा कोणत्या पक्षाला सुटणार त्यानंतर उमेदवार ठरणार आहे. येत्या याकाळात कणकवली विधानसभा मतदारसंघावर काँग्रेस दावा करण्याची शक्यता आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठ महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा उभा करण्यात आला होता तो नुकताच पडला आहे त्यामुळे सध्या भाजप विरोधात सर्वजण आक्रमक झालेले दिसत आहे. त्याचा परिणाम जर नितेश राणे यांच्या मतांवरती झाला तर नितेश राणे यांना ही निवडणूक पाहिजे तेवढी सोपी जाणार नाही.  त्यामुळे आता कणकवली येथे महाविकास आघाडी कडून नक्की कोण उमेदवार उभे राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर मंडळी तुम्हाला काय वाटतं कणकवली येथे पुन्हा नितेश राणे यांना एक संधी दिली पाहिजे का हे आम्हाला कमेंट्स करून सांगा .
आता पाहुयात पुढील विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे कुडाळ मालवण
कुडाळ विधानसभा मतदारसंघ क्रमांक २६९ हा आहे.  कुडाळ मतदारसंघात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आणि कुडाळ या दोन तालुक्यांचा समावेश होतो.  कुडाळ हा विधानसभा मतदारसंघ रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मोडतो. शिवसेनेचे वैभव विजय नाईक हे कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. कुडाळ मालवण हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.  शिवसेना पक्ष फुटी नंतरही वैभव नाईक हे उद्धव ठाकरे गट  यांच्यासोबत आहेत.  कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात 2019 सालच्या निवडणुकीत शिवसनेच्या वैभव नाईक यांनी भाजप पक्षाचे उमेदवार रणजित देसाई यांचा पराभव केला होता.  याच मतदार संघात नारायण राणे यांचा शिवसेनेचे वैभव नाईक यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 10 हजार मताधिक्याच्या फरकाने नारायण राणे यांचा पराभव करून जॉईंट लीडर म्हणून राज्यात नावारुपास आले.
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप कडून माजी खासदार निलेश राणे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून महाविकास आघाडीकडून वैभव नाईक निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचे वर्चस्व कायम आहे.  या मतदारसंघातून त्यांनी दोन टर्म पूर्ण केल्या आहेत यावेळेस त्यांना हॅट्रीकची संधी आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून नारायण राणे यांनी 26 हजार 236 इतके मताधिक्य मिळवले आहे.  2019 च्या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक हे 14 हजार 349 हजारांचं मताधिक्य मिळवत विजयी झाले होते. परंतु यंदा आव्हानं उभी ठाकल्याने वैभव नाईक यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपला सुटला तर याठिकाणी भाजपकडून निलेश राणे यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे या ठिकाणी उमेदवार कोण असणार याची उत्सुकता सर्वाना लागली आहे.
आता पाहूया तिसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ  क्रमांक २७० हा आहे.  सावंतवाडी मतदारसंघात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुल, सावंतवाडी आणि दोडामार्ग या तालुक्यांचासमावेश होतो.  सावंतवाडी हा विधानसभा मतदारसंघ रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मोडतो. शिवसेनेचे दिपक वसंतराव केसरकर हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे.  याठिकाणी मंत्री दीपक केसरकर यांचे वर्चस्व आहे. केसरकर यांनी सलग तीन टर्म या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे.  सावंतवाडी मतदारसंघात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे दीपक केसरकर यांनी भाजपच्या बंडखोर उमेदवार राजन तेली यांचा पराभव केला होता.  दीपक केसरकर यांना 69 हजार 784 मतं मिळाली होती. तर राजन तेली यांना 56 हजार 556 मतं मिळाली होती. . दीपक केसरकर 2009 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँगेस कडून निवडून आले होते.  त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेने कडून निवडून आले. सध्या ते शिवसेना शिंदे गटात असून आताच्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नारायण राणे यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून 37 हजारांचा मताधिक्य मिळून दिले आहे त्यामुळे दीपक केसरकर यांचे आमदारकी सध्या सेफ झोन मध्ये आहे.  परंतु सावंतवाडी मतदारसंघात महायुतीतच इच्छुक उमेदवारांचा मोठा भरणा असून शिंदे शिवसेनेकडून दीपक केसरकर तर भाजप कडून राजन तेली, विशाल परब असे महायुतीकडून इच्छुक उमेदवार आहेत.  तर आघाडी कडून शरदचंद्र पवार गटाचे अर्चना घारे, ठाकरे गटाचे शैलेश परब आणि काँग्रेसकडून विलास गावडे हे इच्छुक आहेत. त्यामुळे आता महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून येथे नक्की तिकीट कोणाला भेटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तसेच दीपक केसरकर यांना यावेळेसही तिकीट भेटलं तर पुन्हा एकदा गुलाल उधळण्याची संधी यांना भेटणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  तर मंडळी असा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांचा लेखाजोखा.  तसेच नुकतीच झालेली घटना ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आठ महिन्यांपूर्वी जो पुतळा उभा करण्यात आला होता त्याची पडझड पाहायला मिळाली त्यामुळे सर्वजण आक्रमक झालेले दिसतात.  आता याचा परिणाम येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूक तर होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर मंडळी तुम्हाला काय वाटतं या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये कोण आमदार व्हावा हे आम्हाला कमेंट करून सांगा.

Leave a Comment