कोण कोणाला हलक्यात घेतय? कोण कोणाला जड जातंय?

विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर महायुतीची सत्ता स्थापन झाली.
परंतु महायुतीमध्ये तीन सत्ताधारी पक्ष असल्यामुळे यांच्यामधील धुसफूस कायमच चव्हाट्यावर आलेली दिसली.
राज्यात महायुती सत्तेत असताना शिवसेना आणि भाजपमधील संबंध बिघडू लागले आहेत ?
तर भाजप पक्ष शरद पवार यांच्याशी चांगले संबंध बनवण्याचे प्रयत्न करत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
2014 ते 2019 सारखेच देवेंद्र फडणवीस 2024 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेची गळचेपी झाली आहे का?
महायुतीमध्ये एकनाथ शिंदे हेच घेरले जात असल्याचे म्हटले जात आहे.
चला तर हे सर्व मुद्दे आपण सविस्तर पाहूया.
मुद्दा क्रमांक १ ) भाजप पक्ष शरद पवार यांच्याशी चांगले संबंध बनवण्याचे प्रयत्न करत आहे का ?
दिल्लीत साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र आले आणि त्यांच्या देहबोलीची चर्चा महाराष्ट्रात रंगली.
ज्या पंतप्रधान मोदींनी लोकसभेच्या निवडणुकीवेळी शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका केली होती.
त्याच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांसाठी खुर्ची पकडून ठेवणे तसेच त्यांच्यासाठी पाण्याचा ग्लास भरणे.
त्यामुळे आता पवारांच्या प्रती मोदींचे भाव का बदलले असा सवाल महाविकासआघाडीतील संजय राऊत यांनी उपस्थित केला.
व्यासपीठ होतं मराठी साहित्य संमेलनाचं, सभागृहात गर्दी होती साहित्य प्रेमींची.
  पण लक्ष वेधलं ते मंचावरील दोन दिग्गज नेत्यांनी, . त्यामागचं कारणही तसंच होतं.
 देशाचं आणि राज्याचं राजकारण आपल्या कृतीतून फिरवायची ताकद असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार या व्यासपीठावर एकत्र आले होते.
राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो असं म्हणतात.
 त्यामुळे एकमेकांवर टोकाची टीका करणारे, एकमेकांपेक्षा पूर्णपणे राजकीय विचारधारा जपणारे नेते जेव्हा एकत्र येऊन एकमेकांप्रती स्नेहभाव दखवतात तेव्हा राजकीय चर्चा मोठ्या प्रमाणात होते.
मुद्दा क्रमांक २) 2014 ते 2019 सारखेच देवेंद्र फडणवीस 2024 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेची गळचेपी झाली आहे का?
 एकनाथ शिंदे यांनी मला हलक्यात घेऊ नका नाहीतर टांगा कधीही पलटी होऊ शकतो असे विधान केले होते.
त्यामुळे भाजप पक्ष आणि एकनाथ शिंदे शिवसेना यांच्यातील ताणलेले संबंध पुन्हा एकदा सर्वांना दिसू लागले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या अशा वक्तव्यामुळेच भाजप पक्ष शरद पवार यांच्याशी चांगले संबंध करण्याचा प्रयत्न करत आहे का असा देखील प्रश्न सर्वांना पडत आहे.
 २०१४ ते २०१९ या कालावधीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सत्तेत सोबत असलेली शिवसेना कायम नाराज होती.
त्यावेळी उद्धव ठाकरेंची शिवसेना सत्तेत धाकटा भाऊ होती.
मुख्यमंत्रिपद भाजपकडे असल्यानं शिवसेनेची अस्वस्थता वाढत होती.
सेनेचे मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरत होते.
आता अगदी खिशात राजीनामे नसले तरी सेनेत अस्वस्थता आहे.
परंतु आता 2025 मध्ये केवळ ठाकरेंची जागा एकनाथ शिंदेंनी घेतली आहे. मुख्यमंत्रिपदी पुन्हा फडणवीसच आहेत.
