सुकन्या समृद्धी योजना 2025
आज आपण पाहणार आहोत सुकन्या समृद्धी योजनेची सविस्तर माहिती
जर तुमच्या घरात छोटी मुलगी आहे आणि तिच्या भविष्याच्या गुंतवणुकीसाठी तुम्ही विचार करत असाल तर तुमच्यासाठी सुकन्या समृद्धी योजना ही फायदेशीर ठरणार आहे.
सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत तुम्ही तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी चांगली गुंतवणूक करू शकता त्यावरती तुम्हाला चांगले व्याजही भेटेल.
सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत तुमच्या मुलीचे शिक्षणासाठी तुमचे पैसे बचत होतील.
चला तर पाहूया सुकन्या समृद्धी योजना नक्की काय आहे या योजने मागचा उद्देश काय आहे या योजनेमध्ये किती वर्षांच्या मुलीचे खाते आपण उघडू शकतो.
चला तर मुद्द्याचं बोलू या…
चला तर पाहूया या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?
सुकन्या समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश आहे तो म्हणजे मुलींच्या भ्रूणहत्या रोकणे.
या योजनेत मुलीच्या जन्मापासून ती दहा वर्षांची होईपर्यंत मुलीच्या नावाने खाते उघडता येते.
मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर जमा झालेले रकमेतून 50 टक्के रक्कम आपण काढू शकतो आणि मुलगी 21 वर्षाची झाल्यानंतर तिचे लग्न असल्यास जमा झालेली पूर्ण रक्कम आपण काढू शकतो.
चला तर पाहूया सुकन्या समृद्धी योजनेची पात्रता काय आहे
सुकन्या समृद्धी योजना खाते उघडण्यासाठी पात्र होण्यासाठी काही निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.
तुम्ही मुलीचे पालक किंवा कायदेशीर पालक असणे आवश्यक आहे.
मुलगी भारतीय रहिवासी आणि 10 वर्षांपेक्षा कमी वय असणे आवश्यक आहे.
तुम्ही एका मुलीसाठी फक्त एकच खाते उघडू शकता.
तुम्ही प्रत्येक कुटुंबासाठी जास्तीत जास्त दोन एसएसवाय (SSY) खाती उघडू शकता, तीन मुलींच्या बाबतीत वगळता, जिथे तिसरे खाते उघडले जाऊ शकते
सुकन्या समृद्धी योजनेसाठी अशी ही पात्रता आहे..
चला तर पाहूया सुकन्या समृद्धी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सुकन्या समृद्धी योजना खाते उघडण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे कोणती?
मुलीच्या जन्माचे प्रमाणपत्र
-पालकांचे आधार कार्ड तसेच पॅन कार्ड
-मुलीचे आधार कार्ड
-चालु मोबाईल क्रमांक
– रहिवासी पुरावा
एकाच गर्भधारणेतून अनेक मुलींचा जन्म झाल्यास, सक्षम डॉक्टरांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र
एवढी कागदपत्रे सुकन्या समृद्धी योजनेसाठी लागतात.
चला तर पाहूया सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे काय आहेत?
सुकन्या समृद्धी योजनेचा फायदा मुलींना भविष्यासाठी बचत करण्याची उत्तम संधी उपलब्ध करून देते. मुलीच्या कल्याण आणि आर्थिक सुरक्षिततेला प्रोत्साहन देते. हे 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींसाठी उघडले जाऊ शकते. हे आकर्षक व्याज दर देते. सध्या 8.2% प्रति वर्ष आहे.
सुकन्या समृद्धी योजना मध्ये परिवारातील फक्त दोन मुलींनाच याचा फायदा घेता येतो.
-या योजनेमध्ये आपण किमान २५० रुपयांपासून ते रुपये १.५ लाख पर्यंत पैसे खात्यावर भरू शकता.
-नवीन नियमावलीनुसार या सुकन्या समृध्दी योजनेसाठीचा व्याजदर हा आधीच्या ७.२ टक्क्यावरून ८.२ % इतका करण्यात आलेला आहे .
-दत्तक घेतलेल्या मुलीला सुद्धा या योजने मध्ये समाविष्ठ केलेले आहे.
-मुलीचे वय १८ वर्ष किंवा तिने दहावी उत्तीर्ण केल्यावर या खात्यामधुन काही रक्कम काढता येईल,पण एका वर्षात फक्त एकदाच रक्कम काढता येते
-सुकन्या समृध्दी योजना भारत सरकारने कर मुक्त केलेली आहे ,यात गुंतवलेली रक्कम त्यावर मिळणारे व्याज हे सर्वच करमुक्त केलेले आहे
-आधी एक मुलगी असेल अन नंतर जुळ्या मुली जन्माला आल्या तरी त्यांचेही खाते उघडता येईल.
-जुळ्या मुलीच्या नंतर मुलगी जन्माला आली तरी सुकन्या समृध्दी योजनेचे खाते उघडता येते .
तर सुकन्या समृद्धी योजनेचे हे फायदे आहेत.
चला तर पाहूया सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक कशी करावी?
सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करण्यासाठी, तुम्ही आधी पोस्ट ऑफिस किंवा अधिसूचित शेड्युल्ड कमर्शियल बँकेत (एससीबी (SCB)) खाते उघडले पाहिजे.
पोस्ट ऑफिस किंवा अधिसूचित बँकेच्या जवळच्या शाखेला भेट द्या.
सुकन्या समृद्धी खाते उघडण्याच्या फॉर्म घ्या
सर्व आवश्यक कागदोपत्री पुराव्यासह फॉर्म भरा आणि सबमिट करा.
पहिले डिपॉझिट करा. तुम्ही कॅश, डिमांड ड्राफ्ट किंवा चेकद्वारे पेमेंट करणे निवडू शकता.
. एकदा तुम्ही पहिली डिपॉझिट केल्यानंतर, बँक किंवा पोस्ट ऑफिस तुमच्या खाते उघडण्याच्या विनंतीवर प्रक्रिया करेल आणि तुम्हाला नव्याने उघडलेल्या खात्याचे तपशील असलेले पासबुक मिळेल.
चला तर पाहूया सुकन्या समृद्धी खाते कधी बंद होते?
जेव्हा मुलगी 18 वर्षांची होते किंवा तिचे लग्न होते, यावेळी सुकन्या समृद्धी योजनेचं खातं बंद केलं जातं. याशिवाय खातेदाराचा मृत्यू झाल्यास खाते बंद होते.
चला तर पाहूया सुकन्या समृद्धी खात्यातून पैसे कधी आणि कसे काढता येतील?
मुलीने वयाची 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर आणि दहावी उत्तीर्ण झाल्यावरच सुकन्या समृद्धी योजनेतून पैसे काढता येतात.
मुलीचं वय 18 वर्षे झाल्यावर मागील आर्थिक वर्षातील शिल्लक रकमेच्या 50 टक्के रक्कम काढता येते.
वर्षातून एकदा एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये पैसे काढता येतात. पण, यामध्ये अनेक अटी आणि नियम लागू आहेत.
चला तर पाहूया सुकन्या समृद्धी योजनेचा मॅच्युरिटी पीरियड किती आहे?
सुकन्या समृद्धी योजनेचा मॅच्युरिटी पीरियड मुलीच्या वयाच्या 21 व्या वर्षी आहे. यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 14 वर्षे गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतरच्या सात वर्षांत, सरकार जमा केलेल्या एकूण रकमेवर व्याज जमा होत राहते. अशा परिस्थितीत, या योजनेत गुंतवणूक करुन, तुम्हाला तीनपट लाभ मिळू शकतो. या योजनेअंतर्गत, मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तुम्ही 50 टक्के रक्कम काढू शकता आणि संपूर्ण रक्कम 21 व्या वर्षी काढू शकता.