नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. आता वारे वाहू लागले आहे ते विधानसभा निवडणुकांचे. परंतु नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात जास्त लोकसभा मतदारसंघ गाजला असेल तो म्हणजे अहमदनगर लोकसभा मतदारसंघ. त्याचे कारण असे अहमदनगर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार आणि भाजपचे विखे घराणे यांच्यातील राजकीय वाद सर्वांनाच माहित आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये शरद पवारांना पाहिजे तसा चेहरा भाजप पक्षाचे सुजय विखे पाटील यांच्या विरोधात भेटला नव्हता. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये चांगला चेहरा भेटावा याचा शोध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार हे घेत होते.  2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर दोन वर्षांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये फूट पडली. यावेळी पारनेरचे असलेले आमदार निलेश लंके यांनी मात्र अजित दादा पवार यांना साथ दिली.
परंतु लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर निलेश लंके यांच्या लक्षात आलं की महायुतीमधून भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्यासाठी अहमदनगर ही जागा सोडणार नाही. तसेच अहमदनगर जिल्ह्यात असणारे सुजय विखे हे घराणे खूपच मोठे आहे त्यामुळे त्यांना टक्कर देण्यासाठी तसा उमेदवार पाहिजे हे शरद पवार शोधत होते. ही गोष्ट निलेश लंके यांच्या लक्षात आल्यानंतर निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना सोडचिठ्ठी देत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षामध्ये प्रवेश केला आणि ते पुन्हा एकदा घरवापसी झाले. त्यानंतर शरद पवारांनी निलेश लंके यांना भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांच्याविरुद्ध तिकीट दिले. निलेश लंके यांनी शरद पवार यांना दिलेला शब्द पाळला आणि त्यांनी सुजय विखे यांच्यासारख्या तगडे उमेदवाराला पाणी पाजत त्यांचा दणकून पराभव केला. त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये निलेश लंके हे जायंट किलर ठरले. परंतु ज्यावेळी निलेश लंके यांचा लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार चालू होता त्याच वेळेस त्यांच्या पत्नी राणी लंके याही त्यांच्यासोबत संपूर्ण लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत होत्या. त्यावरूनच असे दिसत होते की जर निलेश लंके खासदार झाले तर पारनेर येथील जागा खाली होणार आणि ही जागा दुसरी तिसरी कोणी लढणार नसून ती जागा राणी लंके लढवतील.
आज आपण पाहणार आहोत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये गाजलेला अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या विधानसभा मतदारसंघाबद्दल. पारनेर विधानसभा मतदारसंघ  क्रमांक २२४  आहे. पारनेर मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्यातील १. पारनेर तालुका‌ आणि २. अहमदनगर तालुक्यातील नाळेगांव आणि चास ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. पारनेर हा विधानसभा मतदारसंघ अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मोडतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निलेश ज्ञानदेव लंके हे पारनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. पारनेर हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जायचा.  इथे अनेकांनी प्रयत्न केले पण शिवसेनेचा भगवा पानर मधून कधीच मागे पडला नाही. शिवसेना पक्षाचे विजयराव औटी यांनी पारनेर येथे सलग तीन टर्म आमदार म्हणून काम पाहिले आहे.  पारनेर या विधानसभा मतदारसंघावर विजयराव औटी यांनी कायम आपला धबधबा ठेवला होता.  या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुजित झावरे यांनी सलग दोनदा आव्हान देण्याचा प्रयत्नही केला परंतु त्यांच्या प्रयत्नाला फारसे यश आलं नव्हतं.
2018 ला उद्धव ठाकरेंच्या यांच्या सभेत गोंधळ झाला तिथून प्रवास सुरू झाला तो खासदार निलेश लंके यांचा.  2018 ला उद्धव ठाकरे यांच्या पारनेरच्या सभेत गोंधळ झाला आणि या गोंधळाचे सर्व खापर फुटले ते निलेश लंके यांच्या वरती त्यामुळे निलेश लंके यांची शिवसेना या पक्षातून हकलपट्टी केली. त्यामुळे शिवसेनेवरती नाराज होऊन निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये प्रवेश करत आपल्या हातात घड्याळ बांधले. निलेश लंके हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजयराव औटी कडून राजकारण शिकले त्यांच्याच विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उभे राहिले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजयराव औटी यांना पराभूत करत निलेश लंके यांनी पारनेर येथे पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ही जागा जिंकून आणली. यामुळे सोशल मीडिया वरती एकच चर्चा होऊ लागली ती म्हणजे साधासुधा कार्यकर्ता पारनेर आमदार झाला त्यानंतरच कोरोना काळात निलेश लंके यांनी केलेली कामे जनतेत मिळून मिसळून राहण्याची त्यांची सवय हे सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे निलेश लंके यांची प्रसिद्धी संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये तगडा उमेदवार सुजय विखे यांना पराभूत करून निलेश लंके हे अहमदनगर जिल्ह्याचे खासदार झाले.
आता पारनेर मध्ये वारे वाहू  लागला आहे ते म्हणजे विधानसभा निवडणुकांचे. पारनेर येथून निलेश लंके हे खासदार झाले त्यामुळे आता पारनेरची जागा खाली झाली. त्यामुळे निलेश लंके यांची जागा कोण घेणार हे पाहण्यासाठी सर्वजण इच्छुक आहेत. पण त्यावरच एक चर्चा चालू झाली ती म्हणजे निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या विधानसभा निवडणुकीसाठी उभ्या राहणार. परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये सुजय विखे सारख्या तगडे उमेदवाराला हरवणे पाहिजे तेवढे सोपे नव्हते त्यासाठी ताकद लावली ती महाविकास आघाडी मधील काँग्रेस आणि शिवसेनेने. त्यामुळे आता असे बोलले जात आहे की पारनेर हा असतानाच शिवसेनेचा बालेकिल्ला आहे त्यामुळे महाविकास आघाडी मधून पारनेर ही जागा शिवसेनेला सोडावी असं बोलणं हे लोकसभा निवडणुकीच्या वेळेस झालेला असावे. कारण निलेश लंके हे खासदार झाल्यानंतरही त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळेसही असे चर्चा रंगू लागले होते की निलेश लंके यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली कारण निलेश लंके यांना पाहणाऱ्या विधानसभा मतदारसंघांमधून त्यांच्या पत्नी राणी लंके यांना तिकीट मिळवून द्यायचे आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना सोडावी यावरती चर्चा करण्यासाठी निलेश लंके यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असावी अशा चर्चा रंगल्या होत्या.
परंतु आता समजत आहे की लोकसभा निवडणुकीच्या वेळेस शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये पारनेर या विधानसभा मतदारसंघाबद्दल चर्चा झाली होती. आणि कदाचित शरद पवारांनी शब्द दिलेला असावा की पारनेर हा विधानसभा मतदारसंघ आम्ही शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यासाठी ही जागा देऊ. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये मशाल हाती घेण्यासाठी इच्छुकांची भाऊ गर्दी जमायला सुरुवात झाली आहे. सध्याचे वातावरण पाहता पांढऱ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीत पारनेरची जागा जिंकेल असं म्हणायला हरकत नाही. परंतु पांढऱ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पारनेर तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे जिल्हा उपप्रमुख संदेश कारले हे इच्छुक असल्याच्या चर्चा रंगले आहेत. त्यामुळे येथे तिकीट कोणाला भेटणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. जर पारनेर विधानसभा मतदारसंघ जागा शिवसेना ठाकरे गटाला भेटली आणि तिकीट वाटपामध्ये जर काही घोळ झाला तर नाराज झालेला उमेदवार हा बंड करून महायुतीला सपोर्ट करू शकतो.
त्यामुळे या ठिकाणी महाविकास आघाडी साठी सोपे वाटणारे राजकारण हे अवघड होऊ शकते. तसेच आता पारनेर येथील जागा महाविकास आघाडी कडून नक्की शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना सुटणार की ही जागा शरद पवार आपल्याकडेच ठेवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच ही जागा जर शिवसेना उद्धव ठाकरे यांना सुटली आणि राणी लंके यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये विधानसभेला तिकीट द्यायचं असं ठरलं तर राणी लंके या शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. की राणी लंके या महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात राहून शिवसेना उद्धव ठाकरे गटातील उमेदवारांना मदत करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच पारनेर विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून अनेक जण इच्छुक असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत त्यामध्ये महायुतीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्याकडे असल्यामुळे येथील बाजार समितीचे माजी अध्यक्ष जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड सुजित झावरे काशिनाथ दाते हे आमदारकीसाठी इच्छुक आहेत अशाही चर्चा रंगला आहेत तसेच भाजप पक्षाकडून प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे सुनील थोरात हेही इच्छुक असल्याच्या येथे चर्चा रंगल्या आहेत.
परंतु महाविकास आघाडी कडून ही जागा जर शिवसेना ठाकरे गट यांना भेटली तर येथून श्रीकांत पठारे यांच्या नावावर शिक्काम होतो होईल अशी माहिती समोर येत आहे याचं कारण असं आहे की निलेश लंके यांना खासदार करण्यामध्ये पारनेर मधील ठाकरे गटाने खूप मदत केली आहे. तसेच महाविकास आघाडी कडून श्रीकांत पठारे यांनी पारनेर तालुका एक हाती सांभाळला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जरी येथून शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडून श्रीकांत पठारे यांना उमेदवारी जाहीर झाली तरी निलेश लंके हे आपले सारे यंत्रणा यांच्यासाठी कामाला लावतील. तर लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी येथे महायुतीतील सुजय विखे हे घराणही महायुतीतील उमेदवारासाठी मदत करतील अशा चर्चा येथे आहेत. त्यामुळे पारनेर या विधानसभा मतदारसंघांमध्ये राजकीय कुरघोड्या ह्या चालूच राहणार आहेत तसेच याच्या सोबतच जातीय समीकरण गटबाजी डावपेच यांचे बेरजेचे राजकारण करणार तोच येथे यशस्वी होईल असं म्हणायला हरकत नाही. तर मंडळी पाहणार या विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार कोण हवा असं तुम्हाला वाटते हे आम्हाला कमेंट करून कळवा.

By satta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *