श्रीरामपूर: विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या श्रीरामपूर शाखेच्या वतीने दि. ५ व ६ ऑक्टोबर रोजी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व समाजातील तरूण तरूणी व सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कवी आनंदा साळवे, कवी रज्जाक शेख व शाहीर भीमराव कदम यांच्या प्रबोधनपर शाहिरी व कवितानी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीरामपूर तालुका विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष डॉ. सलीम शेख होते. उद्धघाटनाच्या कार्यक्रमामध्ये जीवन सुरुडे, जीवन मकासरे यांनी सांस्कृतिक, सामाजिक चळवळी पुढे असलेल्या आव्हानांबाबत आपले विचार मांडले. या कार्यक्रमामध्ये विद्रोही सांस्कृतिक चळवळीची ध्येय धोरणे याबाबत राज्य सचिव डॉ. जालिंदर घिगे यांनी मांडणी केली. पहिल्या दिवशी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे जिल्हा अध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे यांनी विद्रोही कोणाला म्हणायचे आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळीची गरज याविषयावर मार्गदर्शन केले. त्यानतंर प्रा. राहुल हांडे यांनी अहमदनगर जिल्ह्याचा सांस्कृतिक इतिहास आणि नाथ सुफी परंपरा या विषयावर अनेक उदाहरणा सह मार्गदर्शन केले. संध्याकाळी शाहीर भीमराव कदम आणि सहकाऱ्यांनी चळवळीची गाणी सादर केली. दुसऱ्या दिवशी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य कार्याध्यक्ष येथील कॉ. धनाजी गुरव यांनी “महाराष्ट्रातील आरक्षणाचे लढे आणि त्यामागील राजकारण ” या विषयावर मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात सोलापूर येथील ज्येष्ठ विचारवंत सरफराज अहमद यांनी “सुफी परंपरेचा इतिहास आणि त्या विरोधातील कटकारस्थाने या विषयावर संदर्भासह मार्गदर्शन केले. समारोपाच्या सत्रामध्ये विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या पुढील वाटचालीबद्दल डॉ. सलीम शेख, गोरख आढाव, अनिल शेंडे व विविध मान्यवरांनी विचार व्यक्त केले.
या शिबिराच्या आयोजनासाठी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष डॉ. सलीम शेख, तालुका सचिव अशोक दिवे, विद्रोही विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुमार भिंगारे, अमोल सोनवणे, यांनी परिश्रम घेतले. शिबिरासाठी प्रवीण कोंडार, नवनाथ भांगरे, नामदेव धराडे, दीपक भांगरे, संकेत कोरडे, इंजि. राजू पठाण, अकबर भाई शेख, इक्बाल काकर, संगमनेरचे डॉ. एजाज शेख, सलीमखान पठाण, शरिफ शेख, अहमदनगर येथील कॉ. फिरोज शेख, काँ. फय्याज इनामदार, इब्राहीम शेख, डॉ संजय दुशिंग, रंभाजी कोळगे, रामदास आढाव, वसंत पवार, रफिक शेख, डॉ.पुनम साबळे, कविता दिवे आदींनी परिश्रम घेतले.
या संपुर्ण दोन दिवसाच्या शिबीराचे सूत्रसंचालन विद्रोहीचे सचिव अशोक राव दिवे यांनी केले.