२०१४ मध्ये शिवसेना, भाजप विधानसभा निवडणूक स्वबळावर लढले. भाजपनं १०५ जागा जिंकल्या होत्या.
 शिवसेनेनं ६३ जागांवर बाजी मारली होती.
सत्ता स्थापनेसाठी १४५ चा आकडा असल्यानं भाजपला सेनेची गरज होती.
त्यामुळे सेनेची बार्गेनिंग पॉवर वाढली होती.
पण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आणि राज्यात भाजपचं सरकार आलं होत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले.
मग आता तोच खेळ पुन्हा सुरु झाला आहे का असा प्रश्न सर्वांना पडतो.
२०१४ ते २०१९ या कालावधीत सत्तेत असूनही शिवसेनेची कुचंबणा झाली होती.
आता तशीच परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे.
 शिंदेंनी मुख्यमंत्री असताना घेतलेले अनेक निर्णय मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस यांनी रोखले आहेत.
काही निर्णय बदलले आहेत, तर काही निर्णयांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
शिंदे मंत्रिमंडळाच्या बैठकांना वारंवार अनुपस्थित राहत आहेत. त्यामुळे भाजपनं रणनीतीच बदलली आहे.
तर मला हलक्यात घेऊ नका. टांगा कधीही पलटू शकतो, असं विधान शिंदेंनी काही दिवसांपूर्वीच केलं होतं.
मुख्यमंत्रिपद सोडावं लागल्यानंतर उपमुख्यमंत्रिपद झालेले शिंदे सातत्यानं त्यांची नाराजी दाखवून देत आहेत.
 शिंदेंच्या राजकारणाला शह देण्यासाठी भाजपनं शरद पवारांसोबतचे संबंध सुधारण्यावर भर दिला आहे.
दुसरीकडे महायुतीत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचे संबंध उत्तम आहेत.
महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांनीही शरद पवारांसोबतचे संबंध सुधारण्याचे प्रयत्न सुरु ठेवले आहेत.
 शरद पवारांनी महाराष्ट्रात पक्षाचं नेतृत्त्व अजित पवारांकडे देण्याची तयारी दर्शवली होती.
 पण सुप्रिया सुळेंच्या विरोधामुळे ते मागे हटले. पण त्याच सोबत भाजपशी असलेले संबंध चांगले राखण्याकडेही त्यांचा कल आहे.
महायुती सरकारकडे प्रचंड मोठं संख्याबळ आहे.
 बहुमतासाठी १४५ आकडा गरजेचा असताना भाजपकडे स्वतःचे १३२ आमदार आहे.
लहान पक्ष आणि काही अपक्षांसह हा आकडा १३८ पर्यंत जातो. शिंदेंनी टांगा पलटी करण्याचा प्रयत्न केल्याच तरी अजित पवारांच्या ४१ आमदारांचा पाठिंबा भाजपकडे आहेच.
त्यामुळे राज्यातील सरकारला तरी कोणताही धोका नाही.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आता केवळ १० आमदार आहेत.
पण त्यांच्याकडे असलेलं खासदारांचं बळ भाजपसाठी महत्त्वाचं आहे.
केंद्रात बहुमताचा आकडा २७३ आहे. तिथे भाजपचे २४० आमदार आहेत.
टीडीपीचे १६, जेडीयूचे १२ आणि शिंदेसेनेचे ७ अशा २५ आमदारांसह केंद्रात एनडीएचा आकडा बहुमताच्या पुढे जातो.
 केंद्रात एनडीएकडे २९३ खासदारांचं बळ आहे.
या परिस्थितीत शिंदेंनी केंद्रात टांगा पलटी करण्याचा प्रयत्न केल्यास शरद पवार उपयोगी ठरु शकतात. त्यांच्याकडे ८ खासदारांचं बळ आहे. त्यांच्या आधारे केंद्रातलं सरकार तरु शकतं.
त्यामुळे आता भाजप सरकारला शिवसेना एकनाथ शिंदे सरकारची गरज राहिलेली नाही असे दिसत आहे.
आणि भाजप पक्ष हे सत्ता टिकवण्यासाठी शरद पवार यांच्याशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत आहे .

By satta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *