९० तास कामाचा आठवडा’ या वक्तव्यामुळे वादात सापडलेले L&T चे अध्यक्ष कोण?
पुणे येथील एका नामांकित कंपनीमध्ये मागील काही महिन्यामध्ये कामाचा अतिशय ताणतणाव असल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून किती तास काम करायचे याबाबत सोशल मीडियावर तसेच विविध माध्यमांवर बरीच चर्चा झाली होती. यामध्ये इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनीही अनेक वेळा भाष्य केले होते. फक्त आयटी कंपनीतील कर्मचाऱ्यांना आठवड्यातून दोन दिवस सुट्टी असते.
परंतु आता हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे कारण एल अँड टी कंपनी म्हणजेच लार्सन अँड टुब्रो या कंपनीच्या अध्यक्षांनी पत्नीकडे किती वेळ पाहत बसणार त्यापेक्षा काम करा आणि कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून 90 तास काम करावे असे विधान केले आहे. यामुळे त्यांच्यावरती जोरदार टीका होत आहे.
खरंच कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 90 तास काम करणं शक्य आहे का? कर्मचारी जर आठवडाभर कामच करत राहिले तर तर ते स्वतःला वेळ कधी देणार तसेच आठवड्यातून एक दिवस भेटल्यानंतर जी बाहेरील कामे असतात ती कधी करणार असे सर्वच प्रश्न पडत आहेत? त्यामुळे खरंच कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून ९० तास काम करणं शक्य होणार आहे का?
चला तर पाहूया नेमकं प्रकरण काय आहे? नमस्कार मी पिके भांडवलकर सत्ता या चैनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो.
सध्या सोशल मीडिया वरती एल अँड टी या कंपनीचे अध्यक्ष एस एन सुब्रह्मण्यम यांचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एल अँड टी कंपनीचे अध्यक्ष एस एन सुब्रमण्यम यांना कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना विचारण्यात आले की अब्जावादी डॉलरची उलाढाल असलेले एल अँड टी कंपनी अजून एक कर्मचाऱ्यांना शनिवारी का काम करायला होते यावर त्यांनी दिलेले उत्तर पाहून हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
या प्रश्नाचे उत्तर देताना एल अँड टी कंपनीचे अध्यक्ष. सुब्रह्मण्यम म्हणाले रविवारी मी तुम्हाला काम करायला लावत नाही याचा मला पश्चाताप आहे. मी जर तुम्हाला रविवारी काम करायला सांगितले तर मला जास्त आनंद होईल. कारण मी सुद्धा रविवारी काम करतो. यासोबतच त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहे ते कर्मचाऱ्यांना विचारतात की घरी बसून तुम्ही काय करता? तुम्ही तुमच्या पत्नीकडे किती वेळ पाहणार? पत्नी तुमच्याकडे किती वेळ पाहणार? त्यापेक्षा कार्यालयात या आणि कामाला लागा.
त्यानंतर त्यांनी असेही सांगितले की त्यांची एक मीटिंग चीनमध्ये झाली त्यावेळेस चीनमधील एका व्यक्तीने त्यांना असे सांगितले की आम्ही अमेरिकेला कधीही मागे टाकू शकतो. त्यावेळी त्यांनी चीनच्या व्यक्तीला कारण विचारले. तेव्हा चीनच्या व्यक्तीने सांगितले की अमेरिकन लोक आठवड्याला 50 तास काम करतात तर आम्ही आठवड्याला 90 तास काम करतो. जर आम्हाला या जगात अव्वल स्थानी पोहोचायचे असेल तर वेगाने काम करावे लागेल. या सर्व गोष्टींमुळे एल अँड टी चे अध्यक्ष आता ट्रोल होताना दिसत आहेत.
यावरती अभिनेत्री दीपिका पादुकोण यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. दीपिका ने यावरती म्हंटले आहे की इतक्या वरिष्ठ पदावरील लोक अशी विधाने करतात हे धक्कादायक आहे. तसेच तिने मानसिक आरोग्याचा मुद्दा देखील उपस्थित केला आहे.तसेच दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून यासंबंधीत एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने पत्रकार फये डिसूझा यांच्या या वक्तव्यासंबंधीच्या पोस्टवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. दीपीकाने आपल्या स्टोरीत मेंटल हेल्थ मॅटर (#MentalHealthMatters) असा हॅशटॅग वापरून म्हटले आहे की, “एवढ्या वरिष्ठ पदावरील लोक अशी विधाने करतात हे पाहून धक्का बसला.”
चला तर पाहूया कोण आहेत एसएन सुब्रमण्यन?
१६ मार्च १९६० रोजी तामिळनाडूतील चेन्नई येथे जन्मलेल्या सुब्रमण्यन यांनी कुरुक्षेत्र येथील प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर पुण्यातील सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमधून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्स (एमबीए) केले. पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुब्रमण्यन १९८४ मध्ये एल अँड टी मध्ये प्रोजेक्ट प्लॅनिंग इंजिनिअर म्हणून रुजू झाले. नंतर त्यांनी लंडन बिझनेस स्कूलमधून एक्झिक्युटिव्ह मॅनेजमेंट प्रोग्राम देखील पूर्ण केला.
उद्योगातील दिग्गजांकडून व्यापक मार्गदर्शन मिळाल्यानंतर सुब्रमण्यन यांनी नंतर विविध क्षेत्रांमध्ये मोठी जबाबदारी स्वीकारली आणि २०११ मध्ये एल अँड टी बोर्डात सामील झाले. व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी अशा विविध भूमिकांमध्ये पदोन्नती झाल्यानंतर सुब्रमण्यम यांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये एल अँड टीचे अध्यक्ष आणि एमडी म्हणून कंपनीची सूत्रे हाती घेतली. एल अँड टी वेबसाइटनुसार, सुब्रमण्यन यांच्या नेतृत्वात कंपनीने स्टॅच्यू ऑफ युनिटी, आयटीईआर, ड्युअल फीड क्रॅकर्स, ऑफशोअर प्लॅटफॉर्म, के९ वज्र, अटल सेतू, अयोध्या राम मंदिर इत्यादी अनेक यशस्वी प्रकल्प राबवले आहे.
कर्मचाऱ्यांनी रविवारीही काम करण्याचा सल्ला देणारे लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम यांचे वार्षिक वेतन समोर आले आहे. २०२३-२४ या वर्षात त्यांना एकूण ५१ कोटी रुपये वेतन म्हणून मिळाले आहेत. जे कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनापेक्षा ५०० पट अधिक आहेत.त्यात ३.६ कोटी रुपये बेस सॅलरी आहे. १.६७ कोटी प्रीरिक्वेस्टिव वर्थ, ३५.२८ कोटी रुपयांचं कमिशन आणि १०.५ कोटी रुपयांच्या निवृत्तीच्या नफ्याचा समावेश आहे. त्यांचा पगार हा एल अँड टी कंपनीच्या साधारण कर्मचाऱ्यांच्या पगाराहून ५३४.५७ टक्क्यांनी अधिक आहे. तेथे साधारण कर्मचाऱ्यांचा वार्षिक पगार हा ९.५५ लाख रुपये आहे.