https://youtu.be/6HUHGWjshh4

सुमित गुट्टे अपहरण प्रकरण

पैसे चोरले , मोबाईल काढला , रक्त गायबसुमित गुट्टे सोबत नक्की काय घडलं? Inside story

कोणी नोकरीच्या शोधत येतात कोणी शिक्षणासाठी येतात  परंतु आता पुण्यासारख्या शहराच्या ठिकाणी रिक्षावाल्यांनी केलेली फसवणुकीच्या घटना पुढे येऊ लागल्या आहेत

मागील आठवड्यामध्येच बिहार वरून आलेल्या तीन जणांना फसवल्याची घटना घडली होती.
आता अशीच एक घटना घडली आहे ती म्हणजे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या नातवासोबत.
जर आमदारांच्या नातवासोबतच काही भयंकर घटना घडत असेल तर सामान्य लोकांसोबत काय होईल याची कल्पनाही करू शकत नाही.
 2 जानेवारीला सुमित एका हॉस्पिटलमध्ये मुलाखत द्यायला पुण्याला गेला होता.
त्यानंतर तो अचानक गायब झाला. सुमित गुट्टे हा रत्नाकर गुट्टे यांच्या भाचीचा मुलगा आहे. एका आमदाराचा नातू असं अचानक गायब झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. परंतु आता सुमित गुट्टे सापडला आहे. त्याला एका रिक्षाचालकानं मनमाड पोलीस ठाण्यात आणून सोडलं आहे. पण मागील तीन दिवस सुमित कुठे होता? त्याच्यासोबत नक्की काय घडलं? याचीच कसलीच कल्पना सुमितला नाही
चला तर पाहूया रत्नाकर गुट्टे यांचा नातू सुमित गुट्टे हा पुण्यामध्ये कोणत्या कारणासाठी आला होता? आणि याच्यासोबत पुण्यामध्ये नक्की घडलं काय?
सुमित गुट्टे हा गुरुवारी 2 जानेवारीला एका हॉस्पिटलमध्ये इंटरव्यू द्यायला पुण्यामध्ये आला होता.
गुरुवारी दोन तारखेला सुमित गुट्टे ज्यूपिटर रुग्णालय इंटरव्यू देण्यासाठी गेला होता.
इंटरव्यू झाल्यानंतर सुमित रिक्षाने बस स्थानकावर निघाला होता. पण रिक्षात बसल्यानंतर त्याच्यासोबत काय घडलं? याबद्दल सुमितला काहीच आठवत नाहीये. तीन दिवसांपासून बेपत्ता असलेला सुमित गुट्टे रविवारी मनमाडच्या रेल्वे स्टेशनवर आढळून आला. मला एसटी स्टँड किंवा पोलीस स्टेशनला सोडा, असं त्याने एका रिक्षावाल्याला सांगितलं. त्यानंतर रिक्षाचालकानं त्याची मदत केली आणि मनमाड पोलीस स्टेशनच्या बाहेर सोडलं.
परंतु तो मनमाड पोलीस स्टेशन पर्यंत कसा गेला ते त्याला काहीच आठवत नाहीये.
सुमित सांगत होता की मी इंटरव्यू झाल्यानंतर बस स्टैंड वर जाण्यासाठी मी रिक्षात बसलो परंतु त्या रिक्षात माझ्यासोबत एक तरुणी बसलेली होती.
या तरुणीने मला काहीतरी टोचले परंतु मला ते एवढे जाणवले नाही.
 त्यानंतर माझ्यासोबत काय झालं हे मला काहीच आठवत नाही
त्यानंतर थेट मला आजच आठवत आहे.
परंतु मला जाणवत होतं की माझ्या शरीराला काहीतरी थंड लागतय. कुणीतरी माझं रक्त काढून घेत आहे असं वाटत होतं.
सुमितच्या खिशामध्ये दोन हजार होते ते गायब झाले होते.
तसेच सुमित चा मोबाईल काढून घेण्यात आला
जेव्हा संकेत गुट्टेला शुद्ध आली तेव्हा तो पुणे रेल्वे स्थानक कुठे आहे हे विचारू लागला.
मात्र हे मनमाड स्थानक असल्याचे त्याला नागरिकांनी सांगितले.
 तेव्हा संकेत रिक्षात बसून थेट मनमाड पोलिस ठाण्यात गेला
त्याने पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला तेव्हा पोलिसही चक्रावले
सुमित गायब झाल्यानंतर पुण्यातील पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी सुमितचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. सुमित हा स्वतः घरातून बाहेर पडला आणि पुणे रेल्वे स्टेशनवरील एटीएममधून पैसे काढून तो पुढील प्रवासाठी गेला, असं सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून समोर आलं होतं. तसेच शुक्रवारी दुपारी सुमित पुणे स्टेशनवर फिरतानाचे चित्रीकरण सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे. मात्र त्यानंतर तो कुठे गेला, याचा शोध लागत नव्हता. सुमितला शोधण्यासाठी पिंपरी चिंचवडचे पोलीस शर्थीचे प्रयत्न करत होते. मात्र अखेर तीन दिवसांनी सुमित गुट्टे सापडला आहे. आता तीन दिवस तो नेमका कुठे होता? त्याच्यासोबत काय घडलं? याचा शोध घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.
तर मित्रांनो आपण पुण्यात किंवा इतर अनोळखी शहरात जात असाल तर सावध रहा.

By satta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *